पुणे कॅन्टोन्मेंट मधील मतमोजणी तहकूब; काँग्रेसने घेतला आक्षेप

महाराष्ट्र विधानसभेसाठीचा निकाल आज जाहीर होणार असून पुणे जिल्ह्यातील कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात मतमोजणी सुरू असताना काँगेस पक्षाने मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे . सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मतमोजणी सुरू असताना काही ईव्हीएम मशीन सील करण्यात आल्या नसल्याचा आक्षेप काँगेस कडून घेण्यात आला आहे. त्यामुळे सुरू असलेली मतमोजणी तहकूब करण्यात आली आहे. काँग्रेसने आक्षेप घेऊन ही मत मोजणी तहकूब केल्यानंतर वरीष्ठ निवडून अधिकारी या मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणी पोहचले आहेत.

नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘युती’ला ‘टफ फाईट’; ७ जागांवर आघाडी

पहिल्या फेरीत जिल्ह्यातील बारा जागांपैकी तब्बल सात जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे. प्राथमिक फेरीचा निकाल भारतीय जनता पक्षासाठी आणि ‘युती’साठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निकालाची उत्सुकता ताणली आहे. पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके दुसऱ्या फेरीत १२०० मतांनी आघाडीवर आहेत. शेवगाव मतदारसंघातून ‘राष्ट्रवादी’चे प्रताप ढाकणे, अहमदनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे संग्राम जगताप हे ६५९ मतांनी आघाडीवर आहेत. तर राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे आघाडीवर आहेत. कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आशुतोष काळे ४०० मतांनी आघाडीवर असून शिर्डीतून ‘भाजपा’चे राधाकृष्ण विखे जवळपास चार हजार मतांनी आघाडीवर आहेत.

साताऱ्याचा बालेकिल्ला राष्ट्रवादी राखणार? ९ फेऱ्यांनंतर ५ ठिकाणचे उमेदवार आघाडीवर

सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांमध्ये चांगलीच चुरस पहायला मिळत आहे. भाजपचे शिवेंद्रसिंहराजे आणि जयकुमार गोरे आघाडीवर दिसत आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने कराड उत्तर, कोरेगाव आणि खंडाळा या तीन मतदारसंघात अपेक्षित आघाडी घेतली आहे. माण-खटावमधून जयकुमार गोरे ५ हजार मतांनी पुढे असून साताऱ्यातही शिवेंद्रसिंहराजे यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

बच्चू कडू अचलपूरमधून आघाडीवर; निकालाची धाकधूक कायम

अचलपूर मतदार संघाची पाचवी फेरी पूर्ण झाली आहे. या फेरीनंतर शिवसेना भाजपा यूतीच्या उमेदवार सूनीता फिसके यांना 2223 मिळाली आहे . तर कॉंग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बबलू ऊर्फ अनिरुद्ध देशमूख यांना 2743 मिळाली आहे. प्रहार अपक्ष उमेदवार बच्चु ऊर्फ ओमप्रकाश कडू 3032 हे मतांनी सध्या आघाडीवर आहेत. निकाला गणिक धाकधूक वाढत आहे.

धनंजय मुंडे परळीचा ‘गड’ राखण्याची चिन्ह; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष!!

परळीतील धनंजय विरुद्ध पंकजा लढतीवर सर्व राज्याचे लक्ष लागलेले असताना धनंजय यांनी मतमोजणीत मोठी आघाडी घेतली आहे. याच आघाडीतून धनंजय मुंडे समर्थक विजयापूर्वीच जल्लोष करत आहेत. धनंजय मुंडे यांनी आतापर्यंत १८ हजार मतदान घेत पंकजा पिछाडीवर टाकले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा विजय निश्चित असल्याचे सांगत कार्यकर्ते विजय साजरा करत आहेत.

वरळीतून बिग ‘बॉस फेम’ अभिजित बिचुकलेंना कमालीचे मतदान!!

बिग बॉस मराठी फेम अभिजित बिचुकले यांनी थेट आदित्य यांना आव्हान दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. बिचुकले यांना किती मतं मिळतील याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती.

राज्याचा पहिला विजयी निकाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने

राज्यावर सत्ता कुणाची याचा फैसला आज मतमोजणीनंतर होणार आहे. राज्यात भाजपच्या बाजूने काहीसा निकाल लागत असताना मात्र सध्या राष्ट्रवादीला सर्वात आधी आनंदाची बातमी मिळाली आहे. राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार विजयी झाला आहे.

नितेश राणे यांनी घेतली आघाडी, शिवसेनेचे कडवे आव्हान अजूनही कायम

सिंधुदूर्ग प्रतिनिधी । देशाला दिशा दाखवणाऱ्या या राज्यावर सत्ता कुणाची याचा फैसलाही मतमोजणीनंतर होणार आहे. कोकणात झालेल्या शिवसेना व राणे कुटुंबीयांतील लढतीत कोण बाजी मारणार? असा सवाल उपस्थित होत होता. निकाल जसे जसे समोर येत आहेत तसे चित्र आता स्पष्ट होत आहे. शिवसेनेने सतीश सावंत यांनी विरोधात उभे असतांना आता नितेश यांनी मतमोजणीत आघाडी घेतली … Read more

त्या पावसानं उदयनराजेंना रडवलं..!! लोकसभा निवडणुकीतील पिछाडीनंतर राजे भावूक

सातारा लोकसभा निवडणुकीत मागील १५ वर्षांमधील मतमोजणीत उदयनराजे पहिल्यांदाच ३० हजार मतांपेक्षा जास्त मतांनी पिछाडीवर पडले आहेत. साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस या त्यांच्या निवासस्थानी शुकशुकाट पसरला असून जनतेचा निर्णय आपल्याला मान्य असल्याचं मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे. मागील २५ वर्षं सक्रिय राहून काम केलं, लोकांनीही भरभरून प्रेम दिलं – लोकशाही आहे.

कर्जत-जामखेडमधून रोहित पवार ‘सुसाट’; राम शिंदे पिछाडीवर

शाला दिशा दाखवणाऱ्या या राज्यावर सत्ता कुणाची याचा फैसलाही मतमोजणीनंतर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपचे राम शिंदे यांना रोहित कडवी लढत देत आहे