गडचिरोलीत ग्रामसभा लढवणार विधानसभा, लालसू नोगोटींना जनताच देणार तिकिट

गडचिरोली प्रतिनिधी | वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी निवडणुका लढवल्याचं आपण आजपर्यंत पाहीलं आहे. पण ग्रामसभांनी स्वत:च आपला जनतेचा एखादा उमेदवार निवडणुकीला उभा केल्याचं आपण कधी ऐकलेलं नाही. गडचिरोली जिल्ह्यात ग्रामसभा आगामी विधानसभा लढवणार आहे. देशात हा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे. अहेरी विधानसभा मतदार संघातून अॅड. लालसू नोगोटी कोणत्याही राजकीय पक्षांकडून न लढता जनतेचा उमेदवार म्हणुन ग्रामसभेकडून … Read more

सांगलीत एसटीवरील सरकारच्या जाहिरातीही उतरवल्या, आचारसहिंतेमुळे केली कारवाई

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने कारवाईचा बडगा उगारला आहे. आचारसंहिता भंग करणारे सांगली शहरातील अनेक राजकीय फलक पथकाने उतरवत एसटीवरील सरकारच्या जाहिरातीही उतरवल्या. यावेळी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रचाराचे शासकीय बोर्ड ही पथकाने ताब्यात घेतले आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच महापालिका नितीन कापडणीस यांच्या आदेशाने महापालिकेच्या अतिक्रमण … Read more

आता विधानसभा निवडणूकाही होणार ‘इको फ्रेंडली’ – जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

लातूर प्रतिनिधी। सध्या ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येने संपूर्ण जग त्रासलेले असताना राज्यातील आगामी विधानसभा निवडणूका देखील पर्यावरण पूरक होण्यासाठी निवडणूक आयोगाने सकारात्मक पाऊल उचलले आहेत. लातूर शहरामध्ये याची सुरुवात होणार आहे. ‘विधानसभेच्या उमेदवाराने प्रचारा दरम्यान हारतुऱ्यां ऐवजी झाडे भेट दिल्यास उमेदवारांच्या निवडणूक खर्चात सवलत देण्यात आली असून एका झाडाला केवळ एक रुपया खर्च गृहीत धरला जाणार … Read more

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाला आणखी एक धक्का!!

सातारा प्रतिनिधी। सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाला विधानसभेच्या तोंडावरच आणखी एक धक्का बसला आहे. चव्हाण यांचे खंदे समर्थक समजले जाणारे आमदार आनंदराव  पाटील यांनी भाजप प्रवेशाबाबत स्वतःची भूमिका कार्यकर्ता संवाद मेळाव्यामध्ये जाहीर केल्यानंतर आठच दिवसात त्यांचे पुत्र प्रताप पाटील व पुतणे शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनिल पाटील हे भाजपाच्या वाटेवर आहेत. … Read more

ही ‘आचार संहिता’ मजी काय असतंय रं लका?

विशेष प्रतिनिधी |  सुरज शेंडगे केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार असून विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोंबर रोजी मतदान पार पडणार आहे.तसेच निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची आज पासूनच आचार संहिता लागू केली आहे. हि आचार संहिता म्हणजे नेमकी काय … Read more

इस्लामपूर मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजप मध्ये धुसफूस

सांगली प्रतिनिधी। इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भाजपमधून गौरव नायकवडी तर शिवसेनेतून आनंदराव पवार या दोन नावावर वाळवा तालुका समन्वय समितीचे एकमत झाले आहे. या दोघांपैकी एका उमेदवाराला उमेदवारी देण्याची मागणी वरिष्ठांकडे केली आहे. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील जो उमेदवार ठरवतील त्याचे प्रामाणिकपणे काम करू. आत-बाहेर करणार नसल्याची ग्वाही … Read more

महाराष्ट्रातील ‘हे’ गावे तेलंगणात सामाविष्ट करण्याची मागणी

नांदेड प्रतिनिधी | तेलंगणा राष्ट्र समिती सरकारच्यावतीने तेलंगणा राज्यात राबवण्यात येणा-या कल्याणकारी योजनेला प्रभावित होत तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या नांदेड जिल्ह्यातील गावांमधील सरपंचानी ग्रामस्थांसह मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान तेलंगणा राज्याप्रमाणे कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी सीमेलगत असलेल्या गावांमध्ये करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. त्याचबरोबर ही योजना लागू न केल्यास नांदेड जिल्ह्यातील … Read more

आमदार नाईकांचा पत्ता कट, कॉग्रेसचे सत्यजित विधानसभेला

सांगली प्रतिनिधी | सकलेण मुलाणी शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांचे व काँग्रेसचे राज्य सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य सत्यजित देशमुख यांचे सूत जुळणार आहे. येत्या विधानसभेला देशमुख यांना भाजपाची उमेदवारी देऊन आमदार नाईक यांना विधानपरिषद दिली जाणार असल्याच्या चर्चानी सध्या तालुक्यात खळबळ उडवून दिली आहे. या चर्चेमुळे भाजपातील व काँग्रेसमधील कार्यकर्त्यांची द्विधा अवस्था निदर्शनास येत … Read more

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हया 09 डिसेबंर रोजी

Elections

मुंबई | राज्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या डिसेंबर मध्ये पार पडणार आहेत. यामध्ये धुळे, अहमदनगर महानगरपालिकेच्या तर नेर- नबाबपूर , लोहा , मौदा , रिसोड, ब्रम्हपुरी आणि शेंदुर्णी या नगरपरिषदा/ नगरपंचायतींसाठी निवडणुका होतील. अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ९ डिसेंबरला मतदान होईल तर या १० डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, असे राज्याचे निवडणूक आयुक्त … Read more

अशोक चव्हाण होणार २०१९ ला मुख्यमंत्री

Thumbnail

मुंबई | विधानसभा निवडणूका लोकसभा निवडणुकांसोबत न होता मागे पुढे झाल्या तर राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेत येईल अाणि अशोक चव्हाण मुख्यमंत्री होतील अशी भविष्यवाणी ज्योतिष परिषदेमधे वर्तवण्यात आली आहे. ठाणे येथील ब्राह्मण सभा मंडळात काल ज्योतिष अधिवेशन पार पडले. त्यावेळी २०१९ च्या निवडणुका या सत्रात सिद्धेश्वर मारकटकर यांनी काही राजकीय भाकिते केली. यावेळी २०१९ मधे … Read more