पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार पार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे जिल्हयात आज एकूण १७३३ स्वॅब संकलित करण्यात आले होते. यापैकी २०८ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले आहेत आणि याबरोबरच पुण्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४१०७ इतकी झाली आहे. पैकी १६९८ प्रकरणे सध्या कार्यान्वित आहेत. यापैकी ४४ रुग्ण हे व्हेंटिलेटर वर आहेत तर १२५ रुग्ण आयसीयू मध्ये आहेत. आज पुण्यातील १५९ रुग्ण बरे … Read more

पुण्याचा गणेशोत्सव यावर्षी पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा होणार

पुणे । गणेशोत्सव तसा महाराष्ट्रात सर्वत्र उत्साहाने साजरा होणारा उत्सव आहे. पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात. गणेशोत्सवातील पुण्याचा झगमगाट न्याराच असतो. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे देशभरात प्रसिद्ध असणारा पुण्याचा ऐतिहासिक गणेशोत्सव पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव मंडळांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात … Read more

कोरोना पार्श्वभुमीवर पुण्याच्या महापौरांनी राज्य सरकारकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

पुणे । देशभरात कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. तुलनेने महाराष्ट्रातील रुग्ण अधिक वाढत आहेत. त्यातही पुणे, मुंबई या दोन शहरातील रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे यंत्रणेवरचा ताण वाढतो आहे. पुणे शहरात रोज मोठ्या प्रमाणात स्वॅब तपासणीसाठी घेतले जात आहेत. मात्र वाढत्या चाचण्यांमुळे स्वॅब तपासणीचे अहवाल उशीरा येत आहेत. म्हणून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य … Read more

पुण्यात कोरोनामुळे आत्तापर्यंत ४४ जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या वेगाने वाढणार्‍या संसर्गामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती सतत खालावत चालली आहे. गुरुवारी महाराष्ट्रात किमान १६५ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहे.यात मुंबईतील १०७, पुण्यातील १९, ठाण्यातील १३, नागपूरचे ११, नवी मुंबई व वसई-विरार प्रत्येकी दोन, पिंपरी चिंचवड आणि मालेगाव, अहमदनगर, चंद्रपूर आणि पनवेलमधील प्रत्येकी एक यांचा समावेश आहे. त्याचवेळी पुण्यात उशिरा रात्री … Read more

Breaking | दिलासादायक! पुण्यात आणखी ५ कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज

पुणे । पुण्यातील दिवसभरातील निराशेच्या बातम्यांमध्ये एक दिलासा देणारी बातमी आलीय. नायडू रुग्णालयातून आणखी पाच कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. पाचही नागरिक पूर्वीच्या कोरोनामुक्त अंगणवाडी सेविकेच्या कुटुंबातील सदस्य आहेत. अंगणवाडी सेविकेच्या कुटुंबातील सहा सदस्य कोरोनामुक्त झालेत. ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’ हे पण वाचा – कोरोनाचा … Read more

बंद फ्लॅटमध्ये उच्चशिक्षित तरुणीचा बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ

मूळ बीडची असलेली ३० वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तिचा मृतदेह सिंहगड रोडवरील माणिकबाग भागात असलेल्या एका बंद फ्लॅटमध्ये आढळला. तरुणीच्या गळ्यावर दाबल्याच्या खुणा सापडल्याने तिची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पुणे : जागतिक एड्स दिनानिमित्त ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये टोकन सिस्टीमचे उदघाटन

दिनांक 2-12-2019 रोजी बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे तर्फे चालवल्या जाणाऱ्या सेंटरमध्ये जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला . आजारासंबंधी जनतेमध्ये जनजागृतीच्या उद्देशाने सामूहिक प्रभातफेरी काढण्यात आली , तसेच एड्स बाधित रुग्णांशी भेदभाव न करण्यासाठीची शपथ घेऊन मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते .

भाजपची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीचा प्लान, तुकाराम मुंढे पुणे महापालिकेच्या आयुक्त पदी?

पुणे प्रतिनिधी | राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्यात गल्ली ते दिल्ली जोरदार राजकारण सुरू झाले आहे. पुणे महापालिकेत सत्तेवर असलेल्या भाजपला वेसण घालण्यासाठी महापालिका आयुक्तांची बदली करून एखादा खमका अधिकारी येथे आणावा, असा आग्रह मागणी महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी राज्य पातळीवरील नेत्यांकडे धरला आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांना महिनाभरात … Read more

अग्निशमन दलाचे जवान ठरले देवदूत

पुणे प्रतिनिधी। पाण्याचा लोट पर्वती भागातील मित्र मंडळ चौकाजवळ असलेल्या आनंदी बंगल्यात शिरला. पाण्याचा वेग पाहता बंगल्यातून बाहेर पडणे शक्य झाले नव्हते. अशा परिस्थितीत बंगल्यात राहणारे नातू कुटुंबीयांच्या दृष्टीने अग्निशमन दलाचे जवान देवदूत ठरले. दहा महिन्यांच्या बालकासह पाच जणांची सुटका जवानांनी केली. मित्रमंडळ चौकात आनंदी बंगल्यात पाणी शिरल्याची माहिती बुधवारी रात्री जवानांना मिळाली. बंगल्यात दहा … Read more

धक्कादायक ! पुराच्या पाण्यात वृद्ध महिला गेली वाहून

पुणे प्रतिनिधी | पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामधील खळद येथील कौशल्या चंद्रकांत खळदकर वय – ७४ या कऱ्हा नदी पात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या असता पायाखालाचा दगड सटकल्याने त्या पुराच्या पाण्यात पडून वाहून गेल्या आहेत. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून प्रशासनाने नागरीकांनासतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. अकलूजमध्ये शेळ्यांची चोरी करणाऱ्या टोळीला नागरिकांनी विवस्त्र करून दिला चोप ( पहा … Read more