Saturday, March 25, 2023

माझ्याकडे रागाने का बघतोस? म्हणत जावयाचा सासऱ्यावर वस्ताऱ्याने खूनी हल्ला; नुकताच झालाय प्रेमविवाह

- Advertisement -

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

रागाने का बघतोस? अशी विचारणा केली असता जावयाने सासऱ्यावर वस्तारा मारून खूनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना कामेरी येथे भरदुपारी घडली. याप्रकरणी सुशांत शंकर जाधव याच्याविरोधात इस्लामपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कामेरीयेथे संभाजी गोंधळी हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. एका महिन्यापुर्वी संभाजी गोंधळी यांची मुलगी ऋृतुजा हिने गावातील सुशांत जाधव याच्याबरोबर पळून जावून लग्न केले आहे. तेव्हापासून सुशांत जाधव हा संभाजी गोंधळी यांच्याकडे रागाने बघणे, गाडी रेस करणे असे प्रकार करीत होता.

रविवार १२ जुलै रोजी दुपारी 12 च्या सुमारास संभाजी गोंधळी व त्यांचा भाऊ सतिश गोंधळी हे दोघे दुचाकीवरून कामेरी येथून इस्लामपूरला येत होते. सुशांत जाधव याच्या सलूनच्या पानटपरीमध्ये तंबाखू खाण्यासाठी संभाजी गोंधळी थांबले होते. त्यावेळी सुशांत जाधव हा त्यांच्याकडे डोळे वटारून बघत होता. माझ्याकडे रागाने का बघतोस? अशी विचारणा करताच सुशांतने तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणत दाडी करण्याचा वस्तरा घेवून गोंधळी यांच्या अंगावर धावला. त्यावेळी गोंधळी यांनी हात मध्ये घातला असता त्यांच्या डाव्या हातावर जखम झाली. याबाबतची फिर्याद संभाजी गोंधळी यांनी दिली आहे. अधिक तपास अभंगे करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.