मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम म्हणाले,”नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना मिळणार अनेक फायदे”

नवी दिल्ली । देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी शुक्रवारी सांगितले की, तीन नवीन शेतीच्या कायद्यांबाबत सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतील. सुब्रमण्यम म्हणाले, “आम्ही अर्थशास्त्रज्ञ आहोत आणि अर्थशास्त्राच्या गोष्टी सांगतो आणि अर्थशास्त्र म्हणते कि या कृषी कायद्याचे अनेक फायदे आहेत.” शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत विशेष म्हणजे नुकत्याच … Read more

अण्णा हजारेंचे आंदोलन स्थगित ; फडणवीसांची मध्यस्थी यशस्वी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. शनिवारपासून (३० जाने.) अण्णा हजारे आंदोलन करणार होते. त्यामुळे मोदी सरकारकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहे. आज सुमारे तीन केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत भाजपाची … Read more

मनमोहनसिंगांच्या काळात दोन आंदोलनं झाली, मग मधल्या सात वर्षात देशात सगळं आलबेल आहे का? ; राऊतांचा अण्णांवर निशाणा

Raut and Anna

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कृषी कायद्यावरून शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच असून, दिवसेंदिवस परिस्थिती चिघळत असल्याचं भीतीदायक चित्र दिसू लागलं आहे. दुसरीकडे नव्या कृषी कायद्यांविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधला आहे. अण्णा हजारे यांना आमचा त् प्रश्न आहे, … Read more

…तर मी आत्महत्या करेल!! शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा केंद्र सरकारला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जर जाचक कृषी कायदे सरकारने मागे घेतले नाहीत तर मी आत्महत्या करेन,” असा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला दिला आहे. देशातील शेतकऱ्यांवर अत्याचार होत असून त्यांना उद्ध्वस्त करण्याचा कट रचला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना ते भावूक झाले होते. राकेश टिकैत यांच्यावर … Read more

प्रजासत्ताक दिनी तिरंग्याचा अपमान दुर्भाग्यजन्य; राष्ट्रपती कोविंद यांच्याकडूनही शेतकर्‍यांवरच निशाणा अन् सरकारची वाहवाह

ramnath kovind

नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनी तिरंग्याचा अपमान दुर्भाग्यजन्य असल्याचे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज व्यक्त केले. माझे सरकार नेहमीच संविधानिक आंदोलनांचा सन्मान करत आले आहे. मात्र मागील काही दिवसांत तिंरगा आणि प्रजासत्ताक दिनाचा अपमान दुर्भाग्यजनक असल्याचे राष्ट्रपती यावेळी म्हणाले. लोकसभेत आज राष्ट्रपतींचे अभिभाषण झाले. त्यावेळी बोलताना राष्ट्रपती कोविंद यांनी शेतकर्‍यांवर निशाणा साधत सरकारची वाहवाह … Read more

शेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांचे सखोल ज्ञान असते तर संपूर्ण देश पेटला असता -राहुल गांधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधातदेशभरातील शेतकरी आक्रमक झाला आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान उसळलेल्या हिंसेनंतर आरोप-प्रत्यारोप होत असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. देशातील बहुतेक शेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांची माहिती नाही. नाही तर संपूर्ण देश पेटून उठेल, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी हे … Read more

शेतकरी आंदोलनात मोठी फुट; दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार

नवी दिल्ली |  येथे 26 जानेवारी रोजी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये दिल्ली पोलीस आणि शेतकरी यांच्यामध्ये संघर्ष झाला. शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरती त्यांचा झेंडा फडकावला. हे सर्व झाल्यानंतर शेतकरी आंदोलनात सहभागी दोन युनियननी शेतकरी आंदोलनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृतपणे घोषणा करून या संगठना बाहेर पडल्या आहेत. 26 जानेवारी रोजी दिल्लीमध्ये झालेल्या संघर्षानंतर, शेतकरी आंदोलनातून राष्ट्रीय … Read more

IMF च्या चीफ इकॉनॉमिस्ट गीता गोपीनाथ म्हणाल्या,”भारताच्या नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा नफा वाढेल”

वॉशिंग्टन । आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या जागतिक वित्तीय संस्थेने भारतात नुकत्याच राबविलेल्या कृषी कायद्यांना पाठिंबा दर्शविला आहे. वॉशिंग्टनस्थित आयएमएफ ची चीफ इकॉनॉमिस्ट गीता गोपीनाथ म्हणाल्या की,” भारतात नुकत्याच लागू केलेल्या शेती कायद्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याची क्षमता आहे, परंतु त्याच वेळी असुरक्षित शेतकऱ्यांना याद्वारे सामाजिक सुरक्षा देखील पुरविली जाते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारत सरकारने तीन कृषी कायदे … Read more

शेतकरी आंदोलनामुळे आपली देखील ट्रेन चुकली असेल तर आता रेल्वे संपूर्ण तिकिटांचे पैसे परत करेल, अशाप्रकारे मिळवा रिफंड

नवी दिल्ली । 26 जानेवारी (Republic Day) रोजी किसान ट्रॅक्टर रॅली दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड कोलाहलामुळे वाहतूक कोंडीसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. शेतकरी आंदोलनामुळे रेल्वे प्रवाशांना मंगळवारी प्रचंड त्रास सहन करावा लागला. अनेक मार्ग बंद झाल्यामुळे बहुतेक प्रवासी रेल्वे पकडण्यासाठी स्टेशनवर पोहोचू शकले नाहीत. अशावेळी ज्यांची ट्रेन चुकली आहे अशा प्रवाशांना तिकीट (Ticket) संपूर्ण … Read more

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होऊ नये; पवारांनी दिलं ‘हे’ कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात दिल्लीत आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान, दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतल्या आझाद मैदानात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आझाद मैदानात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी येण्याची चर्चा आहे. … Read more