दुचाकी चोराकडून सव्वातीन लाखांच्या १२ दुचाकी जप्त

वाळूज महानगर : जोगेश्वरी येथील अट्टल दुचाकी चोर धनंजय उर्फ धन्या पिंपळे (३०) यास एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपी धनंजय उर्फ धन्या याच्या ताब्यातून सव्वातीन लाखांच्या १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. वाळूज एमआयडीसी परिसरात दुचाकी चोरणारा अट्टल दुचाकीचोर धनंजय उर्फ धन्या पिटोरे-पिंपळे हा बुधवार २४ रोजी रांजणगाव परिसरात येणार असल्याची माहिती गुप्त … Read more

खबरदार!! रेल्वेतून पेट्रोल, केरोसिन, सिलिंडर घेऊन जाल तर…

औरंगाबाद : सध्या रेल्वे पोलिसांकडून प्रवेशांसाठी जनजागृती अभियान राबविले जात आहे. रेल्वेमध्ये बरेच लोक सिगारेट ओढतात. अनेकजण सिलिंडर, केरोसीन, पेट्रोल घेऊन जातात. त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रेल्वेतून पेट्रोल, डिझेल, केरोसीन, सिलिंडर घेऊन जाऊ नका, असे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे. उन्हाळ्यात आगीच्या घटना देखील सर्वाधिक होतात. त्यामुळे आरपीएफ … Read more

पेट्रोलपंपावर दुसऱ्या दिवशीही लांबच लांब रांगा

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अंशतः लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यातच आज शनिवारी पूर्णतः लॉकडाऊन करण्यात आले. काल शुक्रवारी दिवसभर पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहरातील काही पेट्रोल पंपावर नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली. मात्र जास्त गर्दी होत असल्याने पेट्रोल पंप बंद करण्यात आले. त्यामुळे अनेकजण दुसऱ्या दिवशीही … Read more

औरंगाबाद जिल्ह्यातील पेट्रोलपंपांच्या वेळेत बदल

औरंगाबाद : कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिका-यांनी जिल्ह्यातील पेट्रोलपंपांच्या वेळांत काही बदल केले आहेत. आज दि. 27 व 28 मार्च म्हणजे शनिवार व रविवार रोजी फक्त अत्यावश्यक सेवा, आरोग्य ॲम्बुलन्स सेवा, पोलीस प्रशासन, शेती माल वाहतूक सेवा यांनाच पेट्रोल व डिझेल मिळणार आहे. सोमवार 29 मार्चपासून ते 4 एप्रिल पर्यंत रात्री 8 वाजेपासून … Read more

औरंगाबाद शहर लाॅकडाऊनच्या दिशेने; जिल्हाधिकारी घेणार टास्क फोर्सची बैठक

औरंगाबाद : शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून लॉकडाऊनचा निर्णय होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि महापालिका प्रशासक यांच्या टास्क फोर्सची बैठक होऊन येत्या काही तासांत लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. २९ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार असून, त्यातून उद्योगांना वगळले जाणार आहे. मार्च महिन्यात कोरोनाबाधितांच्या … Read more

5 एप्रिलपासून महापालिकेची मेगा लसीकरण मोहीम

औरंगाबाद : शहरात वाढत्या कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यानुसार आता 5 एप्रिलपासून मेगा कोरोना लसीकरण मोहीम राबवण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. या मोहिमेसाठी शंभर पथके नियुक्त केली जात आहे. विशेष म्हणजे दहा ते पंधरा दिवसांत तीन लाख शहरवासीयांचे लसीकरण करण्याचे टार्गेट प्रशासनाने समोर ठेवले आहे. शहरात मागील … Read more

एमपीएससी परीक्षा; दोन कोरोनाबाधितांनी दिली परीक्षा, १९८३ परीक्षार्थींची परीक्षेकडे पाठ

औरंगाबाद | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा आज २७ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत घेण्यात आली. यावेळी पोलिसांच्या कडक बंदोबस्तात आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व नियम पाळून एमपीएससी परीक्षा घेण्यात आली. एमपीएससी परीक्षेला एकूण ४ हजार २७० परीक्षार्थींनी परीक्षा दिली तर तब्बल १ हजार ९८३ परीक्षार्थींनी पाठ फिरवली. … Read more

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने मार्गदर्शक सूचना जारी, साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करण्याचे आवाहन

औरंगाबाद | छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा उत्सव तिथीनुसार या वर्षी ३१ मार्च, २०२१ रोजी साजरा केला जाणार आहे. कोविड-१९ मुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. या … Read more

बनावट लग्न लावून पैसे उकळणा-या महिलेसह 4 जणांच्या टोळीचा पर्दाफाश, एकाच महिलेचे अनेकांशी विवाह लावून अनेकांना गंडा

औरंगाबाद | बनावट लग्न लावून पैसे उकळणा-या टोळीचा देवगाव रंगारी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, मुख्य सूत्रधार महिलेसह चार जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती अशी की, पैसे घेऊन लग्न लावणा-या व फसवणूक करणा-या सक्रीय टोळीची माहिती देवगाव रंगारी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांना  खब-याकडून मिळाली. त्यानुसार अहिरे यांनी बनावट नवरदेव तयार करून … Read more

औरंगाबाद शहरात ३७ केंद्रांवर महापालिकेकडून लसीकरण अभियान

औरंगाबाद | राज्य सरकारच्या निर्देशानुसार ४५ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना एक एप्रिलपासून कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. या लसीकरण अभियानाची तयारी महापालिकेने केली असून शहरात ३७ केंद्रे यासाठी तयार केले जाणार आहेत. लस घेण्यासाठी येताना नागरिकांना मतदान कार्ड, आधार कार्ड किंवा पॅनकार्ड या पैकी एक पुरावा सादर करावा लागणार आहे. कोरोना प्रतिबंधासाठी … Read more