अजित हार्ड वर्कर, प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याची त्याच्यात क्षमता – शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे औरंगाबादच्या दौऱ्यावर असून, शुक्रवारी त्यांनी दिव्य मराठी या वृत्तपत्राला विशेष मुलाखत दिली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना सूचक विधान केले. अजित पवार यांच्या नेतृत्वाला तुम्ही तराजूमध्ये कसे ताेलता? या प्रश्नाला उत्तर देतांना शरद पवार म्हणाले की, अजित हार्ड वर्कर आहे. सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत ताे लोकांच्या भेटीगाठी घेत असतो. त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करताे. रिझल्ट देण्याची त्याची माेठी क्षमता आहे. काेणताही प्रश्न असला तरी त्यावर तातडीने निर्णय घेताे. प्रशासनावर त्याचे प्रचंड नियंत्रण आहे. ही त्याची जमेची बाजू. उणिवा म्हणाल तर भावनिक विषय आला की ताे फटकन निर्णय घेताे, परिणाम काय हाेतात याचा मात्र विचार करत नाही. असे म्हणत त्यांनी सूचक विधान केले आहे.

यावेळी ते म्हणाले की, ‘महाराष्ट्रात झालेला सत्ताबदल केवळ साताऱ्याच्या एका सभेने झालेला नाही, तर मला प्रचाराच्या सुरुवातीपासूनच ताे दिसत हाेता. एक चूक झाली, जर मी महिनाभर आधी दाैऱ्यावर निघालाे असताे तर राज्यात तीन पक्षांना एकत्र करण्याची आम्हाला गरजही भासली नसती,’ असा विश्वासही व्यक्त केला. सरकारचा रिमाेट तुमच्या हाती आहे का? याबाबत बोलतांना ते म्हणाले की, नाही, आणि मी ठेवणारही नाही. मी विचारल्याशिवाय काेणाला सल्ला देत नसताे. आज जनरेशन बदलत आहे. मी राजकारणाची सुरुवातही युवक काॅंग्रेसमधून केली. नव्या पिढीशी संपर्क ठेवायला हवा.

उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय शरद पवार घेतील – अजित पवार

विकासावर आधारित राजकारणासाठी त्यांना प्राेत्साहन द्यायला हवे. सुप्रियाताई एका कार्यक्रमात म्हणाल्या हाेत्या, ‘माझे वडील अनप्रेडिक्टेबल आहेत. ज्यांना एकच मुलगी आहे त्यांचं दु:ख त्यांनाच माहिती. एका मुलीच्या बापाची ती व्यथा आहे, त्याबद्दल मी फारसे काही सांगत नाही.

सत्तेत असताना आम्ही जे निर्णय घेताे, ते चांगलेच असतात असे खालचे लाेक सांगतात. आम्हीही त्यावर खुश हाेतो. मात्र जेव्हा तुम्ही सत्तेबाहेर असता तेव्हा तेच निर्णय शेवटच्या माणसापर्यंत कितपत पाेहाेचला हे पाहण्याची संधी मिळते. मला प्रवासाची खूप आवड आहे. जर मी आज मंत्री असताे आणि याबाबत चाैकशी केली असती तर अधिकारी म्हणाले असते ‘सगळे काही उत्तम चालले आहे…’ एकूणच विराेधात असताना तुम्हाला वस्तुस्थिती जाणून घेण्याची संधी असते. लाेकही तुम्हाला वास्तव सांगतात.

सुप्रियाचा रस राष्ट्रीय राजकारणात आहे. ती संसदेतील कामकाजात नियमित सहभागी असते. सर्वाधिक प्रश्नही विचारते. दिल्लीत ३० ते ४० तरुण सर्वपक्षीय खासदारांचा एक ग्रुप आहे. त्यांचा भेटायचा अड्डा माझ्याच घरी असताे. वेगवेगळ‌्या विषयावर ते चर्चा करत असतात. वेगवेगळ्या राज्यात जातात. त्यामुळे ती महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री हाेईल, असे नाही. (हसत) सध्या आमचं घरात बरं चाललंय.. कशाला मग हे..? असे म्हणत त्यांनी हशा पिकवला.

माेदी बारामतीत म्हणाले हाेती, ‘मी पवारांचे बाेट धरून राजकारण शिकलाे’, झारखंडमध्ये म्हणाले, ‘मी करिया मुंडांचे बाेट धरून राजकारण शिकलाे’. त्या दिवसापासून मी माझं बाेट जपायला लागलाेय. खडसे मला भेटले, सविस्तर चर्चाही झाली.

पण त्यांचे समाधान करण्याएवढी साधनसामग्री माझ्याकडे सध्या नाही. असे म्हणत त्यांनी खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत संभ्रम निर्माण केला.

यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरही भाष्य केले. नेहमीची कर्जमाफी फारशी याेग्य नाही. घेतलेला पैसा परत करण्याची लाेकांना सवय लागलीच पाहिजे. कारण या संस्थाही जगल्या पाहिजेत. मात्र, दुष्काळ, अतिवृष्टी, पडलेले बाजारभाव अशा काही विशिष्ट परिस्थितीत उद‌्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफीची गरज असते. विशिष्ट काळापुरती कर्जमाफी करणे ठीक, मात्र अर्थकारणाकडे दुर्लक्ष करुनही चालणार नाही. असेही ते म्हणाले.

राज्यातील होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र येऊन लढवणार आहात का? या प्रश्नाला उत्तर देतांना पवार म्हणाले की, त्यावर अजून काहीच चर्चा झालेली नाही. मात्र लवकरच ज्या जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका हाेत आहेत त्याबाबत आम्ही काॅंग्रेस व शिवसेनेला प्रस्ताव दिलाय. ज्या जिल्हा परिषदेत ज्या पक्षांचे सदस्य जास्त त्यांचा अध्यक्ष करा, दाेन नंबरची संख्या असणाऱ्यांना उपाध्यक्षपद द्या व तीन नंबरच्या पक्षाला सभापती द्या, असे आमचे म्हणणे आहे. हेच सूत्र सगळ्यांना मान्य आहे असते असते. मात्र प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती पाहिल्याशिवाय निर्णय घेता येणार नाही, मात्र सर्वांची तशी इच्छा मात्र आहे. असेही ते म्हणाले.

Leave a Comment