जीवावर उदार होऊन काम करणार्‍या डाॅक्टर, पोलिसांना माझा मानाचा मुजरा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई प्रतिनिधी | राज्यातील सर्व डाॅक्टर अतिशय धेैर्याने कोरोनाविरुद्ध लढत आहेत. मला आपल्या सर्व डाॅक्टरांचा अभिमान आहे. मीया सर्व डाॅक्टरांना मानाचा मुजरा करतो असं म्हणत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेवेवर असणार्‍या सर्व डाॅक्टरांचे कौतुक केले. मी रोज काही डाॅक्टरांशी फोनवर बोलतो. तेव्हा मी त्यांना विचारतो तुम्ही कसे आहात तर तेव्हा ते मलाच म्हणतात तुम्ही … Read more

महाराष्ट्र सरकार ११ हजार कैद्यांना पॅरोलवर सोडणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूपासून बचाव करण्याच्या प्रयत्नांमध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले की ११,००० कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात येणार आहे. ते म्हणाले की, सात वर्षांपेक्षा कमी कारावासाची शिक्षा असलेल्या कैद्यांना सरकार पॅरोलवर सोडेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी आपल्या अधिकृत निवासस्थानी वर्षा लॉन येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेताना राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार … Read more

जीवनावश्यक सेवा मिळणारच, हातावरचं पोट असणाऱ्यांना जपूया – उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज गुढीपाडव्यानिमित्त राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. आता जरी आपण शांततेत गुढीपाडवा साजरा करत असलो तरी ही शांतता काही दिवसांनी जल्लोषात बदलेल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला यावेळी दिला. हातावरचं पोट असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करु नका असं कळकळीचं आवाहन यावेळी उद्धव ठाकरे … Read more

संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील नागरिकांचे आभार मानले. सर्वजण शासनाच्या सूचनांचे पालन करत आहेत, स्वतःची काळजी घेत आहेत असे म्हणत ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच कोणीही घाबरून जाऊ नये, संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे असे म्हणत ठाकरे यांनी नागरिकांना विश्वास दिला. पाहुयात मुख्यमंत्री ठाकरे नक्की काय म्हणालेत – … Read more

संचारबंदीच्या काळात काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार? घ्या जाणून

टीम, हॅलो महाराष्ट्र । कोरोना व्हायरसचे वाढते संकट ध्यानात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यात संचारबंदी लागू केली आहे. यामुळे आता जीवनावश्यक गोष्टी वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. त्याचसोबत जिल्ह्याच्या सीमा सुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. राज्यावर बिकट परिस्थिती आणायची नसेल तर सरकारचे निर्देश काटेकोरपणे ऐका असं आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. … Read more

Big Breaking | संपुर्ण महाराष्ट्रात लाॅकडाऊन जाहीर, आज मध्यरात्रीपासून कलम १४४ लागू – ठाकरे

मुंबई | करोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी राज्यात कलम १४४ लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आज मध्यरात्रीपासून संपूर्ण ३१ मार्चपर्यंत राज्यात लॉकडाउन करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनता कर्फ्यूनंतर सुद्धा न घराबाहेर पडण्यास सांगितलं आहे. राज्यातील एसटी, खासगी बस, मेट्रो, लोकल गाड्या बंद राहतील. मात्र, जीवनावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. … Read more

कोरोनाच्या संकटात माणुसकी सोडू नका – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई | कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कोरोनासोबत आपण युद्ध लढत आहोत. या कोरोनाच्या संकटात माणुसकी सोडू नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. माणुसकीच्या अाधारेच आपण हे युद्ध लढत आहोत. तेव्हा या संकटाच्या काळात तुम्ही माणुसकी सोडू नका असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी … Read more

सिंगापूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी उद्धव ठाकरे आले धावून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात करोनाने थैमान घातलं असून फिलिपाईन्समध्ये शिक्षण घेणारे ३० भारतीय विद्यार्थी सिंगापूरमध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना भारतात सुखरुप आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे सरसावले आहेत. उद्धव ठाकरे स्वतः सिंगापूरमधील भारतीय वाणिज्य दूतावासाशी संपर्कात आहेत. ३० जणांच्या या गटामध्ये काही विद्यार्थी हे डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंगापूरमध्ये … Read more

शहीद जवानांच्या वीरपत्नींना ठाकरे सरकारकडून ‘हे’ गिफ्ट

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शहीद जवानांच्या वीरपत्नींना घरफळा माफ करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. सरकार शहीद जवानांच्या कुटूंबियांसमवेत कायम आहे. अशी माहिती राज्याचे वित्तमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहीद जवानांच्या कामाचा आदर करत वीरपत्नींचा गौरव करण्याच्या उद्देशानव आम्ही हा निर्णय घेतला आहे. वीरपत्नींचा … Read more

मुंबई-गोवा महामार्गाला कान्होजी आंग्रे यांचं नाव द्या : खासदार संभाजीराजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

भाजपाचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबई-गोवा महामार्गाला स्वराज्याचे नौदल प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली आहे.