मुख्यमंत्री शिवसेनेचा मात्र सत्तेचा रिमोट शरद पवारांच्याच हातात

मुंबई | काँग्रेससोबत आघाडी असतानाही शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची मागणी कधीही केली नव्हती. एकदा तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा काँग्रेसहून अधिक होत्या, तरीही पवारांनी मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला नव्हता. एका मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात अधिक मंत्रिपदे मिळत असतील, तर पक्षाच्या वाढीसाठी ते अधिक महत्त्वाचे आहे, अशी भूमिका राष्ट्रवादीची आहे. यावेळीही मुख्यमंत्रिपद पूर्ण काळ शिवसेनेला देऊन, राष्ट्रवादी काँग्रेसने त्या बदल्यात … Read more

शरद पवारांचे धक्कातंत्र, गृह खाते विदर्भाला?

विशेष प्रतिनिधी | लोकांशी थेट संबंध येणारे आणि प्रतिष्ठेचे गृह खाते विदर्भाला देण्याचे योजून राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी मोठा गेम खेळला आहे. अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद आणि गृह खाते देण्यात येईल असे मानले जात होते. अधिकृत खातेवाटप अजून जाहीर झालेले नाही. पण खास गोटातून मिळालेल्या माहितीप्रमाणे, गृह खाते विदर्भातील ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांना देण्याचा … Read more

एल्गार परिषदेतील भाषणांवरुन त्यांना देशद्रोही ठरवणे हा सत्तेचा गैरवापर – शरद पवार

पुणे प्रतिनिधी | एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषणे केल्याबद्दल पुणे पोलिसांनी काही जणांवर शहरी नक्षलवादाच्या नावाखाली अटक करत त्यांच्यावर देशद्रोहाचा घटला भरला होता. मात्र सदर कारवाई म्हणजे सत्तेचा गैरवापर असून त्याबाबत एस.आय.टी. कडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. यावेळी … Read more

उपमुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय शरद पवार घेतील – अजित पवार

नागपूर प्रतिनिधी | जवळपास ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना पूर्णपणे क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात अजित पवार मंत्रिपदाची शपथ घेणार हे जवळपास निश्चित झाले आहे. आणि यावरून खुद्द पवार यांनी सूचक असे वक्तव्य केले आहे. नागपुरात सुरु असलेल्या … Read more

अजित हार्ड वर्कर, प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याची त्याच्यात क्षमता – शरद पवार

औरंगाबाद प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे औरंगाबादच्या दौऱ्यावर असून, शुक्रवारी त्यांनी दिव्य मराठी या वृत्तपत्राला विशेष मुलाखत दिली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना सूचक विधान केले. अजित पवार यांच्या नेतृत्वाला तुम्ही तराजूमध्ये कसे ताेलता? या प्रश्नाला उत्तर देतांना शरद पवार म्हणाले की, अजित हार्ड वर्कर आहे. … Read more

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे सामान्य शेतकऱ्यांस पत्र…

पवारसाहेबांनी राज्यभर केलेला झंझावाती प्रचार व त्यांच्या लढाऊ बाण्याचे कौतुक केले होते. काही दिवसातच गरुड यांच्या पत्राला शरद पवार यांनी उत्तरादाखल पत्र पाठवताच त्यांना आश्चर्याचा आनंदी धक्का पोहोचला. सत्तास्थापनेच्या तणावपुर्ण वातावरण असताना अत्यंत व्यस्त दिनक्रमातुन पवारसाहेबांनीही स्वतःची स्वाक्षरी करत गरूड यांना दिवाळीच्या शुभेच्छा यापत्रात दिल्या होत्या.

शेतकरी पुत्राने साकारली शरद पवार यांची जगातील सर्वात मोठी ग्रास पेंटिंग

आज राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस. शरद पवार यांचा जनमानसातील आणि एकूणच राजकारणातील दबदबा पाहत त्यांच्यावर देशभरातून आज शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र, उंस्मानाबाद जिल्ह्यातील निपाणी गावच्या शेतकरी सुपुत्राने आदरणीय शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्या दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदींनी दिल्या शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

दिल्ली | पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांना दिर्घायुष्य लाभो आणि आरोग्यमय आयुष्य लाभो यासाठी मोदी यांनी प्रार्थना केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज ट्विट करुन पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त देशभरातून पवार … Read more

शरद पवारांच्या पंतप्रधानपदाच्या तयारीची ‘हीच ती वेळ’

गुरुवारी संध्याकाळी शिवतीर्थावर उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असताना महाराष्ट्रातील या सत्ताबदलाचे मुख्य सूत्रधार असलेले शरद पवार लक्षात आले नाहीत तर नवलच..!! आपल्या ५० वर्षांपेक्षा अधिक काळाच्या राजकारणाचा अनुभव पणाला लावत शरद पवारांनी भाजपच्या लोकांना सत्तास्थापनेपासून दूर ठेवलं. हे करत असताना शिवसेनेच्या झोपलेल्या वाघाचा स्वाभिमानही त्यांनी जागृत करुन दिला. गेली ५ वर्षं आपल्या खिशात राजीनामा घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना इथून पुढे मात्र काही कालावधीसाठी का होईना सत्तेचा मनसोक्त आनंद उपभोगता येणार आहे. राजकारणात कुणीच कुणाचं कायमचं शत्रू नसतं हा विचार डोक्यात घेऊन महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकासआघाडीचं सरकार आता अस्तित्वात आलं. ‘मला माझ्या जुन्या मित्रांसोबत आता काम करता येईल’ हे छगन भुजबळ यांनी केलेलं सूचक विधान याबाबतीत खूप बोलकं आहे. शपथविधीसाठी देशभरातील विविध मान्यवरांना निमंत्रण दिली गेली होती. यामध्ये ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांचा प्रामुख्याने समावेश होता.

मी बंड केला असं तुम्ही कसं म्हणता? अजित पवार भडकले

मुंबई प्रतिनिधी | अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा आज सकाळ पासून सुरु होती. पवार सकाळ पासून अनरिचेबल झाल्याने आता अजित पवार काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आपण आज शपथविधी घेणार नसल्याचे पवार यांनी स्वत: जाहिर केले आहे. यावेळी आपण उपमुख्यमंत्रिपदासाठी आग्रही होता. मात्र तुम्ही बंडखोरी केल्यामुळेच तुम्हाला … Read more