शेतकरी आंदोलनात मोठी फुट; दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली |  येथे 26 जानेवारी रोजी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये दिल्ली पोलीस आणि शेतकरी यांच्यामध्ये संघर्ष झाला. शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरती त्यांचा झेंडा फडकावला. हे सर्व झाल्यानंतर शेतकरी आंदोलनात सहभागी दोन युनियननी शेतकरी आंदोलनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृतपणे घोषणा करून या संगठना बाहेर पडल्या आहेत.

26 जानेवारी रोजी दिल्लीमध्ये झालेल्या संघर्षानंतर, शेतकरी आंदोलनातून राष्ट्रीय किसान मजदूर संघटन आणि किसान नेते सरदार वीएम सिंह हे बाहेर पडले आहेत. यापुढे कोणत्याही रॅली आणि हिंसक आंदोलनामध्ये या दोन संघटना दिसणार नाहीत. पण त्यांचा कृषी कायद्याला विरोध कायम राहणार आहे. अशी सरदार वी. एम. सिंह यांनी घोषणा केली.

याविषयी बोलताना सरदार वी. एम. सिंह म्हणाले की, ‘शेतकरी आंदोलन कायम राहील. कृषी कायद्याला विरोधही कायम राहील. पण या पद्धतीने नाही. आम्ही शेतकरी आंदोलनांमध्ये मार खाण्यासाठी किंवा तोडफोड करण्यासाठी सामील झालो नाही. ज्यांचे उद्देश आणि दिशा वेगळ्या आहेत, यांच्यासोबत आम्हाला आंदोलन करण्याची अजिबात इच्छा नाही. यामुळे आम्ही या आंदोलनातून बाहेर पडत आहोत’.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment