ठाण्यामध्ये १८ काँग्रेस नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचे बाळासाहेब थोरातांचे आदेश

गुरुवारी झालेल्या भिवंडी महापौर निवडणुकीमध्ये कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील यांना काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी मतदान करून निवडून दिल्याने काँग्रेसचे बंडखोर इम्रानवली खान यांच्या गळ्यात उप महापौर पदाची माळ गळ्यात पडली. आता यानंतर काँग्रेसचे गटनेते हलीम अन्सारी यांनी थेट ठाणे गाठत पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांच्याकडे काँग्रेस पक्षाचा बनावट व्हीप काढून तो वृत्तपत्रात जाहीर केल्याने याची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.

पी. चिदंमबरम यांच्यावरील कारवाईत आम्ही सूडबुद्धीने वागलो नाही- नितीन गडकरी

आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. पी. चिदंबरम यांनी चौकशीला सहकार्य करावं आणि देश सोडून जाऊ नये या दोन अटींवर त्यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर काँग्रेसने ट्विट करत नेहमी सत्याचाच विजय झाला असल्याचे सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर ‘भाजपा’चे नेते नितीन गडकरी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पी.चिदंबरम यांना केलेली अटक ही सूडबुद्धीतून केलेली कारवाई होती- राहुल गांधी

आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. पी. चिदंबरम यांनी चौकशीला सहकार्य करावं आणि देश सोडून जाऊ नये या दोन अटींवर त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर काँग्रेसने ट्विट करत नेहमी सत्याचाच विजय झाला असल्याचे सांगितले आहे.

बुलेट ट्रेन मोदींची प्राथमिकता असू शकेल, देशाची नाही! काँग्रेसने साधला मोदींवर निशाणा

बुलेट ट्रेन ही मोदींची प्राथमिकता असू शकेल देशाची नाही, असा टोला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे. महाविकास आघाडीचे सरकार येताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला बुलेट ट्रेनला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच मुद्यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसची मदत घेत होते; सुमित्रा महाजन यांचा भाजपला घरचा आहेर

मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार कार्यरत असताना राज्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे आणि विकासाचे विषय मी उपस्थित करू शकत नव्हते. त्यावेळी मला मौन बाळगावे लागले. कारण, राज्यात माझ्याच पक्षाची अर्थात भाजपची सत्ता होती, अशी खळबळजनक खुलासा खुद्द माजी लोकसभाध्यक्ष आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांनी केला आहे. रविवारी रात्री एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच महत्त्वाचे, विकासाचे मुद्दे उपस्थित करण्यासाठी कधीकधी मला काँग्रेसच्या नेत्यांचीच मदत घ्यावी लागत होती, अशीही खंत त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

शिवसेनेने शेवटी रंग दाखवायला सुरुवात केलीच! किरीट सोमय्या यांची सरकारवर ट्विटरद्वारे टीका

राज्यातील सत्तांतर नाट्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केलं. भाजपाला सर्वाधिक जागा मिळूनही विरोधी बाकांवर बसावं लागलं आहे. त्यामुळे भाजपा नेते शिवसेनेविरोधात आक्रमक पवित्रा घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. आरे मेट्रो कारशेड प्रकल्पाला स्थगिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. तसेच अन्य प्रकल्पांबाबतही फेरविचार करणार असल्याचं सांगितले यावरुन भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर ट्विटरद्वारे जहरी टीका केली आहे.

‘भाजपा’ने राज्यावर तब्बल पावणे ७ लाख कोटींचा कर्जाचा डोंगर उभा केला आहे – नितीन राऊत

तब्बल एक महिन्याच्या सत्ता नाट्यानंतर अखेर राज्यामध्ये सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीने राज्यात सरकार स्थापन केले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत काँग्रेसचे २ , राष्ट्रवादीचे २ आणि सेनेच्या २ आमदारांनी देखील शपथ घेतली.

बुलेट ट्रेन बासनात गुंडाळायची हीच ती वेळ! मनसे आमदाराने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तब्बल एक महिन्यांच्या सत्ता नाट्यानंतर शिवसेना आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत आली आहे. शिवसेनेने आता भाजपच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय आणि मंजूर केलेल्या प्रकल्पाचे परीक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यात मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनसह राज्यातील अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बुलेट ट्रेन संबंधी थेट आव्हान केलं आहे.

विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे नाना पटोले बिनविरोध

मुंबई प्रतिनिधी | विधानसभा अध्यक्षपदी कोणाला निवडले जाईल याबाबत उत्सुकता होती. काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी आमदार नाना पटोले रिघणात होते तर भाजप कडून कथोरे रिंगणात होतर. मात्र रविवारी भाजपने आपला उमेदवार मागे घेतल्याने पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी आमदार नाना पटोले यांची निवड करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली … Read more

आपापल्या नेत्यांना, आईला वंदन करत पार पडला महाविकासआघाडीचा शपथविधी

महाराष्ट्रातील नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी गुरुवारी संध्याकाळी शिवाजी पार्क येथे दिमाखात पार पडला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मिळून घेतला. यावेळी प्रत्येक नेत्याने घेतलेली शपथ ही चांगलीच लक्षात राहणारी होती.