संभाजी भिडे यांच्या नावाने अटक वॉरंट काढा!; बेळगाव न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आदेश

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर अटक वॉरंट बजावण्याचे आदेश बेळगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयाने दिले आहेत. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी भिडे यांच्या विरोधात 2018 मध्ये गुन्हा दाखल केला होता. या खटल्याच्या कालच्या सुनावणीस भिडे हजर राहिले नाहीत. त्यामुळे न्यायाधीशांनी भिडे यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावण्याचे आदेश दिले आहेत. … Read more

‘सांगली बंद’ला सुप्रिया सुळेंनी दर्शविला विरोध; राजकीय षडयंत्र असल्याचा केला आरोप

‘आज के शिवाजी: नरेंद्र मोदी’ पुस्तकाबद्दल भाजपमध्ये असलेल्या शिवरायांच्या वंशजांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती. त्यावर पक्षाचं नाव शिवसेना ठेवताना वंशजांना विचारलं होतं का, असं उदयनराजे यांनी म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना राऊत यांनी उदयनराजेंकडून वंशज असल्याचे पुरावे मागितले. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकारण तापलं आहे.

संजय राऊत यांना पदावरून हाकला! संभाजी भिडेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मागणी

संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात उदयनराजेंना शिवरायांचे वंशज असल्याचा पुरावा द्या म्हणून विचारणा केली होती. संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळं राजकारण चांगलंच तापलं असतांना या वादात आता शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी उडी घेत राऊत यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी केली आहे. ‘छत्रपती परंपरा ही हिंदुस्थानची प्राणभूत परंपरा आहे. या परंपरेचा वा वंशजांचा अवमान म्हणजे देशाचा अवमान आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पदावरून हाकला,’ अशी मागणी भिडे यांनी केली आहे.

एनआरसी,सीएए कायद्याला विरोध करणारे देशद्रोही – संभाजी भिडे

नागरी सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी नागरी सुधारणा कायद्याला विरोध करणारे हे देशद्रोही आहेत अशी टीका संभाजी भिडे यांनी यावेळी बोलताना केली.

तथाकथीत मध्यस्थांची गरज नाही, संजय राऊतांचा भिडे गुरुजींना टोला

मुंबई प्रतिनिधी | सत्तावाटपाच्या मुद्द्यावरुन सेना भाजप यांच्यात चांगली जुंपली असून हा तिढा मध्यस्तांच्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. गुरुवारी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ठाकरे आणि भिडे यांची भेट होऊ शकली नाही. यावर तथाकथीत मध्यस्तांची गरज नाही असं म्हणत संजय … Read more

भिडे गुरुजी उदयनराजेंच्या भेटीला! राजकिय चर्चांना उधान

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. अशात आता संभाजी भिडे आणि उदयनराजे यांच्या भेटीमुळे राजकिय चर्चांना उधान आलं आहे. भिडे यांनी आज उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे जाऊन भेट घेतलीय. या भेटीत नक्की काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र … Read more

संभाजी भिडे त्यांच्या ‘त्या’ वक्तव्याने गोत्यात

thumbnail 1531518713276

नागपूर | ‘माझ्या दारात एक आंबा आहे त्या आंब्याची फळे खाल्ल्याने अनेकांना मुले झाली आहेत’ या वक्तव्याने भिडे गुरुजींना गोत्यात आणले आहे. भीमा कोरेगाव दंगलीत कथित सहभागाचे आरोप भिडे गुरुजींवर आहेत. भीमा कोरेगाव दंगली पासून भिडे गुरुजी सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेच्या मध्यमागी असतात. अशातच मागील महिन्यात नाशिकात भिडे गुरुजींनी आंब्याचे वक्तव्य केले होते. भिडे … Read more