काय होते तुम्ही काय झाला तुम्ही? रोहीत पवारांचे नारायन राणेंना खणखणीत प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी मुंबईतील भाजपा मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यांनी महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचे म्हण्टले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी खणखणीत उत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकॉउंटवरून काय होते तुम्ही काय झाला तुम्ही? … Read more

सेना-राष्ट्रवादीत तणाव? शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख मातोश्रीवर

मुंबई । वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीतील सुप्त संघर्ष सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर पोहचले आहेत. मातोश्रीवर येण्यापूर्वी शरद पवार आणि अनिल देशमुख यांची चर्चा झाली होती, त्यानंतर हे दोघे मातोश्रीवर पोहचले आहेत. शरद पवार, अनिल देशमुख यांच्यासह … Read more

उद्धव ठाकरे निष्क्रिय, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीवर आजही ठाम- नारायण राणे

मुंबई । राज्यातील उद्योगधंदे कोलमडून पडले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे डोळे मिटून आहेत. लोकांना पगार मिळत नाहीत. तरी मुख्यमंत्री फक्त लॉकडाऊन करतायत. ते निष्क्रिय असल्यामुळे प्रशासन चालवू शकत नाहीत. त्यामुळेच मी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच मागणी केली होती. या मागणीवर मी आजही ठाम असल्याचे भाजप नेते नारायण राणे म्हणाले. ते सोमवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात … Read more

मुख्यमंत्री हिंदूचं आहेत ना? नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना जळजळीत सवाल

मुंबई । यंदाच्या वर्षी आषाढीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या शासकीय महापूजेवरही याचं कोरोनाचं सावट पाहायला मिळालं. खुद्द पंढरपूरातील स्थानिकांनाही कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीच्या दिवशी मंदिरप्रवेश नाकारण्यात आला. यावरच टीका करत भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली.  ते सोमवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. ‘मुख्यमंत्री पंढरपूरात गेले. शासकीय महापूजेचा … Read more

तिजोरी रिकामी असताना देखील ६ कारसाठी मान्यता?- देवेंद्र फडणवीस 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सुरु असणाऱ्या कोरोना विषाणूच्या महामारीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीतील निधी हा या आजाराशी संबंधित उपाययोजना करण्यासाठी खर्च होत आहे. त्यामुळे सध्या राज्याच्या तिजोरीत खडखडाट दिसून येतो आहे. असे असताना देखील राज्य शासनाने मंत्री आणि अधिकाऱ्यांसाठी सहा कार खरेदी करण्यासाठी मान्यता दिली आहे. तसा शासन निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. पुढील महिन्यापासून राज्य … Read more

लॉकडाउन हेच धोरण कसं काय असू शकतं? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लॉकडाऊन धोरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. लॉकडाउन हेच धोरण ठरवता कसं येईल? असा प्रश्न उपस्थित करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल आणि नवी मुंबईचा दौरा केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं. … Read more

‘सारथी’बाबतचा दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला नाही!- खासदार संभाजीराजे भोसले

मुंबई । भाजपचे खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘सारथी’ संस्थेबाबतचा दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. याशिवाय मराठा समाजाची एकही मागणी त्यांनी पूर्ण केली नाही असा आरोपही खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शुक्रवारी केला. या संस्थेबाबत सुरू असलेला पोरखेळ चालू देणार नाही असा … Read more

मदत घ्यायला यांचा इगो आडवा येतो, फडणवीसांनी दोन तासात प्रश्न सोडवले असते – चंद्रकांत पाटील 

मुंबई । भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोरोना काळात सरकार किती निष्क्रिय आहे हे सांगण्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. आता त्यांनी परत आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी सरकारला मदत मागण्यासाठी त्यांचा इगो आडवा येतो असे वक्तव्य केले आहे.  एका वृत्तवाहिनीला दिलेल्या … Read more

छत्रपती शिवरायांच्या पादुका विठ्ठलाच्या दर्शनाला; 22 दिवस पायी चालत गाठले पंढरपूर

सोलापूर प्रतिनिधी | रायगड किल्ल्यावरुन निघालेली छत्रपती शिवरायांची पालखी आज श्री विठ्ठल दर्शनासाठी मंदिरात दाखल झालीय. रायगडावरुन २२ दिवस पायी चालत या पालखीने पंढरपूर गाठले. या पालखीचे हे सातवे वर्ष आहे. भक्ती सोहळ्यामध्ये हा शक्तीचा सोहळा यांचा संगम झालाय. विशेष म्हणजे या पालखीला शासनाने कोणतीही परवानगी दिली नव्हती. मात्र छत्रपतींच्या गनीमी काव्याने हे पाच मावळे … Read more

कोल्हापुरात वैद्यकीय साहित्य खरेदीत बनवेगिरी  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना चाचणीसाठी लागणारे संच प्रमाणित दर्जाचे न घेता भलतेच  घेतले असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी येथे उघडकीस आला. प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत या घोटाळ्यावर माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रासह भाष्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली … Read more