सांगलीत गायीला दुधाचा अभिषेक, मंत्र्यांच्याच दूध संघांना सरकारी अनुदान; गोपीचंद पडळकरांचा आरोप

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ‘राज्यातील दूध उत्पादक अडचणीत असताना सरकारमधील मंत्र्यांनी स्वतःच्याच दूध संघातील दूध खरेदी करून अनुदान लाटले. दूध उत्पादक उपाशी असताना सरकार मात्र तुपाशी आहे,’ अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर केली. त्यांनी आटपाडी येथे गायीला दुधाचा अभिषेक घालून आणि गायींसह रस्त्यावर ठिय्या मारून दूध दरवाढीचे आंदोलन केले. राज्यात दूध … Read more

बापरे !! बकऱ्याच्या डोक्यावर आहे चंद्राची कोर, त्याची किंमत वाचून व्हाल थक्क

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. देशात अनेक ठिकाणी सण उत्सवावर बंदी घातली आहे. देशात आता बकरी ईदचा माहोल आहे. सांगली मध्ये सुद्धा ईदचा मोठा माहोल आहे. त्या भागातील एका बकऱ्यांची चर्चा सर्वत्र होत आहे. सांगलीमध्ये एक बकरा आहे त्याच्या कपाळी चंद्रकोर आहे त्यामुळे त्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याची किंमत दीड … Read more

धक्कादायक! नशेच्या आहारी गेलेल्या मुलाच्या डोक्यात शिक्षक बापाने घातला रॉड

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे नशेच्या आहारी गेलेल्या मुलाने शिक्षक असलेल्या बापाकडे साडेतीन लाख रुपयांसाठी तगादा लावला होता. याशिवाय राहते घर नावावर करून द्यावे, यासाठी तो रोज घरात आई-वडिलांशी वाद घालत होता. अखेर मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाने झोपेतच मुलाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला. दोन अज्ञात तरुणांनी मुलावर हल्ला केल्याचा बनाव करून … Read more

माझ्याकडे रागाने का बघतोस? म्हणत जावयाचा सासऱ्यावर वस्ताऱ्याने खूनी हल्ला; नुकताच झालाय प्रेमविवाह

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे रागाने का बघतोस? अशी विचारणा केली असता जावयाने सासऱ्यावर वस्तारा मारून खूनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना कामेरी येथे भरदुपारी घडली. याप्रकरणी सुशांत शंकर जाधव याच्याविरोधात इस्लामपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कामेरीयेथे संभाजी गोंधळी हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. एका महिन्यापुर्वी संभाजी गोंधळी यांची मुलगी ऋृतुजा … Read more

राष्ट्रवादीच्या नेत्याच्या खुनाचा २४ तासांच्या आत छडा; पाच जणांना अटक

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे कुपवाड एमआयडीसी मध्ये काल शुक्रवारी भर दुपारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या खुनाचा उलगडा २४ तासाच्या आत करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आलं आहे. पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून निलेश गडदे याने त्यांच्या मित्रांसमावेश थरारक पाठलाग करून निर्घृणपणे दत्तात्रय पाटोळे यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या … Read more

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा १४ वा बळी : मिरजेतील अमननगर येथील ५४ वर्षीय व्यक्तीचा झाला मृत्यू

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे मिरजेत दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच आज मध्यरात्री मिरजेतील कोरोनाचा पहिला गेला आहे. सोमवारी मध्य रात्रीच्या सुमारास मिरज – मालगाव मार्गावरील अमननगर येथील ५३ वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी मिरज तालुक्यातील मालगाव येथील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. सोमवारी मध्यरात्री कोरोनाचा मिरज शहरात पहिला … Read more

छत्रपतींच्या पादुका घेऊन येणाऱ्या ‘त्या’ शिवभक्तांवर गुन्हा दाखल; पंढरपुरात येणं पडलं महागात 

सोलापूर प्रतिनिधी । आषाढी एकादशी म्हणजे विठ्ठलभक्तांचा जणू स्नेह मेळावाच असतो. वारीसोबत विठ्ठलाला भेटण्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात येत असतात. मात्र यावर्षी वारी रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र मानाच्या पालख्या वाहनातून नेण्यात येणार होत्या. अशावेळी विनापरवाना सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा तालुक्यातील शिरशी येथील संदीप महादेवराव महिंद्र, योगेश उत्तमराव महिंद्र, तसेच पंढरपूर येथील किरण घाडगे हे पंढरपूर … Read more

गर्भवती महिलेने ग्रहणातील अंधश्रद्धा दिल्या झुगारुन

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नाने सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरात गर्भवती महिलेने पिढ्यान पिढ्या असणाऱ्या ग्रहणाच्या काळातील विविध अंधश्रद्धा झुगारल्या. इस्लामपुरातील महात्मा फुले कॉलनी मधील गर्भवती महिला सौ. समृद्धी चंदन जाधव यांनी ग्रहणाच्या काळात भाजी चिरणे ,फळे कापणे, झाडांची फळे पाने तोडणे, अन्न खाणे, पाणी पिणे, हाताची घडी घालणे यासह विविध शारीरिक हालचाली … Read more

कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीचे द्विशतक; आत्तापर्यंत 206 जणांना डिस्चार्ज

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलमधून आज कोरोनामुक्त झालेल्या 8 रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलने योग्य उपचाराने तब्बल 206 रूग्णांना कोरोनामुक्त करण्यात यश प्राप्त केले असून, कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीचे द्विशतक पार केले आहे. दक्षिण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कोरोनाने मोठा हाहाकार निर्माण केला. अगदी पहिल्या … Read more

मेहुण्यानेच केली साथीदारांसह ७० हजारांची चोरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत भावजीच्या घरी पाळत ठेवुन मेहुण्याने त्याच्या दोघा साथीदाराच्या मदतीने 70 हजारांची चोरी केली होती. तीन महिन्यांनी या चोरीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीसांना यश आले. निर्मलकुमार ऊर्फ बबन बापुसो गायकवाड आणि दिपक बाळासाहेब पाटील या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सांगलीचे आमदार गाडगीळ यांचे … Read more