राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्के- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई । राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असला तरी एक दिलासादायक बातमी आहे. राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्के आहे. आतापर्यंत राज्यात ४० हजार ९७५ कोरोना बाधित रुग्ण एकदम ठणठणीत झाले आहेत. तर ४४ हजार ३७४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्याचा सोमवारी १६६१ रुग्णांना … Read more

राज्यात कोरोना टेस्टचा दर निश्चित होणार- राजेश टोपे

मुंबई । कोरोनाच्या संशयित रुग्णांकडून कोरोनाची चाचणी करण्यासाठी मनमानीपणे शुल्क आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांना चाप लावण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. खासगी रुग्णालयातील कोरोना चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने चार सदस्यांची समिती स्थापन केली असून ही समिती कोरोना चाचणीचा दर ठरवणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील लॅब पूर्णक्षमतेने वापरण्यासाठी आणि … Read more

पत्रकारांनाही 50 लाखांचं विमा कवच, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा

बुलडाणा । कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या कठीण परिस्थितीतही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना 50 लाखांचा विमा कवच देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींमध्ये पत्रकारांना सुद्धा विमा कवच मिळणार असल्याचे टोपे यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्यातील … Read more

राज्यात दिवसभरात १ हजार ६०२ नवीन कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या २७ हजार ५२४ वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २७ हजार ५२४ झाली आहे. आज १६०२ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५१२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ६०५९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २० हजार ४४६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख … Read more

राज्यात आज दिवसभरात सापडले १ हजार २१६ नवीन रुग्ण; एकूण रुग्णसंख्या १७ हजार ९७४ वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १७ हजार ९७४ झाली आहे. आज १२१६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज २०७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३३०१ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ०२ हजार १०५ नमुन्यांपैकी १ लाख ८३ … Read more

राज्यात दिवसभरात तब्ब्ल १ हजार २३३ नवीन रुग्णांची नोंद; एकूण रुग्णसंख्या १६ हजार ७५८ वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. आज १२३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज २७५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३०९४ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ९० हजार ८७९ नमुन्यांपैकी १ लाख ७३ … Read more

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १४ हजार ५४१ वर, दिवसभरात सापडले ७७१ नवीन रुग्ण

मुंबई । कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५४१ झाली असून त्यात आज नव्याने ७७१ रुग्णांचे निदान झाले आहे. आजच्या आकडेवारीमध्ये मुंबई वगळता इतर जिल्हे तसेच मनपा यांच्याकडील आकडेवारी ही आयसीएमआर वेबपोर्टल यादीनुसार अद्ययावत करण्यात आली आहे यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ झाली आहे. राज्यात आज ३५० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात … Read more

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ९३१८ वर, २४ तासांत ७२९ नवे रुग्ण

मुंबई | राज्यात आज दिवसभरात कोरोनाचे नवे ७२९ रुग्ण सापडले आहेत. यामुळे राज्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या ९३१८ वर पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधित रुग्ण मुंबई मध्ये सापडले आहेत. यापैकी 1388 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या ९३१८ वर#HelloMaharashtra #CoronaInMaharashtra pic.twitter.com/aS9rJ2I8mP … Read more

राज्यात दिवसभरात कोरोनाचे ८११ नवीन रुग्ण; एकुण संख्या ७६२८ वर

मुंबई | महाराष्ट्रात करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७ हजार ६२८ वर पोहचली आहे. राज्यात आज एकाच दिवशी करोनाचे तब्बल ८११ नवीन रुग्ण आढळले असून आजवरचा २४ तासांतील करोना रुग्णसंख्येचा हा उच्चांक ठरला आहे. त्याचवेळी दिवसभरात करोनामुळे २२ जणांचा मृत्यू झाला असून या आजाराने आतापर्यंत ३२३ जणांना प्राणास मुकावे लागले आहे. राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने … Read more

४० प्रयोगशाळांच्या मदतीने राज्याने गाठला कोरोना चाचण्यांचा एक लाखांवरील टप्पा

मुंबई । राज्यात गेल्या दीड महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. कालपर्यंत ४० प्रयोगशाळांच्या माध्यमातून राज्याने चाचण्यांचा एक लाखांवरील टप्पा गाठला आहे. देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात झाल्या असून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्याच्या किमान एक महिना आधीपासून या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या निदानात मोठी मदत होत आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. आज राज्यात … Read more