माझ्यावर जी कारवाई करायची आहे ती करा, मी सत्य बोलतच राहीन – प्रियांका गांधी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या उत्तर प्रदेश सरकारला कोरोना परिस्थिती हाताळण्यास अपयश आले असल्याची टीका केली होती. त्यांच्या वारंवार होणाऱ्या टीकेमुळे भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. याला उत्तर देताना प्रियांका गांधी यांनी आता जी कारवाई करायची आहे ती कर, मी इंदिरा गांधींची नात आहे. असे म्हंटले आहे. आपल्या ट्विटर … Read more

संजय राऊतांनी काँग्रेसचे प्रवक्तेपद स्वीकारले आहे का? राधाकृष्ण विखे- पाटलांचा पलटवार

नवी दिल्ली । काल शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर जळजळीत शब्दांत टीका करण्यात आली होती. विखे-पाटलांसारखी लाचारी अंगात भिनवायला मेहनत करावी लागते, अशी अत्यंत बोचरी भाषा या अग्रलेखात वापरण्यात आली होती. या टीकेला राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी पत्रक प्रसिद्ध करून प्रत्युत्तर दिले. यामध्ये विखे-पाटील यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला आहे. संजय राऊत यांनी आज … Read more

महाविकास आघाडीत काँग्रेस नेत्यांच्या नाराजीवर जितेंद्र आव्हाडांचे सूचक विधान; म्हणाले..

मुंबई । महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेस नेते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. या चर्चेवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज एक विधान केलं आहे. आम्ही सर्वजण बैठकींना एकत्र असतो, प्रेमानं वागतो त्यामुळे काँग्रेस नेते सरकारमध्ये नाराज असल्याचं मला तरी दिसत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. पुण्यात आयोजित बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते … Read more

मुख्यमंत्र्यांना भेटून काँग्रेस नेत्यांची नाराजी दूर; म्हणाले..

मुंबई । महाविकास आघाडीमध्ये निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण मुख्यमंत्री ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. ‘राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमची कोणतीही नाराजी नव्हती. महाविकासआघाडी भक्कम आहे आणि ५ वर्ष चांगलं काम … Read more

‘या’ राज्यातील भाजप सरकारवर अस्थिरतेचं संकट; काँग्रेस सत्तास्थापनेच्या तयारीत

गुवाहाटी । मणिपूरमधील भाजपचे मुख्यमंत्री एम. बिरेन सिंह सरकारवर अस्थिरतेचं संकट घोंगावू लागलं आहे. तीन वर्षांपूर्वी मणिपूरमध्ये सत्तेत आलेलं भाजपप्रणित सरकार अडचणीत आलं आहे. बुधवारी भाजपच्या ३ आमदारांनी राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तर इतर ६ आमदारांनी पाठिंबा काढून घेतला आहे. राष्ट्रीय जन पक्षाचे ४, तृणमूल काँग्रेस १ आणि एका अपक्षाने पाठिंबा काढत काँग्रेसला पाठिंबा … Read more

नाराज काँग्रेसची समजूत काढण्यासाठी शिवसेनेनं धाडले ‘दूत’; अनिल देसाई बाळासाहेब थोरातांच्या भेटीला

मुंबई । महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्णय प्रकियेत स्थान मिळत नसल्याची उघड नाराजी काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली. यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटण्यासाठी वेळही मागितली, मात्र, गेल्या सोमवारी होणारी ही भेट अजून झालेली नाही. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या नियोजित भेटी आधी शिवसेना नेते   अनिल देसाई यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. काँग्रेसचं गाऱ्हाणं … Read more

खाटेचं कुरकुरणं ऐकून तर घ्यावं; बाळासाहेब थोरातांचा संजय राऊतांना सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठकीसाठी मागणी करत आहे. यासंदर्भात सामना मध्ये एक अग्रलेख छापून आला आहे. या अग्रलेखात काँग्रेसला उद्देशून खाट का कुरकुरते आहे? सत्ता स्थापन होत असताना शिवसेनेने देखील त्याग केला आहे. असे लिहण्यात आले आहे. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हा अग्रलेख अपूर्ण … Read more

.. तर राज्य सरकारचा पाठिंबा काढावा! रामदास आठवलेंचा काळजीपोटी काँग्रेसला सल्ला

मुंबई । काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. मात्र निर्णय घेताना काँग्रेसला विश्वासात घेतले जात नाही. तसं असेल तर काँग्रेसनं राज्य सरकारचा पाठिंबा काढावा,’ असा सल्ला रिपब्लिकन नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसला दिला आहे. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आठवले यांनी महाविकासआघाडी सरकारच्या कारभारावर … Read more

काँग्रेसचे नाराज मंत्री सोमवारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

मुंबई । महाविकास आघाडीमध्ये नाराज असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांची गुरुवारी मुंबईमध्ये बैठक झाली होती. या बैठकीनंतर महाविकासआघाडी सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान देण्यात यावं, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली होती. मात्र, आता काँग्रेस नेते त्यांची तक्रार घेऊन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटायला जाणार आहेत. शुक्रवारी रात्री काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. यावेळी … Read more

सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत स्थान द्या! काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई । राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये नाराज असलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांची आज मुंबईमध्ये बैठक पार पडली. काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांच्या मुंबईतील निवासस्थानी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, सतेज पाटील, नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे मंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर ‘काही प्रश्न नक्कीच आहेत. सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत स्थान मिळायला … Read more