म्हणुन JCB ने गुलाल उधळला, रोहित पवारांचे नेटकर्‍यांना प्रत्युत्तर

अहमदनगर प्रतिनिधी | कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांचे शुक्रवारी जामखेड येथे जंगी संवागत झाले. यावेळी पवार यांच्या कार्यकर्त्यांनी JCB ने गुलाल उधळून मोठी मिरवणुक काढली. मात्र शरद पवार नाशिक येथे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या भेटी घेत असताना रोहित पवार जेसीबीने गुलाल उधळत मिरवणुक काढत असल्याने नेटकर्‍यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं. आता पवार … Read more

फर्ग्युसन रोडवरच्या वैशालीसमोरुन जेव्हा शरद पवारांना पोलीसांनी काॅलर धरुन उठवलं होतं…

किस्से राजकारणापलीकडचे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि नुकतेच सातार्‍यातून उदयनराजे भोसले यांचा पराभव करुन खासदार म्हणुन निवडुन आलेले श्रीनिवास पाटील यांच्या मैत्रीबद्दल सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. पवार आणि पाटील काॅलेजमध्ये असल्यापासूनचे मित्र आहेत. त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से तुम्ही याआधी बर्‍याचदा एकले असतील. मात्र पुण्याच्या फर्ग्युसन रस्त्यावरील वैशाली हाॅटेल समोरुन … Read more

बाळासाहेब थोरात यांनी घेतली शरद पवारांची भेट; सत्तास्थापनेच्या दृष्टीने खलबत सुरु

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आज शरद पवार यांची भेट घेण्यासाठी बारामतीमध्ये पोहोचले आहेत. आगामी राजकीय समिकरणांच्या दृष्टीने थोरात पवार भेटीला अधिक महत्व प्राप्त झालंय.

आम्हाला लै कॉन्फिडन्स हाय,निवडून येनार तर रोहित दादाच! कार्यकर्ते जोमात

विधानसभा निवडणुकीत अत्यंत अटीतटीच्या झालेल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे राम शिंदे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांच्यात दुरंगी लढत झाली. निवडणूकीच्या निकालासाठी काही तसाचा अवधी राहिलेला असताचा कर्जत जामखेड तालुक्‍यात रोहित पवार प्रचंड मतांनी निवडून आले असल्याचे डिजिटल फलक उत्साही कार्यकर्त्यांनी आधीच लावले आहेत. तर काही कार्यकर्त्यांनी डिजेसाठी ऍडव्हान्स दिला असुन काहींनी थेट सट्टा लावला आहे.

‘पवार फॅक्टर’मुळे ‘सेना’ चिंताग्रस्त; शिवसेनेची ५७ जागांवर राष्ट्रवादीशी लढत

विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकहाती प्रचाराचा धडका लावल्यामुळे महायुती सत्तेवर येण्याची खात्री असूनही शिवसेना चिंतित आहे.

कागदावर लिहीलेलं भाषण वाचून उदयनराजेंचे शरद पवारांना अडखळत प्रत्युत्तर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शनिवारचा दिवस शेवटचा आहे. अनेक पक्षांनी वेगवेगळ्या पद्धती वापरून मतदारांवर आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सातारा जिल्ह्यात विधानसभेसोबत लोकसभेची पोटनिवडणूक सुद्धा होत आहे. उदयनराजे विरुद्ध श्रीनिवास पाटील अशी लढत या ठिकाणी चांगलीच रंग पकडत असल्याचं पहायला मिळत आहे. आज कराड येथे प्रचाराच्या सांगता सभेत मात्र उदयनराजे काहीसे चिंतीत अवस्थेत पहायला मिळाले.

साताऱ्यात शुक्रवारी भरपावसात शरद पवारांनी घेतलेल्या सभेचा चांगलाच परिणाम राज्यभर पहायला मिळाला. आता उदयनराजे भोसले यांनी कागदावर लिहीलेलं भाषण वाचून शरद पवारांना अडखळत प्रत्युत्तर दिलंय. २०१९ च्या लोकसभेसाठी उदयनराजेंना तिकीट देऊन मी चूक केल्याचं शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांना प्रत्युत्तर देण्यासाठी उदयनराजे यांनी भाषण लिहून आणलं होतं. हे भाषण वाचतानाही उदयनराजे कमालीचं अडखळत असल्याचं पहायला मिळालं. शरद पवारांवर नेमकी काय टीका करावी हेच त्यांना समजत नसल्याचं एकूण भाषणावरून स्पष्टपणे जाणवून येत होतं.

भाषणाच्या शेवटी त्यांनीच माझ्या मोडक्या तोडक्या भाषणातून तुम्हाला जे कळालं त्यावर तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला आणि अतुल भोसलेंना साथ द्या. भाजपच्या विकासाला साथ द्या असं भावनिक आवाहन उदयनराजे यांनी शेवटी केलं.

शरद पवारांना प्रत्युत्तर देताना उदयनराजे अडखळले

कर्जत-जामखेड मध्ये भाजपचा “राम” शिल्लक राहणार नाही! – शरद पवार

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची रोहित पवारांच्या प्रचारासाठी सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवारांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले,’ रोहित पवारांनी भाजपची झोप उडवली आहे, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांना तीन तीन वेळा या मतदार संघात यावं लागतं. तसेच मतमोजणी नंतर सर्व पत्रकार ” कर्जत जामखेड मध्ये भाजपचा राम शिल्लक राहिला नाही” अशी बातमी करणार असल्याचे म्हणत, राम शिंदेंना जोरदार टोला लगावला.  

शरद पवारांच्या ‘त्या’ सभेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जोश! ट्विटर द्वारे व्यक्त केले मत

राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी केवळ काही तास शिल्लक आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला असून सर्वच पक्ष मतदारराजापर्यंत पोहचण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करताना दिसत आहे. अनेक पक्षांच्या सभा वेगवेगळ्या कारणाने गाजत आहेत. अशीच एक सभा सध्या शुक्रवार रात्रीपासून तुफान चर्चेत आहे ती म्हणजे साताऱ्यामध्ये झालेली राष्ट्रवादी काँग्रेसची सभा.

मुख्यमंत्र्यांना प्रत्येक तालुक्यात सभा घ्यावी लागणं म्हणजे जनतेत भाजपबद्दल नाराजी आहे- शरद पवार

जनतेची भाजपाबद्दलची नाराजी मुख्यामंत्र्यांना कळाली आहे. त्यामुळं तर त्यांना प्रत्येक तालुक्यात सभा घ्यावी लागत आहे. असा टोला राष्ट्रवादीचे सेर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस लगावला. पवार राहुरी मतदारसंघात प्रचार सभेसाठी आले असता त्यांनी हे वक्तव्य केल.

जेव्हा शरद पवारांना काॅलर धरुन विधानसभेतून बाहेर काढण्यात आलेलं…

हॅलो विधानसभा | राज्याच्या राजकारणात शरद पवार हे नाव नवीन नाही. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय संस्कारात घडलेले शरद पवार आजही त्याच जोमाने राजकारणात सक्रिय आहेत. आजही वयाच्या ७८ व्या वर्षीही पवार एखाद्या तरुणासारखं संपूर्ण महाराष्ट्र फिरतांना दिसून येत आहेत. त्यामुळे पक्षातील एक एक नेता विरोधी पक्षात जात असतानाही पवारांमध्ये ही जिद्द कोठून … Read more