आरक्षणाला समाप्त करणं भाजप-आरएसएसच्या डीएनएत आहे, पण आम्ही हे घडू देणार नाही- राहुल गांधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणावरून मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्ला चढविल. राहुल म्हणालेकी, ”भाजप आणि आरएसएसच्या डोळयात आरक्षण नेहमी खुपत आलं आहे. आरक्षणाला रद्द करण्याची त्यांची रणनीती आहे. नोकऱ्यांमध्ये भाजप कधीही आरक्षण कायम ठेवणार नाही, पण आम्ही आरक्षणाला समाप्त होऊ देणार नाही.” संसद परिसरात माध्यमांशी बोलताना राहुल … Read more

मराठा आरक्षणाच्या सुनावणीदरम्यान शरद पवारांचा उल्लेख केल्याने सर्वोच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावर सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या निर्णयावर स्थिगिती देण्याचा अंतरिम आदेश देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणावरील पुढील सुनावणी आता १७ मार्चला सुरू होणार आहे. या सुनावणी दरम्यान मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांचा उल्लेख केल्यानं सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारलं. … Read more

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आमदारकीचा राजीनामा देणारा राष्ट्रवादी आमदार भाजपच्या वाटेवर

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला . अद्यापही पक्षाची गळती सुरूच आहे . आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदारकीचा राजीनामा दिलेले भाऊसाहेब पाटील चिकटगावकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे . चिकटगावकर हे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे आमदार आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यामध्ये अनेक आमदारांनी राजीनामे दिले … Read more

खुशखबर! मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली |मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच येत्या दोन आठवड्यात याचिकाकर्ते पुन्हा याचिका सादर करू शकतात असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. प्रसिद्ध विधिज्ञ गुणरत्न सादकर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या समावेशासहित असणाऱ्या त्रीसदस्यीय न्यायपीठाने हा … Read more

मराठा आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर शुक्रवारी सुनावणी

नवी दिल्ली | मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात प्रसिद्ध विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा आव्हान दिले आहे. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी घेण्यात येणार आहे. या खटल्याकडे संपूर्ण मराठा समाजाचे आणि महाराष्ट्रातील राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदे शिवसेनेच्या वाटेवर! मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण हे … Read more

तुमच्या आमच्या हृदयात भगवा आहे ; दिल्लीत गेलो तरी लढाई जिंकू : उद्धव ठाकरे

मुंबई प्रतिनिधी | मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या खटल्याचा निकाल हा सरकारने केलेल्या कायद्याच्या बाजूने दिला आहे. इथून पुढे मराठा समाजाला नोकरीत १२ टक्के तर शिक्षणात १३ टक्के आरक्षण देण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या दृष्टीने कायदा करण्यासाठी फडणवीस सरकारने केलेले प्रयत्न फळाला आले आहेत असे बोलले जाते आहे. तर मराठा आंदोलनाचा देखील हा विजय आहे … Read more

#MarathaReservation | बंद मुळे लातुर मधे नेमकं झालं काय ?

क्रांन्ति मोर्चा लातूर

स्थानिक प्रतिनिधी, लातूर लातूर | शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये बंद कडकडीत स्वरूपात पाळण्यात आला. पहाटेपासूनच शहरात येणार्‍या व शहरातून जाणार्‍या एस.टी. बसेस बंद होत्या. येथील मध्यवर्ती बसस्थानक, बसस्थानक क्र. २ याचे गेट पूर्णपणे बंद करण्यात आले होते. आडत बाजार, पेट्रोल पंप, सिनेमागृह सर्व प्रकारची दुकाने सकाळी पासून बंद अाहेत. मात्र वैद्यकीय सेवा आणि औषधी … Read more

#MarathaReservation | लातूरमधे मराठा आंदोलनाला हिंसक वळण

आरक्षण लातुर

स्थानिक प्रतिनिधी, लातूर लातूर | मराठा क्रांन्ति मोर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद च्या आवाहनाला राज्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्वत्र शांततेत आंदोलन सुरु असताना लातूर मधे मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. हाती आलेल्या माहीती नुसार, लातूर शहरातील काही भागात रस्ता रोको करण्यार आला आहे. तसेच यावेळी जाळपोळीचे प्रकार झाले असल्याचे समजत आहे. रस्ता अडवून टायर … Read more

#MarathaReservation |अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद

Thumbnail

पुणे । मराठा क्रांती मोर्च्याने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद मुळे आज जीवनावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामधे पुणे शहरातील सर्वच पेट्रोल पंपचालक यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत पेट्रोल पंप बंद ठेवले आहेत. पेट्रोप पंप वगळता बँक, भाजी विक्री केंद्रे, दवाखने सुरळीत चालू आहे. बंद मुळे सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे.

शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश

Thumbnail

पुणे । आज होणाऱ्या महाराष्ट्र बंदच्या निम्मिताने पुण्यातील अनेक शाळा, महाविद्यालये व इतर संस्था यांना एक दिवस सदर संस्था बंद ठेवण्याबाबत प्रशासनाने आदेश दिले आहेत. काहीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने आधीच खबरदारी घेतली असून अनेक संस्थांना यासंन्दर्भात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान केले आहे. मराठा क्रांती मोर्च्याने घेतलेल्या पवित्र्यामुळे … Read more