सोनिया गांधींचा शरद पवारांना फोन, सत्तास्थापनेचा तिढा सुटणार?

विशेष प्रतिनिधी | राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन एकमत नसल्याचे घडामोडींवरुन दिसत आहे. अशात आता शरद पवार यांना सोनिया गांधी यांनी फोनवर चर्चा केल्याचे समजत आहे. सोनिया गांधी यांनी शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांना चर्चेसाठी पाठवले आहे. त्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे, … Read more

राज्यात कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट, राज्यपालांची राष्ट्रपतींना शिफारस?

विशेष प्रतिनिधी | राज्यातील राजकिय वातावरण चांगलेच तापले असून कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट लागू शकते अशी चर्चा सुरु आहे. राज्यपाल यांनी राष्ट्रपतींकडे आपला अहवाल पाठवला असून राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात शिफारस केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सोमवारी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. राज्यपालांनी राष्ट्रवादीला मंगळवार संध्याकाळी ८:३० … Read more

संजय राऊत लिलावतीतूनच सोडतायत शब्दांचे बाण, कोणाला लिहितायत पत्र?

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळावं यासाठी राऊत यांनी मागील आठवडाभर जबाबदारीची भुमिका घेत सेनेची बाजू लावून धरली आहे. मात्र सोमवारी छातीत दुखत असल्याने राऊत लिलावती रुग्नालयात दाखल झाले होते. राऊत रुग्नालयात दाखल झाल्यानंतर राज्यभर त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. आता शिवसेना पक्ष … Read more

Breaking | संजय राऊत लिलावती रुग्नालयात दाखल

दिल्ली | शिवसेना नेते संजय राऊत लिलावती रुग्नालयात दाखल झाले आहेत. राऊत यांनी आज दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर राऊत रुग्नालयात दाखल झाले आहेत. संजय राऊत मागील काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. महाराष्ट्रातील सत्तासमिकरणांबाबत देशभर चर्चा सुरु आहे. यामध्ये राऊत शिवसेनची बाजू मांडताना … Read more

राज्याला राष्ट्रपती राजवटीमध्ये ढकलण्यासाठी प्रयत्न- संजय राऊत

राज्यात निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवडे उलटले तरी सत्तेसाठीचा दावा कोणत्याही पक्षाने केलेला नाही आहे. दरम्यान निवडणूक निकालाप्रमाणे सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केले होते मात्र भाजप असमर्थ ठरले. त्यामुळे आता शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी आमंत्रित केला आहे. मात्र महत्वाची बाबा म्हणजे आता सत्तास्थापनेसाठी दिलेल्या अवधीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

महाशिवआघाडीच्या सरकारमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? | स्पेशल रिपोर्ट

विशेष प्रतिनिधी | सातारा मुख्यमंत्रीपद – केंद्रातील सत्ताधारी पाशवी बहुमतात नसतील तर राज्याची मांड समर्थपणे हाताळू शकणारं स्वावलंबी व्यक्तिमत्व. अनेक राजकीय नेत्यांची संपूर्ण कारकीर्द गेली तरी या पदाचं स्वप्न पूर्ण होत नाही. घराणेशाही असेल तर मार्ग तुलनेनं सोपा असतो. दुसरा मार्ग म्हणाल तर पक्षश्रेष्ठींच्या मनात तुम्ही घर केलेलं असलं पाहिजे. आणि तिसरा मार्ग म्हणजे तुमचं … Read more

अयोध्येत राम मंदिर होणार यांवर शिवसेना नेहमी ठाम राहिली -संजय राऊत

‘अयोध्येतील आंदोलनात शिवसेनेचे मोठे योगदान आहे. शिवसैनिकांनी बलिदान दिले आहे. बाबरी मस्जिद पाडल्यावर हे काम शिवसैनिकांनी केले असेल तर ते गर्वाचे असल्याचे एकाच वाघाने म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले. राम मंदिरचा मुद्दा शिवसेनेने नेहमीच जीवंत ठेवलाय. अयोध्येत राम मंदिर होणार, असे सांगत काहींनी पळ काढला. मात्र, शिवसेना ठाम राहिली.’ असे विधान संजय राऊत यांनी केले.

शिवसेनेची राष्ट्रवादीशी जवळीक वाढली? राऊत-पवार भेटीतून संकेत

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मी आणि शरद पवार यांनी सोबत बसून देवेंद्र फडणवीस यांचा प्रत्येक शब्द ऐकला, असं यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीची जवळीक वाढल्याचं बोललं जात आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री हे बाळासाहेबांना दिलेलं वचन – उद्धव ठाकरे

 मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचा मुख्यमंत्री हे बाळासाहेब ठाकरेंना दिलेले वचन आहे असे मत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेसोबत काही बोलणेच झाले नाही असे म्हणल्यानंतर ठाकरे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत फडणवीस घोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे. … Read more

मी पुन्हा येईल म्हणणार्‍या फडणवीसांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला आहे. ‍‌१३ व्या विधानसभेचा कार्यकाळ आज ८ नोव्हेंबर रोजी संपत असल्यामुळे फडणवीस यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. Mumbai: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis and other state ministers meet Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhawan. pic.twitter.com/grmCMrHLg9 — ANI (@ANI) November … Read more