शरद पवार राजकारणातील सोंगाड्या, उध्दव ठाकरेंचा पवारांवर घणाघात

शरद पवारांची राष्ट्रवादी आता भ्रष्टवादी झाली असून शरद पवार हे राजकारणातील सोंगाड्या आहेत. अशी घणाघाती टीका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी आज करमाळा येथे जाहीर सभेत बोलताना केली.

३७० पेक्षा माझ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव कसा मिळेल? हा खरा प्रश्न आहे – शरद पवार

विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार संपूर्ण राज्याचा दौरा करत आहेत. दरम्यान कन्नड येथील सभेत उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी पुन्हा एकदा भाजपच्या निवडणूक प्रचारातील ३७० च्या मुद्द्यावर टीका केली. देशात कलम ३७० पेक्षा माझ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव कसा मिळेल हा खरा प्रश्न आहे. असे सांगत पवार यांनी आपले मत जाहीर सभेत प्रकट केले.

‘घरात आलबेल आहे सांगण्याची पाळी का येते?’, सुरेश धस यांचे शरद पवार यांच्यावर शरसंधान

धस हे ‘महायुती’चे उमेदवार माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचार सभेत बीड मतदार संघातील रायमोहा येथे आयोजित सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पंकजा मुंडे, जयदत्त क्षिरसागर रमेश पोकळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

म्हणुन आम्ही मुक्ताईनगरातून माघार घेतली, रोहिणी खडसेंना पाडण्यासाठी पवारांचा मास्टर प्लान

जळगाव प्रतिनिधी | मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात रोहिणी खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील अशी लढत रंगली आहे. पाटील यांनी शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बंडखोरी केली आहे. राष्ट्रवादीने मुक्ताईनगर मधून माघार घेत पाटील यांना पाठींबा दिला आहे. आपण जाणीवपूर्विकच माघार घेतली असून आता एक एक जागा महत्वाची आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले … Read more

सोलापुरात राष्ट्रवादीच्या विरोधात राष्ट्रवादी !

सोलापूर प्रतिनिधी | काल सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यात अनेक घडामोडी घडल्या. सोलापूर जिल्हयात मात्र राष्ट्रवादीच्या विरोधात राष्ट्रवादी असल्याचे समोर आले आहे. चक्क राष्ट्रवादीनेच जाहीर केलेल्या दोन उमेदवारांच्या विरोधात पक्षाने भूमिका घेतली आहे. या संदर्भात आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. करमाळा येथे राष्ट्रवादीने संजय पाटील यांना तर … Read more

ना अजित, ना सुप्रिया; ‘हा’ असणार शरद पवारांचा राजकीय वारस

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या राजकीय वारसाची घोषणा केली आहे. एका वृत्तवाहिणीला दिलेल्या मुलाखती दरम्यान पवार यांना तुमचा राजकीय वारस कोण असणार असा प्रश्न केला असता पवार यांनी त्यावर भाष्य केले आहे. शरद पवार यांनी यावेळी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे नाव न घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. पवार … Read more

शरद पवार साताऱ्यात येऊन मला काय आशीर्वाद देतात हे पाहावे लागेल – उदयनराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यातील लोकांना जो निर्णय अपेक्षित होता तो मी घेतलेला आहे आणि त्यावर मी ठाम आहे. सध्याच्या शासनाने अनेक कामे मार्गी लावली असून लोकसभेची पोटनिवडणूक ही आता जनतेनेच हातात घेतलेली आहे या माझ्या मताशीच माझे विरोधक श्रीनिवास पाटील हे सहमत आहेत अशी टिपणी उदयनराजे भोसले यांनी केली. उदयनराजे यांनी पाटण येथे … Read more

सभेत कुत्रा घुसला अन.. पवारांनी उडवली सेनेची खिल्ली

उस्मानाबाद प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यभर दौरा करत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार हे उस्मानाबाद मध्ये आहेत. या ठिकाणी सुरु असलेल्या सभेत कुत्रा घुसला अन् त्यानंतर पवारांनी जे वक्तव्य केल त्या  वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. उस्मानाबादेत सभा सुरु असताना शरद पवार जेव्हा सभेला संबोधित करत होते. तेव्हा सभेच्या ठिकाणी कुठून … Read more

अजित पवारांच्या राजीनाम्यावर शरद पवार काय म्हणाले? पहा व्हिडिओ

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज आपल्या आमदारकीचा राजिनामा दिला. या पार्श्वभुमीवर शरद पवार यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार यांनी आज अचानक आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा देण्याचं कारण अद्याम मला समजलेलं नसून त्यांच्याशी माझी याबाबत चर्चा झालेली नाही. इडीच्या चौकशीमूळेच अजितने राजीनामा दिला असावा असा माझा अंदाज आहे … Read more

मराठा क्रांती मोर्चा शरद पवारांसोबत – आबासाहेब पाटील

मुंबई प्रतिनिधी । ‘राज्यात विधानसभा निवडणुका ईडी मार्फत सुडाच राजकारण करणं योग्य नाही’ असं मत मराठा क्रांन्ती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला आहे. मात्र, महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून पवारांवर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात … Read more