अभिजित बिचुकले आमदार होणार? राज्यपालांना पत्र पाठवल्याने चर्चेला उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी बिगबॉस सिझन २ मध्ये सर्वात चर्चेत असणारे नाव म्हणजे अभिजित बिचुकले होय. बिगबॉस च्या घरात जाण्यापासून ते चर्चेत आलेच मात्र त्याआधीही त्यांच्या निवडणुकीला उभे राहण्याच्या जोशामुळे आणि आपण मुख्यमंत्री होणार या आत्मविश्वासामुळे ते चर्चेत होतेच. बिगबॉसच्या घरातही ते अनेकविध कारणांनी वादातीत राहिले. तसेच त्यांनी प्रेक्षकांचे खूब मनोरंजन ही केले. त्यानंतर … Read more

हसन मुश्रीफांनी निकाला आधीच उधळला गुलाल !

विधानसभा निवडणुकीचं मतदान सोमवारी किरकोळ घटना वगळता शांततेत पार पडले. मतदानानंतर आता सगळ्यांचं लक्ष निकालाकडे लागलेलं असताना पुण्यासह राज्यात काही उमेदवारांनी मतदान संपल्यानंतर फटाके फोडून जल्लोष केला. निकाला तीन दिवस बाकी असतानाच उमेदवारांनी फटाके फोडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राज्यात 55 टक्के मतदान, शहरी भागात मतदान घटले

राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीये. अनेक दिग्गजांनी सकाळी सातच्या ठोक्याला मतदानाचा हक्क बजावला. येत्या 24 तारखेला निवडणुकांचे निकाल हाती येतील. 3 हजार 237 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात एकूण ५५ टक्के मतदान झालंय. ग्रामीण भागात अधिक मतदानाची नोंद झालीये. तर शहरी भागात मात्र मतदान कमीच झालं.

परभणी जिल्ह्यात दुपारी ३ पर्यंत ४७.५३ टक्के मतदान, गोदाकाठच्या ७ गावांचा मतदानावर बहिष्कार कायम

जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात मतदान संथ गतीने चालू असुन दुपारी ३ पर्यंत ४७.५३ टक्के मतदारांनी मतदान केले होते. त्यामध्ये जिंतूर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक ५२.८६ टक्के मतदान झाले. त्या पाठोपाठ पाथरी मतदारसंघात ४९.३५ टक्के तर गंगाखेड आणि परभणी विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे ४३.९२ आणि ४३.७४ टक्के मतदान झाले होते. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांचा केंद्रात येण्याचा वेग वाढेल आणि ६० ते ६५ टक्के मतदान होईल अशी अपेक्षा आहे.

अकोला जिल्हयात ३ वाजेपर्यँत ४२.६ टक्के मतदान

जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट, बाळापूर व मुर्तीजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांमधील १७०३ मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजता पासून मतदानास सुरुवात झाली. ढगाळ वातावरण असतानाही मतदारांमध्ये उत्साह दिसून येत असून, सकाळी अकरा वाजेपर्यंत पाचही मतदारसंघांमध्ये सरासरी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यातील पाच मतदारसंघात सरासरी ४२.६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. अकोट- ४५. ४१ टक्के, २९-बाळापूर टक्के, ४६.६३ टक्के, अकोला पश्चिम- ३७.८६ टक्के, अकोला पूर्व- ४०.७१ टक्के, मूर्तिजापूर- ४०.६९ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

मतदारांनो ‘या’ मुलीचा आदर्श घ्या…!

विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. सुट्टी असल्याने अनेक जण मतदान करण्याऐवजी घरीच आराम करण्याचा किंवा बाहेर फिरायला जाण्याच बेत आखतात. मात्र मतदान आपलं कर्तव्य आहे, याचा अनेकांना विसर पडतो. मात्र समाजात अशीही काही मंडळी आहेत, ज्यांना कठीण परिस्थितीतही आपल्या कर्तव्याची जाणीव आहे. दिंडोरी विधानसभा निवडणुकीत पेठ शहरातील खातून मुस्ताक शेख ही दोन्हीही पायानं अपंग आहे. तरीही या मुलीनं आज मतदानाचा आपला हक्क बजावला.

मुंढव्यात बोगस मतदानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस

आज संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. अनेक ठिकाणी शांतपणे आणि शिस्तीत मतदान सुरू असताना काही ठिकाणी मात्र मतदानाला हिंसक स्वरूप आणि बोगसपणाचं गालबोट लागल्याचं निदर्शनास आलं आहे. करमाळा येथे दोन अपक्ष उमेदवारांच्या गटामध्ये धुमश्चक्री झाल्यानंतर पुण्यातील मुंढवा परिसरात बोगस मतदानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मतदान स्लिपवर नाव आणि नंबर असतानाही, कुठल्याच ओळ्खपत्राची तपासणी न करता दुसरी महिला मतदान करून गेल्यामुळे मतदानाचा हक्क न बजावता येणाऱ्या महिलेने आपली खंत माध्यमांसमोर व्यक्त केली आहे.

सोलापूर मधील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरवात झाली आहे. अनेक ठिकाणी मतदान व्यवस्थित पार पडत आहे, तसेच नागरिकही मोठ्या उत्साहात मतदानाला जाताना पाहायला मिळत आहेत. परंतु सोलापूर मधील सूतगिरणी परिसरात राहणाऱ्या सुमारे १ हजार नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. लोकप्रतिनिधीना मतदान करूनही आपल्या प्रश्नांकडे लक्ष देत नाहीत म्हणून हे पाऊल उचललं असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे.

भंडाऱ्यात मतदानाला सुरवात, १० लाख मतदार बजावणार हक्क

आज राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान होत असून, सकाळी सात वाजल्यापासून राज्यात सर्वत्रच मतदानाला सुरवात झाली आहे. भंडारा जिल्हातील तीन मतदार संघात १ हजार २०६ मतदार केंद्र आहेत. तर या मतदार संघात एकूण ९ लाख ९१ हजार ८९० मतदार आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. नागरिकांना मतदान व्यवस्थित करता यावे तसेच कुठल्याही अडचणी येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने ५ हजार २०२ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून २ हजार ३७५ पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

परभणी जिल्ह्यात प्रचार तोफा थंडावल्या…

विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया २१ ऑक्टोबर रोजी राज्यभरात पार पडणार आहेत. निवडणूक प्रक्रिया निकालापर्यंत पारदर्शीपणे पार पाडावी, मतदात्यांना निर्भयपणे मतदान करता यावे आणि कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही या दृष्टीने जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहेत.