काश्मीरचं वादळ आज महाराष्ट्राला धडकणार; नामग्याल विरुद्ध ठाकरे जुगलबंदी रंगणार

पुण्यात आज राजकीय धुमश्चक्री होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे मंगळवारीच पुण्यात दाखल झाले आहेत. उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांचं उद्घाटन केल्यानंतर आज राज ठाकरेंची सभा आज पुण्यात होत आहे. दुसरीकडे चंद्रकांतदादा पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत ज्यापद्धतीने भाजपने बालाकोट मुद्दा उपस्थित केला होता, त्याच धरतीवर विधानसभा निवडणुकीत काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. लडाखमधील जामयंग त्सेरिंग नामग्याल या खासदाराला सोबत घेत भाजपच्या वतीने पुण्यात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 

बंडखोरीचा फटका अदिती तटकरेंना बसणार? श्रीवर्धन मध्ये काँग्रेसच्या ३ बंडखोरांचे अर्ज कायम

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आदिती तटकरे यांच्या विरोधात काँग्रेसच्या तीन बंडखोर उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवले आहेत. त्यामुळे तटकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवसेनेबरोबर आता काँग्रेसच्या बंडखोरांना थोपविण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे.

अंबरनाथमधील बंड शमले; राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराचा काँग्रेसला पाठिंबा

अंबरनाथ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने काँग्रेस उमेदवाराला समर्थन जाहीर केल्याने काँग्रेस राष्ट्रवादीत निर्माण झालेला तिढा अखेर सुटला. दोन्ही पक्षाच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेत या वादावर पडदा टाकण्यात आला.

खामगावात आमदार आकाश फुंडकर यांच्या समर्थनार्थ मुस्लिम समाजाचा विजय संकल्प मेळावा

भाजपा-शिवसेना महायुतीचे खामगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार आकाश फुंडकर यांच्या समर्थनार्थ खामगाव येथील श्रीहरी लॉन्स येथे मुस्लिम समाजाचा भव्य मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला मुस्लिम सामाजातील अनेकांची उपस्थिती होती. या मेळाव्याला आमदार फुंडकर यांनी संबोधित करत ‘आमदार नव्हे तर कामदार बनून काम करण्याचा माझा संकल्प’ असल्याचे सांगितले.

नाशिकमध्ये विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे केले नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा निवडणूक यंत्रणा मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत आहे. जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु आहे. यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा. यासाठी मालेगाव येथील नाना मुंदडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करुन लोकांना मतदान करण्याच आवाहन केले. यावेळी सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

मतदान केंद्र शोधताय? गूगल करा..

लोकसभा निवडणुकीत पुण्यामध्ये निचांकी मतदान झाल्याचा कटू अनुभव असल्याने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी यंदा प्रथमच मतदान केंद्रे ही ‘गुगल टॅग’ करण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदारांना घराजवळची मतदान केंद्रे समजू शकणार आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांना गुगल मॅपमध्ये टॅग करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांना मतदान केंद्र कोठे आहे; तसेच किती अंतरावर आहे, हे समजणार आहे.

पूर्व विदर्भातील तेली समाजाची नाराजी ‘भाजपा’ला भोवणार ?

राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (कामठी), तुमसरचे आमदार चरण वाघमारे आणि माजी खासदार सुरेश वाघमारे या पूर्व विदर्भात बहुसंख्येने असलेल्या तेली समाजाच्या नेत्यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने विधानसभा निवडणुकीत तेली समाजाच्या नाराजीला भाजपला तोंड द्यावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बीड मधील लढतींचे चित्र स्पष्ट, महायुती मधील गेवराईची बंडखोरी वगळता ‘बंड थंड’

गेवराई वगळता बीड जिल्ह्यात ‘महायुती’मधील सर्व बंडखोर नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे बीड मधील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरांनी आपली तलवार म्यान केल्यामुळे पाच मतदार संघात दुरंगी लढत होणार असे चित्र स्पष्ट झाले आहे. तर गेवराई मतदारसंघात शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांच्या अडचणीत वाढल्या आहेत. या मतदारसंघात भाजप – राष्ट्रवादी आणि अपक्ष अशी तिरंगी लढत होईल

तासगाव मतदारसंघ पुन्हा अनुभवतोय आर आर आबांचा करिष्मा, ज्युनियर आर आर पाटील यांची प्रचारात आघाडी

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालेली असताना ज्युनिअर आर आर पाटील अर्थात रोहित पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. निवडणूक प्रचारातील रोहित यांचे मतदार संघात सध्या चांगलेच गाजत आहे. तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार आमदार सुमनताई आर आर पाटील यांचा ढवळी येथे प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी झालेल्या प्रचार सभेत त्यांनी हे भाषण केले.

संग्राम देशमुखांची निवडणुकीच्या रिंगणातून पुन्हा एकदा माघार, राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह

सांगली प्रतिनिधी। जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीतून दुसऱ्यांदा माघार घेतल्यामुळे कार्यकर्ते कमालीचे निराश व संतप्त झाले आहेत. सलग दुसऱ्यांदा त्यांनी तयारी करुन रिंगणातून माघार घेतल्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे सन २०२४ पर्यंत कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवून ठेवण्याचे आव्हान ते कसे पेलणार? यावरच त्यांचे पुढील राजकारण … Read more