Friday, June 9, 2023

कर्जत-जामखेड मध्ये भाजपचा “राम” शिल्लक राहणार नाही! – शरद पवार

अहमदनगर प्रतिनिधी । राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची रोहित पवारांच्या प्रचारासाठी सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवारांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले,’ रोहित पवारांनी भाजपची झोप उडवली आहे, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांना तीन तीन वेळा या मतदार संघात यावं लागतं. तसेच मतमोजणी नंतर सर्व पत्रकार ” कर्जत जामखेड मध्ये भाजपचा राम शिल्लक राहिला नाही” अशी बातमी करणार असल्याचे म्हणत, राम शिंदेंना जोरदार टोला लगावला.

दरम्यान कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांचे नातू रोहित पवार व भाजपचे मंत्री राम शिंदे यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे. ही लढत चुरशी होणार असून दोन्ही पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या सभांनी मतदारसंघ ढवळून निघाला आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीकडून अजित पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, धनंजय मुंडे तर भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, खासदार उदयनराजे भोसले यांच्या सभा येथे झाल्या आहेत.