मुंबईकरांना दिलासा! वाडिया रुग्नालय नेहमीप्रमाणे सुरु राहणार, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील लहान मुलांवरील वैद्यकीय उपचार करणारे वाडिया रुग्णालय सुरू राहण्याच्या दृष्टीने बैठक घेऊन मध्यस्थी केली. त्यामुळे वाडिया रुग्णालय आता नेहमीप्रमाणे रुग्णांच्या सेवेत राहणार आहे असे ठाकरे य‍ांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मुंबईतील लहान मुलांवरील वैद्यकीय … Read more

साईबाबा जन्मस्थळ पाथरीसाठी विकास निधी उपलब्ध करुन देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिर्डी येथील साईबाबांचे जन्मस्थळ असलेल्या पाथरीचा विकास करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत निधी उपलब्ध करुन देणार असून परभणी जिल्ह्यातील विविध समस्या,अडचणी लोकप्रतिनिधी व शासनाच्या समन्वयाने चर्चेतून सोडविण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून औरंगाबाद येथे आयोजित परभणी जिल्ह्यातील विविध समस्या तसेच अडचणीबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते.

जेएनयूचा हल्ला पाहून मला २६/११ ची आठवण झाली – उद्धव ठाकरे

जेएनयू मध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

खातेवाटप जाहिर! पवारांकडे अर्थ तर देशमुखांकडे गृह, नाराज सत्तारांना मजबुत खाती

मुंबई | गेल्या सहा दिवसांपासून रखडलेलं मंत्रिमंडळाचं खातेवाटप आज जाहीर करण्यात आलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खातेवाटपाला मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटप जाहीर केलं असून अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन, अनिल देशमुख यांच्याकडे गृह, एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आणि आदित्य ठाकरे … Read more

शरद पवारांमुळे अनिल बाबरांचे मंत्रिपद हुकले?

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे राज्याच्या मंत्रिमंडळावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पगडा असून त्यांच्या सल्ल्यानेच शिवसेनेनेही आपले मंत्री ठरविल्यामुळे शिवसेनेत संतापाची लाट पसरली आहे. शरद पवार यांच्या हस्तक्षेपामुळेच राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या महत्वाच्या नेत्यांना मंत्रिपदे देण्यात आलेली नाहीत यामुळेच खानापूर-आटपाडीचे आ.अनिल बाबर यांचे मंत्रिपद हुकल्याचे विश्‍वासनीय वृत्त आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या … Read more

अब्दुल सत्तारांना ग्रामविकास तर बच्चू कडूंना शालेय शिक्षण व कामगार; पहा संपूर्ण खातेवाटप

मुंबई | कृषी खाते कोणाकडे जाणार यावरून काँग्रेस व शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू होती. अखेर कृषी खाते शिवसेनेकडे गेले आणि शिवसेनेचे दादा भुसे कृषी मंत्री झाले. खाते वाटपा संबंधी अधिकृत घोषणा झाली नसली तरी सूत्रांकडून मिळालेली यादी अंतिम मानली जात आहे. अजित पवार आणि जयंत पाटील यांना कोणते खाते मिळाले हे अद्याप स्पष्ट झाले नसले … Read more

अब्दुल सत्तारांचा राजीनामा ही अफवा, शिवसेना नेत्याचे स्पष्टीकरण

औरंगाबाद प्रतिनिधी | शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या माध्यमातून समोर आल्या. हे वृत्त समजल्यानंतर सत्तारांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना नेते अर्जुन खोतकर प्रयत्नशील होते. यावेळी अब्दुल सत्तारांचा राजीनामा ही अफवा असल्याचे सांगत खोतकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सत्तार यांना भेटण्यासाठी ते हॉटेल अतिथीमध्ये गेले असता वेगळ्याच गोष्टी … Read more

लग्नाला बोहल्यावर उभं राहण्याआधीच नवरा पळाला, अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यावर भाजप नेत्याची प्रतिक्रिया

पुणे प्रतिनिधी | आता अशा बातम्या येत राहतील अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्यानंतर भाजपमधील नेते अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त करून शिवसेनेवर तोंडसुख घेत आहेत. लग्नाला बोहल्यावर उभं राहण्याआधीच नवरा पळाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते, खासदार गिरीश बापट यांनी दिली आहे. यावेळी तीन पायांच्या सरकारमध्ये काहीही … Read more

अब्दुल सत्तारांना मंत्री करुन उद्धव ठाकरेंनी त्यांचा सन्मान केला पण…

मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. खातेवाटपाआधीच त्यांनी हे पाऊल उचलल्यानं खळबळ उडाली आहे. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोलले जात आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद देऊन त्यांचा सन्मान केला पण सत्तार का … Read more

देशद्रोही अस्लम शेख आता देशभक्त झाले? ; भाजप नेते किरीट सोमय्या यांचे शिवसेनेवर टीकास्त्र

मुंबई | उद्धवा अजब तुझे सरकार, देशद्रोही अस्लम शेख आता देशभक्त झाले, अशा शब्दात भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करून सोमय्या यांनी अशी टीका केली आहे. किरीट सोमय्या यांनी म्हंटले की, 2015 मध्ये काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी याकूब मेमन यांची फाशीची शिक्षा माफ करावी अशी … Read more