सांगली मतदारसंघात सेना बंडखोर भाजप उमेदवाराला जेरीस आणणार का?

सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंडखोर शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील व भाजपचे सुधीर गाडगीळ यांच्यात आता थेट लढत होत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे बंडखोर शेखर माने मैदानात असल्याने भाजपच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

खामगावात आमदार आकाश फुंडकर यांच्या समर्थनार्थ मुस्लिम समाजाचा विजय संकल्प मेळावा

भाजपा-शिवसेना महायुतीचे खामगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार आकाश फुंडकर यांच्या समर्थनार्थ खामगाव येथील श्रीहरी लॉन्स येथे मुस्लिम समाजाचा भव्य मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला मुस्लिम सामाजातील अनेकांची उपस्थिती होती. या मेळाव्याला आमदार फुंडकर यांनी संबोधित करत ‘आमदार नव्हे तर कामदार बनून काम करण्याचा माझा संकल्प’ असल्याचे सांगितले.

‘संजय शिंदे यांना पाठिंबा जाहीर करणे हे अजित पवारांचे दुर्दैव’ – संजय पाटील

काल अजित पवार यांनी वेळापूर इथं करमाळा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहीर केला आहे. अजित पवारांनी पाठिंबा दिल्यानंतर स्वपक्षाचे उमेदवार संजय पाटील यांनी पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

नाशिकमध्ये विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे केले नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा निवडणूक यंत्रणा मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत आहे. जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु आहे. यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा. यासाठी मालेगाव येथील नाना मुंदडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करुन लोकांना मतदान करण्याच आवाहन केले. यावेळी सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

‘मतदानातील नोटा पर्याय लोकशाहीला घातक’ – चंद्रकांत पाटील

आज ‘विजयादशमी’चा उत्सव देशभरासह राज्यभरात देखील मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर देश आणि महाराष्ट्रातील मान्यवर जनतेला शुभेच्छा देत आहेत. ‘भाजपा’चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच यावेळी मतदारांना दिलेल्या नोटा पर्यायाबाबत त्यांनी विवादित वक्तव्य केले.

मतदान केंद्र शोधताय? गूगल करा..

लोकसभा निवडणुकीत पुण्यामध्ये निचांकी मतदान झाल्याचा कटू अनुभव असल्याने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी यंदा प्रथमच मतदान केंद्रे ही ‘गुगल टॅग’ करण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदारांना घराजवळची मतदान केंद्रे समजू शकणार आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांना गुगल मॅपमध्ये टॅग करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांना मतदान केंद्र कोठे आहे; तसेच किती अंतरावर आहे, हे समजणार आहे.

पुण्यात मनसेला ‘राज’गर्जनेसाठी अखेर मैदान मिळालं

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराला राज ठाकरे यांच्या सभेने प्रारंभ होणार असून बुधवारी (९ ऑक्टोबर) राज ठाकरे यांची सरस्वती मंदिर मैदानात संध्याकाळी सहा वाजता सभा होणार आहे. या ‘राज’गर्जनेच्या माध्यमातून मनसे पुण्यातील विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. राज यांच्या सभेच्या निमित्ताने निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाकडून १ ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रशासनाला पत्र देण्यात आले होते. टिळक रस्ता आणि शनिवार पेठेतील रमणबाग शाळेतील मैदान सभेसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली होती. मात्र सभेला परवानगी नाकारण्यात आली.

पूर्व विदर्भातील तेली समाजाची नाराजी ‘भाजपा’ला भोवणार ?

राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (कामठी), तुमसरचे आमदार चरण वाघमारे आणि माजी खासदार सुरेश वाघमारे या पूर्व विदर्भात बहुसंख्येने असलेल्या तेली समाजाच्या नेत्यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने विधानसभा निवडणुकीत तेली समाजाच्या नाराजीला भाजपला तोंड द्यावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘शेकाप’च्या जयंत पाटील यांच्यासह चार आमदारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

विधानसभा निवडणूक शांततेत आणि भयमुक्तपणे पार पडाव्यात यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. जिल्ह्य़ांत आत्तापर्यंत १ हजार ६४६ जणांवर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४९ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यात चार आमदारांचाही समावेश आहे.

राष्ट्रवादी मधील दत्तात्रय भरणे विरोधक गटाचा हर्षवर्धन पाटलांना पाठिंबा

इंदापूर विधानसभा मतदार संघामध्ये विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीला विरोध केलेल्या गटाने थेट भाजप उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनाच पाठिंबा जाहीर केला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांचा पाठिंबा देणाऱ्यांत समावेश असल्याने राष्ट्रवादीसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या पाच वर्षांत जगदाळे यांनीच हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यातील तालुका खरेदी विक्री संघासह कृषी उत्पन्न बाजार समिती राष्ट्रवादीकडे खेचून आणली होती.