शिवसेनेशी आमचं अजूनही भावनिक नातं कायम- चंद्रकांत पाटील

सांगली प्रतिनिधी । दोन भाऊ भांडून वेगळे रहात असले तरी शिवसेनेशी भावनिक नाते कायम आहे. त्यामुळे भविष्यकाळात भाजप-शिवसेना एकत्र येतील का? की येणार नाही, हे काळच ठरवेल, असं विधान मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. महाविकास आघाडीने आमच्या कारभाराच्या चौकशीची भिती दाखवू नये, चौकशीला आम्ही घाबरत नाही, चौकशी करा पण त्याचा तत्काळ अहवाल सादर … Read more

सरसकट कर्जमाफीसाठी चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूरात काढला हजारो शेतकऱ्यांसोबत धडक मोर्चा

राज्य सरकारने केलेल्या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात भाजपनं कोल्हापूरात जोरदार शक्तिप्रदर्शन करत विराट मोर्चा काढला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा धडक मोर्चा कोल्हापूरच्या दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला आहे. महाविकासआघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी आणि शर्ती रद्द व्हाव्या आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी या प्रमुख मागणीसाठी भाजपनं हजारो शेतकऱ्यांच्या समवेत आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार धडक मोर्चा काढला.

दादा खरं बोलले, मेगाभरतीमुळेच भाजपनं सरकार घालवलं; एकनाथ खडसेंचा भाजपला घरचा आहेर

पाटील यांच्या याच विधानाचा धागा पकडून भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पुन्हा खदखद व्यक्त केली.

माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला; चंद्रकांत पाटील यांनी घेतला मेगाभरती विधानावरून यु-टर्न

”भाजपमध्ये काही मागावं लागत नाही. पक्षासाठी काम करणाऱ्यांना आपोआप मिळतं. ही भाजपची संस्कृती आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी झालेल्या मेगाभरतीमुळं ही संस्कृती कुठंतरी ढासळली. मेगाभरती ही चूकच होती,” असं जाहीर विधान काल चंद्रकांत पाटील यांनी केलं होत.

भाजपमध्ये केलेली मेगाभरती ही चूकच होती- चंद्रकांत पाटील

 पुणे प्रतिनिधी ।  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं अन्य पक्षांतील आमदार व खासदार यांना फोडत आपल्या पक्षात सामील करत तिकीट वाटपाचा धडाकाच लावला होता. भाजपच्या मेगाभरतीवर जेव्हा टीका होत होती त्यावेळी आमच्याकडं वॉशिंग मशीन आहे, असं म्हणण्यापर्यंत भाजपच्या नेत्यांची मजल गेली होती. मात्र, निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानं आणि सत्ता हातची गेल्यानंतर आता भाजपचे नेते चिंतन … Read more

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी पुन्हा चंद्रकांत पाटील?

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी येत्या १५ जानेवारीला निवड प्रक्रिया होणार आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचीच पुन्हा प्रदेशाध्यक्ष पदी निवड होईल असे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यात बहुमत मिळून देखील भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले आहे. पक्षाची सत्ता असताना भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेक दिग्गज नेत्यांची रांग लागली होती. मात्र आता विरोधी बाकावर असताना अनेक … Read more

अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटील म्हणतात…

मुंबई | शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा दिला. सत्तार यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली असून काहींना मात्र यामुळे आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आता सत्तार यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हि पहिली बातमी आहे. आता अशा अनेक बातम्या मिळतील असं … Read more

मी गेलो नसतो तर परळीच्या सभेची तीव्रता आणखी वाढली असती – चंद्रकांत पाटील

आजचं चित्र जरी वेदना देणारा असलं तरी मी गेलो नसतो तर परळीच्या सभेची तीव्रता आणखी वाढली असती” असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

‘पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही’; चंद्रकांत पाटील यांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर भाष्य केले आहे. ‘पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही’ असा सज्जड दम पाटील यांनी दिला आहे. सोलापूरमध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्यावेळी संवाद साधताना ते बोलत होते.

पंकजा मुंडें बद्दलच्या ‘त्या’ सर्व अफवा – चंद्रकांत पाटील

भाजपा च्या मोठ्या नेत्या आणि माजी महीला बाल कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मागील काही दिवसांपासून भाजपा सोडण्याच्या चर्चांना उधाण आले होते. पंकजा मुंडे या त्यांच्या हक्काच्या परळी मतदार संघातून विधानसभेसाठी उभ्या होत्या. मात्र त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या कडून त्यांना पराभव पत्करावा लागला. हा पराभव पंकजा मुंडेंच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंनी आपल्या फेसबूक अकाऊंटवर कार्यकर्त्यांना उद्देशून एक पोस्ट लिहीली, ज्यात सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नवीन विचार करण्याची आवश्यकता असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं.