कराड : नांदगाव ग्रामपंचायतीत काका बाबा गटाला धक्का; 10 वर्षांनंतर संत्तांतर, अतुल भोसले गट विजयी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामपंचायतीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विलास काका पाटील-उंडाळकर गटाला धक्का बसला आहे. दहा वर्षानंतर नांदगाव येथे सत्तांतर झाले असून भाजपच्या अतुल भोसले गटाला विजय प्राप्त झाला आहे. नांदगाव येथे सुकरे गुरुजी, पै. दिलीप पाटील, पै. हंबीरराव पाटील … Read more

विठ्ठलवाडीत पृथ्वीराज माने देशमुख पुरस्कृत पॅनलचा दणदणीत विजय; विरोधकांना भोपळा

सोलापूर | जिल्ह्यातील विठ्ठलवाडी येथे पृथ्वीराज माने देशमुख पुरस्कृत पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. ग्रामपंचायतीच्या सर्व 7 जागांवर एकहाती सत्ता मिळवण्यात माने – देशमुख यांच्या पॅनलला यश मिळाले आहे. विरोधकांना भोपळाही फोडता न आल्याने गावात देशमुख गटात जल्लोष साजरा केला जात आहे. विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीत युवा नेते पृथ्वीराज देशमुख यांनी आपल्या कुटुंबातील कोणीही निवडणुक लढवणार नसल्याचा … Read more

कोल्हापुरात शिवसेनेनंही केली कमाल,जिल्ह्यातील मिणचे ग्रामपंचयातीवर शिवसेनेचा झेंडा

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांमुळे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचे चित्र क्षणाक्षणाला बदलत आहे. आता हातकणंगले तालुक्यात जनसुराज्य पाठोपाठ शिवसेनेने कमाल करुन दाखविली आहे. येथील मिणचे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. याठिकाणी शिवसेनाप्रणित प्रवीण यादव युवा शक्ती आघाडीने 13 पैकी 10 जागांवर बाजी मारली. या विजयानंतर मिणचे गावात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलाल … Read more

ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीमागे राजकीय हेतू नाही; हसन मुश्रिफांचे अण्णा हजारेंना पत्र

मुंबई । जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती करण्याच्या राज्य सरकाराच्या आक्षेप घेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफांना पत्र लिहिले होते. या पत्राला आज हसन मुश्रिफांनी पत्राद्वारे उत्तर देत ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीमागे कुठलाही राजकीय हेतू नसून सदर लोकशाही मार्गाने नियुक्त्या करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केलं. ग्रामविकास मंत्री मुश्रिफांनी अण्णा हजारेंना लिहलेल्या पत्रात म्हटलं कि, … Read more

ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे निगडी, राजेवाडीचे ग्रामस्थ संतप्त; ग्रामस्थांनी काढला आक्रोश मोर्चा

सातारा प्रतिनिधी । राज्यातील अनेक ठिकाणी ग्रामीण भागात अजूनही रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध झालेल्या नाहीत. साताऱ्यातील निगडी ग्रामपंचायतीमध्ये कर्मचारी आणि स्थानिक प्रशासनाकडून ज्या त्या वेळी वीज आणि पाण्याचा विषय हाताळला जात नसल्याने लोकांच्या समस्यांत वाढच होत असल्याचं चित्र पहायला मिळालं. मागील ५ दिवसांपासून गावात पाणीच न आल्याने आज संतप्त ग्रामस्थांनी … Read more

परभणीत ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, आपल्या मागण्यांसाठी आता अधिक आक्रमक झाल्या असून, परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना, नगरपालिका आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी देण्यात यावी, तसेच या कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन लागू करावे.

परभणीत जिल्ह्यात नऊ गावांचा मतदानावर बहिष्कार

परभणी प्रतिनिधी। गजानन घुंबरे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून ऑक्टोबर महिन्यांमधील 21 तारखेला संपूर्ण राज्यांमध्ये एकाच दिवशी मतदान होणार आहे. पण मागील पंचवार्षिक मध्ये गावागावात जाऊन पाच वर्षात गाव व तालुक्‍याचा विकासाच्या माध्यमातून कायापालट करण्याचे आश्वासन नेतेमंडळींनी दिले होते. सदरील आश्वासने हवेतच विरले गेल्याने , पाच वर्षानंतर विकासापासून दूर राहिल्याची भावना निर्माण झाल्याने जिल्ह्यातील … Read more