मुंबईत ‘नाईट लाईफ’चा मार्ग मोकळा; २६ जानेवारीपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात होणार

टीम हॅलो महाराष्ट्र । आदित्य ठाकरे यांचं मुबंईत ‘नाईट लाईफ’ सुरु करण्याचं स्वप्न आता सत्यात उतरत आहे. येत्या २६ जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरु करण्याला संमती देण्यात आली आहे. नाईट लाईफची संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. आता या संकल्पनेला शासनाने हिरवा कंदील असून आदित्य यांचं स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने पहिलं पाऊल पडलं … Read more

तुमची ‘दिशा’ चुकली आहे? आदित्य ठाकरेंनी दिलं अवधूत गुप्तेच्या प्रश्नाला मिश्किल उत्तर

संगमनेर येथे आयोजित मेधा महोत्सवात ‘सवांद तरुणाईशी’ कार्यक्रमात दिग्दर्शक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी महाराष्ट्रातील तरुण आमदारांची ही मुलाखत घेतली. या कार्यक्रमात धीरज देशमुख, आदिती तटकरे, आदित्य ठाकरे, रोहीत पवार, झिशान सिद्दीकी, ऋतुराज पाटील हे सर्व तरुण आमदार सहभागी झाले होते. यावेळी सर्व आमदारांनी दिलखुलास चर्चा करत अनेक प्रश्नांची उत्तरं दिली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात इंदिरा गांधींबद्दल आदर होता – आदित्य ठाकरे

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानाबाबत आदित्य ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ”संजय राउत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. संजय राऊत किंवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्वतः इंदिरा गांधींबद्दल आदर होता. त्यामुळे कोणत्याही शिवसैनिकाकडून त्यांच्याबद्दल अपशब्द येणार नाही.” अशी प्रतिक्रिया प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरे यांनी वादावर पडदा टाकण्याचं प्रयत्न केला

संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर आदित्य ठाकरेंचा उदयनराजें संदर्भातील ‘तो’ व्हिडियो व्हायरल

मागील काही दिवसांपासून माजी खासदार उदयनराजे भोसले आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात शिवाजी महाराज या विषयावरून चांगलीच जुगलबंदी रंगल्याचं पहायला मिळत आहे. एकमेकांवर तुफान टीकाटिप्पणी केल्यानंतर आता शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा एक जुना व्हिडियो व्हायरल केला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे पाटणमध्ये आले असताना त्यांनी ‘मी उदयनराजेंचा फॅन असल्याचं सांगितलं होतं.’ पाहुयात काय आहे नक्की या व्हायरल व्हिडियोत..

आदित्य ठाकरे यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश

मुंबई | पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे यांचा समावेश होणार की नाही अशी चर्चा सुरू होती. अखेर आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांना राज्यमंत्री पद मिळेल अशी शक्यता असताना … Read more

नव्या महाराष्ट्राची नवी समिकरणं, सुप्रिया सुळेंनी शेअर केला ‘हा’ फोटो

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी शुक्रवारी भाजप सोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भुमिका स्पष्ट करत ती अजितची वयैक्तिक भुमिका असल्याचे सांगितले. With Aaditya Thackeray (@AUThackeray) and Rohit Pawar (@RohitPawarOffic) pic.twitter.com/VzFNjpNb3W — … Read more

राज्यात कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट, राज्यपालांची राष्ट्रपतींना शिफारस?

विशेष प्रतिनिधी | राज्यातील राजकिय वातावरण चांगलेच तापले असून कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट लागू शकते अशी चर्चा सुरु आहे. राज्यपाल यांनी राष्ट्रपतींकडे आपला अहवाल पाठवला असून राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात शिफारस केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सोमवारी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. राज्यपालांनी राष्ट्रवादीला मंगळवार संध्याकाळी ८:३० … Read more

संजय राऊत लिलावतीतूनच सोडतायत शब्दांचे बाण, कोणाला लिहितायत पत्र?

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळावं यासाठी राऊत यांनी मागील आठवडाभर जबाबदारीची भुमिका घेत सेनेची बाजू लावून धरली आहे. मात्र सोमवारी छातीत दुखत असल्याने राऊत लिलावती रुग्नालयात दाखल झाले होते. राऊत रुग्नालयात दाखल झाल्यानंतर राज्यभर त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. आता शिवसेना पक्ष … Read more

गिरीश महाजनांच्या शुभेच्छांमुळे अजित पवार मुख्यमंत्रीपदाच्या वाटेवर..!!

Ajit Pawar set to become CM. Maharashtra Governor called NCP to form the government in maharashtra.

Breaking | संजय राऊत लिलावती रुग्नालयात दाखल

दिल्ली | शिवसेना नेते संजय राऊत लिलावती रुग्नालयात दाखल झाले आहेत. राऊत यांनी आज दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर राऊत रुग्नालयात दाखल झाले आहेत. संजय राऊत मागील काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. महाराष्ट्रातील सत्तासमिकरणांबाबत देशभर चर्चा सुरु आहे. यामध्ये राऊत शिवसेनची बाजू मांडताना … Read more