झोपलेल्या मंत्र्यांना माजी कृषी मंत्री अनिल बोंडेनीं पाठवली कापसाची गादी

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई | कोरोनाच्या या काळात राज्य सरकार पार अपयशी ठरले असून शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे, कापूस खरेदी बंद आहे, आता पेरणीला काही दिवसात सुरवात होणार आहे, मात्र महाविकास आघाडीचे सरकार झोपी गेले आहे असा आरोप करत राज्याचे माजी कृषी मंत्री व भाजपा नेते अनिल बोंडे यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन … Read more

टीव्ही मालिकांचे चित्रीकरण सुरु होणार; मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश

मुंबई  । कोरोना संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी जास्तीत सुरक्षा पाळली जात आहे. इतर व्यावसायांच्या बंदी सोबत चित्रपट, मालिका व्यवसायही या काळात बंद आहेत. त्यामुळे अनेक मालिकांचे जुने भागच दाखविले जात आहेत. तर सिनेमांचे शुटिंगही रखडले आहे. मात्र आता लॉकडाऊन ४ मध्ये संचारबंदीचे नियम हळूहळू शिथिल केले जात आहेत. ज्याद्वारे टप्प्याटप्प्याने सर्व उद्योग व्यवसाय करण्याचा विचार राज्य प्रशासन करत आहे. … Read more

खूषखबर! कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार नवे कर्ज 

मुंबई । राज्याची खरीप हंगाम आढावा बैठक नुकतीच पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही ऑनलाईन बैठक झाली. राज्यात महात्मा जोतिबा फुले योजनेचा लाभ न मिळालेले ११ लाख १२ हजार शेतकरी आहेत. अशा शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक घेण्यासाठी नवे कर्ज देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत सांगितले. तसेच कोरोना मुळे जगभरातील अन्नधान्याची … Read more

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नवीन, त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव नाही – देवेंद्र फडणवीस 

वृत्तसंस्था । राजकारणात वाद-प्रतिवाद होत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात तर ते सातत्याने होत राहतात. आपल्या विरोधकांच्या चुका शोधणे, त्या सातत्याने लोकांसमोर विविध माध्यमातून मांडत राहणे हे महाराष्ट्राला नवीन नाही. मग कोरोना संकटकाळात तर अशी संधी कोण कशी सोडेल? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना सुरु झाल्यापासून सध्याच्या सरकारच्या चुकांचा पाढाच वाचत आहेत. त्यातच … Read more

कोरोना पार्श्वभुमीवर पुण्याच्या महापौरांनी राज्य सरकारकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

पुणे । देशभरात कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. तुलनेने महाराष्ट्रातील रुग्ण अधिक वाढत आहेत. त्यातही पुणे, मुंबई या दोन शहरातील रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे यंत्रणेवरचा ताण वाढतो आहे. पुणे शहरात रोज मोठ्या प्रमाणात स्वॅब तपासणीसाठी घेतले जात आहेत. मात्र वाढत्या चाचण्यांमुळे स्वॅब तपासणीचे अहवाल उशीरा येत आहेत. म्हणून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य … Read more

आता अंतिम आदेश माझाचं! प्रशासकीय गोंधळ टाळण्यासाठी ठाकरेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई । लॉकडाऊन आणि कोरोनाच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसंदर्भातील आदेशांमध्ये राज्य पातळीवरील अधिकाऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून आले होते. अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाने परस्पर आदेश काढल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रशासकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून सोमवारी यासंदर्भतील निर्देश जारी करण्यात आले. आज राज्य सरकारने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी … Read more

‘उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कमी पडतंय असं मी कुठेही म्हटलं नाही’- पृथ्वीराज चव्हाण

सातारा । पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या एका वार्तालापात चव्हाण यांनी कोरोनानंतरच्या राज्यातील परिस्थितीवर भाष्य केलं होतं. सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना जबाबदारी दिली पाहिजे. तसंच, लोकप्रतिनिधी व मंत्र्यांचा सल्ला घेतला पाहिजे,’ असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. मात्र, त्यानंतर चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यावर आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे आहे तब्बल ‘इतक्या’ कोटींची संपत्ती; शपथपत्रात केले जाहीर

मुंबई । विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक अर्ज भरला. यावेळी निवडणूक उमदेवार म्हणून भरलेल्या शपथपत्रात प्रथमच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपत्ती अधिकृतपणे  जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांची एकत्रित संपत्ती अंदाजे 125 कोटी रुपये इतकी आहे. त्यांच्याकडे एकूण ३ बंगले आहेत. ज्यापैकी वांद्रे पूर्व कला नगर … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज उद्धव यांना, म्हणाले बंधू ‘हे’ कराच…

मुंबई । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये जमलेल्या सर्व पक्षांच्या नेत्यांबरोबर चर्चा केली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित होते. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आजच्या बैठकीत केलेल्या सूचनासंदर्भात … Read more

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; सरकारी दवाखान्यात आता प्रायव्हेट डाॅक्टरांना ड्यूटी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगी डॉक्टरांबाबत महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे.राज्य सरकारने असे म्हटले आहे की आता खासगी डॉक्टरही सरकारी रुग्णालयात बसतील. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक (मुंबई) म्हणाले की आम्ही आता खासगी डॉक्टरांना कोरोना विषाणूच्या रुग्णांवर १५ दिवस उपचार करण्यास सांगितले आहे. We’ve asked all private doctors, who are … Read more