नोकरी नसल्याच्या नैराश्येतून पत्नीचा खून करुन पतीनेदेखील केली आत्महत्या

Sucide

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. अनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. तसेच काही लोकांना आपली नोकरीदेखील गमवावी लागली आहे. यामुळे अनेकजण नैराश्यात गेले आहेत. या नैराश्यामुळे अनेक जणांनी टोकाची पावले उचलली आहेत. अशीच एक घटना रत्नागिरी जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये नोकरी नसल्याच्या नैराश्येतून पत्नीचा खून करुन पतीने आत्महत्या केल्याचा … Read more

खुशखबर! राज्याच्या आरोग्य विभागात मेगाभरती; 8500 जागांसाठीची जाहिरात प्रसिद्ध

मुंबई । राज्यातील सार्वजिनक आरोग्य विभागात पदभरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागात मेगाभरती करण्यात येणार असून 8500 जागांसाठी आता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही जाहिरात रिक्त असलेल्या एकूण 17 हजार पदांपैकी 50 टक्के पदांसाठी असणार आहे.आरोग्य विभागाच्या संकेत स्थळावर याबाबतची अधिक माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारने जाहिरात … Read more

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय; नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी मान्य

मुंबई । राज्यातील नोकरभरती आणि पदोन्नतीबाबत लवकच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. कारण आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेकांनी राज्यातील नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबत भाष्य केलं. “नोकर भरतीबाबत मी देखील मागणी केली. गृहखात्याने नोकर भरतीचं परिपत्रक काढलं त्याचप्रमाणे सामान्य … Read more

कोरोना कालावधीत बेरोजगारांमध्ये झाले 16 कोटी रुपयांचे वितरण, कामगार मंत्रालयात दररोज एक हजार अर्ज येत आहेत

नवी दिल्ली । कामगार मंत्रालयाची अटल बीमित व्यक्ती कल्याण योजना (Atal Beemit Vyakti Kalyan Yojna) कोरोनाव्हायरस (Coronavirus Pandemic) काळात ज्यांनी नोकरी गमावली त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध होत आहे. सरकारकडून त्याचे नियम बदलल्यानंतर आणि पगाराच्या 50 टक्के इतक्या लाभाचे प्रमाण वाढवल्यानंतर बेरोजगार लोकांमध्येही याबाबत चांगला ट्रेंड दिसून येतो आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार … Read more

खूषखबर! Flipkart देणार 70 हजार तरुणांना रोजगार; कोणत्याही पदवीची गरज नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ई-कॉमर्स फर्म फ्लिपकार्ट फेस्टीव्ह सीझनमध्ये होणारी विक्री आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या फ्लॅगशीप बिग बिलियन डेज सेल आधी जवळपास ७० हजार जणांना नोकरी देणार आहे. कंपनीने मंगळवारी अशी माहिती दिली की, फ्लिपकार्ट यावर्षी अनेकांना त्यांच्या सप्लाय चेनमध्ये नियुक्त करणार आहे. त्याचप्रमाणे काही अप्रत्यक्ष नोकऱ्या  देखील फ्लिपकार्ट कडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नियुक्त केलेल्या … Read more

Air India मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, १.५० लाख पगार; आजच करा अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एअर इंडियामध्ये काम करण्याची संधी निर्माण झाली आहे. सध्या एअर इंडियाने चीफ फायनान्शियल ऑफिसर साठी अर्ज मागविले आहेत. या अर्जाची अंतिम मुदत ही २२ जुलै असणार आहे. इच्छूक उमेदवार अलायन्स भवन, डोमेस्टिक टर्मिनल-१, आय जी आय एअरपोर्ट, नवी दिल्ली- ११००३ या पत्त्यावर आपला अर्ज पाठवू शकतात. या पदासाठी उमेदवार हा इन्स्टिट्यूट … Read more

कोरोनाकाळात ‘या’ 10 नोकऱ्यांना आहे जास्त मागणी, यासाठीचे स्किल्स फ्री मध्ये शिका; कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगामुळे, जगभरातील बहुतेक देशांमध्ये लॉकडाउन लादले गेले आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर अनेक लोकं त्यांच्या नोकऱ्या गमावत आहेत. त्यामुळे सध्या जगासमोर बेरोजगारीचे एक मोठे संकट उभे राहिले आहे. लोक आता नवीन नोकऱ्यांच्या शोधात आहेत ज्यांना योग्य आणि उत्कृष्ट स्किल्स असणे आवश्यक आहेत. या अशा स्किल्स आहेत ज्या आपण ऑनलाइनही … Read more

आता नोकरीचा ताण जा विसरून ! ‘या’ फळाची लागवड करून कमवा लाखो रुपये, कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या या संकटात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांना मोठाच धक्का बसला आहे. कोरोनामुळे कंपन्यांमध्ये भरती थांबली आहे. अशा परिस्थितीत नोकरी करण्याऐवजी लोक शेतीत हात घालण्याचा विचार करू शकतात. जर आपल्याकडे जमीन असेल तर आपण शेतीतूनही अधिक पैसे कमवू शकाळ आणि आपले जीवन अगदी आरामात जगू शकाल. आज आम्ही तुम्हाला अशाच एका फळाच्या लागवडीबद्दल … Read more

संचारबंदीमध्ये अ‍ॅमेझॉन, ग्रोफर्स, पेटीएममध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यात संचारबंदीमुळे उद्योगधंदे शिथिल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचे चित्र आहे. या  पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खरेदीवर जोर आहे. ई कॉमर्स कंपन्यांना चांगले दिवस आहेत. अमेझॉन, ग्रोफर्स, पेटीएम सारख्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या कंपन्यांना मनुष्यबळाची आवश्यकता भासते आहे. अमेझॉन कंपनीने साधारण … Read more

कोरोना संकटात नोकरी जाऊनही भरावा लागणार टॅक्स; जाणून घ्या संपूर्ण नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या लॉकडाऊनमध्ये जवळपास सर्वच व्यवसाय ठप्प झाल्यामुळे बहुतेक कंपन्यांना तोटा नियंत्रित करणे कठीण जात आहे. त्याचबरोबर बाजारातील कमी मागणीमुळे उत्पादनही सध्या पूर्वीप्रमाणे केले जात नाही आहे. अशा परिस्थितीत कंपन्या रिटायरमेंटच्या जवळ असलेल्या कर्मचार्‍यांना अकाली सेवानिवृत्ती (व्हीआरएस) देऊन आपली आर्थिक जबाबदारी कमी करत आहेत. त्याचबरोबर कंपन्या काही तरुण कर्मचार्‍यांना … Read more