कोरोनाबाधित ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सनची प्रकृती अधिकच खालावली,केले आयसीयूमध्ये दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे त्रस्त ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना सोमवारी उशिरा रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. जॉन्सनला लंडनमधील सेंट थॉमस हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल केले. यानंतर ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक रॅब यांनी तात्पुरता पदभार स्वीकारला आहे. येथील १० डाऊनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आज दुपारी पंतप्रधानांची प्रकृती अचानक … Read more

पंतप्रधानांनी घरात दिवे लावायला सांगितलं होत झुंडीनं रस्त्यावर कसले येता- अजित पवार

मुंबई। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल रात्री ९ वाजता लोकांना घरात दिवे लावून कोरोनाविद्धच्या लढ्यात एकजूट असल्याचं दाखवण्यास सांगितलं होत. पंतप्रधानांच्या आवाहनाला काल देशभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र, काही अतिउत्साही नागरिकांनी रस्त्यावर झुंडीने येऊन फटाके वाजवून कालच्या उपक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयन्त केला. अशा महाभागांवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. ”राज्यात कोरोनारुग्णांची संख्या … Read more

करोनाशी लढताना पंतप्रधान मोदींनी भाजपा कार्यकर्त्यांना केले ‘हे’ ५ आग्रह

नवी दिल्ली । करोना विरुद्धची लढाई ही दीर्घकालीन लढाई असून, देशातील १३० कोटी जनता या युद्धामध्ये जिंकण्याच्या इच्छाशक्तीने एक झाली आहे’, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांपुढे ५ आग्रह धरले आहेत. हे ५ आग्रह महत्त्वाचे संकल्प असून त्यांद्वारे करोनाचा पराभव करण्यात मोठी मदत मिळेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ते भारतीय जनता … Read more

कोरोनाच्या संकटात मोदींनी माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधानांसोबत साधला संवाद

नवी दिल्ली। देशावर कोरोनाचं संकट आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रतिभाताई पाटील, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, एच.डी देवगौडा यांच्याशी फोनवर संवाद साधला. तसेच पंतप्रधान मोदींनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी बरोबर विरोधी पक्षातील इतर नेत्यांशी सुद्धा फोनवर संवाद साधला. देशावर कोरोनाचं सावट आणखी दाट होत आहे. देशातील सर्व व्यवहार बंद … Read more

मोदींच्या दिवे लावण्याच्या आवाहनावर ओवेसींची प्रतिक्रिया, म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ५ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना त्यांच्या घराच्या बाल्कनीत ९ मिनिटे उभे राहण्यास सांगितले आणि देशातील कोरोनाव्हायरस विरूद्ध एकत्रितपणे लढा देण्यासाठी दिवा, फ्लॅशलाइट किंवा मोबाईल फ्लॅशलाइट लावण्याचे आवाहन आहे. यावर असदुद्दीन ओवैसी यांनी शुक्रवारी सरकारवर निशाणा साधला. This country is not an event management company. The people of India … Read more

देशात आत्तापर्यंत २९०२ कोरोनाग्रस्त, ६८ जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोना विषाणूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोव्हीड-१९ चे २६५० सक्रिय रुग्ण आढळले आहेत, तर आतापर्यंत २९०२ पुष्टी झाल्याची नोंद झाली आहे.भारतामध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ६८ लोकांचा मृत्यू झाला आहे.१८३ बरे झाले अथवा सोडण्यात आले. एकूण पुष्टी झालेल्या प्रकरणात माइग्रेटेड पेशंटचा देखील समावेश आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री … Read more

एकाच वेळी लाईट बंद केल्याने फेल होऊ शकतो पाॅवर ग्रिड, आठवडा अंधारात काढावा लागण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला अपील केले की ५ एप्रिलला रात्री नऊ वाजता दीप प्रज्वलित करुन, टॉर्च किंवा मोबाईलने दिवे लावून नऊ मिनिटे तसाच ठेवा. परंतु त्यांच्या या अपिलाने मात्र वीज विभागाच्या चिंतेत वाढ केली आहे. पंतप्रधानांच्या घोषणेवर महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की जर … Read more

लॉकडाउन उठवण्यापेक्षा केंद्र सरकार घेऊ शकते ‘हा’ निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लागू केला. येत्या १४ एप्रिलला हा लॉकडाउन संपणार आहे. दरम्यान, दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढत असताना सरकार लॉकडाउनचा कालावधी वाढवणार का? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. अशा वेळी लॉकडाउनबाबत एक महत्वाची बातती समोर आली आहे. येत्या २४ एप्रिलला एकाच वेळी … Read more

”आता लोकांनी आग लावली नाही म्हणजे झालं”; संजय राऊतांचा मोदींना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘लोकांना टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा लोक ढोल वाजवत रस्त्यावर आले. आता आग लावली नाही म्हणजे झालं,’ अशी खोचक टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. तसेच इव्हेंट करण्यापेक्षा जनतेच्या पोटापाण्याबद्दल बोलण्याचं आवाहनही संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिलला रात्री ९ … Read more

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारताला ‘टीम इंडिया’ म्हणून विजयी करा: मोदींनी साधला खेळाडूंशी संवाद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी विराट कोहली, पीव्ही सिंधू, सचिन तेंडुलकर यांच्यासह प्रमुख खेळाडूंना कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी आणि या साथीच्या विरूद्ध जागतिक लढाईत ‘टीम इंडिया’ म्हणून भारताला विजयी करण्यासाठी लोकांना जाणीव करून द्यायचे आवाहन केले.पंतप्रधान बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, ज्येष्ठ सचिन तेंडुलकर आणि सध्याचा कर्णधार विराट कोहली यांच्यासह देशातील ४० … Read more