Breaking | संजय राऊत लिलावती रुग्नालयात दाखल

दिल्ली | शिवसेना नेते संजय राऊत लिलावती रुग्नालयात दाखल झाले आहेत. राऊत यांनी आज दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर राऊत रुग्नालयात दाखल झाले आहेत. संजय राऊत मागील काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. महाराष्ट्रातील सत्तासमिकरणांबाबत देशभर चर्चा सुरु आहे. यामध्ये राऊत शिवसेनची बाजू मांडताना … Read more

अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याची आज आठवण, सुप्रिया सुळे यांनी सुद्धा दिला होता दुजोरा

राजकारणात कुणी कायमचा शत्रू व मित्र नसतं असं म्हणण्याची वेळ महाराष्ट्र राज्याच्या नवीन सरकार स्थापने संदर्भात होत असलेल्या एकूण राजकीय घडामोडी नंतर दिसून येत आहे. राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. यावेळी आघाडीचा पाठिंबा घेऊन शिवसेना सत्ता स्थापन करण्याचा निर्णयापर्यंत पोहोचली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला सोबत घेण्यासंदर्भाची भूमिका मागिल काही महिन्यापूर्वीच बदलली होती का? का तो फक्त योगायोग आहे अशी चर्चा आता परभणी जिल्ह्यामध्ये रंगली आहे. त्यावेळी ही बाब कोणीही गांभीर्याने घेतली नव्हती पण आता मात्र तीच चर्चा सगळीकडे रंगली आहे.

राज्याला राष्ट्रपती राजवटीमध्ये ढकलण्यासाठी प्रयत्न- संजय राऊत

राज्यात निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवडे उलटले तरी सत्तेसाठीचा दावा कोणत्याही पक्षाने केलेला नाही आहे. दरम्यान निवडणूक निकालाप्रमाणे सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केले होते मात्र भाजप असमर्थ ठरले. त्यामुळे आता शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी आमंत्रित केला आहे. मात्र महत्वाची बाबा म्हणजे आता सत्तास्थापनेसाठी दिलेल्या अवधीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

महाशिवआघाडीच्या सरकारमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? | स्पेशल रिपोर्ट

विशेष प्रतिनिधी | सातारा मुख्यमंत्रीपद – केंद्रातील सत्ताधारी पाशवी बहुमतात नसतील तर राज्याची मांड समर्थपणे हाताळू शकणारं स्वावलंबी व्यक्तिमत्व. अनेक राजकीय नेत्यांची संपूर्ण कारकीर्द गेली तरी या पदाचं स्वप्न पूर्ण होत नाही. घराणेशाही असेल तर मार्ग तुलनेनं सोपा असतो. दुसरा मार्ग म्हणाल तर पक्षश्रेष्ठींच्या मनात तुम्ही घर केलेलं असलं पाहिजे. आणि तिसरा मार्ग म्हणजे तुमचं … Read more

मुख्यमंत्रिपदासाठी मला पाठिंबा द्यावा – अभिजीत बिचुकले

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवरुन सध्या राज्यात जोरदार सत्ता संघर्ष पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. भाजपकूडन शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळत नसल्यामुळे शिवसेना सत्तास्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देण्यास नकार देत आहे. अशामध्येच बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी राज्यपालांना पत्र लिहून सत्तास्थापनेचा दावा केला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भंगतसिंह कोश्यारी यांनी … Read more

उद्धव ठाकरे घेणार शरद पवारांची भेट?

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी पाठिंबा द्यावा, अशी मागणी करण्यासाठी ही भेट असल्याचे समजते. भाजपने सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यपालांना शिवसेनेला निमंत्रित केले आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात … Read more

तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे..!!

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा कधी सुटणार असा प्रश्न संपूर्ण राज्याला सध्या पडला आहे. विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्राच्या जनतेने युतीच्या पारड्यात आपला कौल दिला होता. मात्र शिवसेनेने युती ही पद आणि जबाबदाऱ्यांच्या समसमान वाट्यावरच झाली होती असे सांगत मुख्यमंत्रीपदावर आपला दावा केला आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेनेसोबत मुख्यमंत्री पदाबाबत काही चर्चाच झाली नसल्याचा खुलासा करत भाजपने सेनेचा दावा खोडून काढला.

शिवसेनेचा मुख्यमंत्री हे बाळासाहेबांना दिलेलं वचन – उद्धव ठाकरे

 मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचा मुख्यमंत्री हे बाळासाहेब ठाकरेंना दिलेले वचन आहे असे मत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेसोबत काही बोलणेच झाले नाही असे म्हणल्यानंतर ठाकरे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत फडणवीस घोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे. … Read more

मला खोटं पाडल्याबद्दल फडणवीसांचं आभार; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना चोख प्रत्युत्तर

शिवसेनाप्रमुखांना मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसैनिक बसवेनच असं वचन दिलं होतं. आता ते वचन पाळण्याची जबाबदारी माझी आहे. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी माझी भूमिका ऐकली होती आणि त्यावर त्या दोघांचं एकमत होत नव्हतं. स्वतःला पक्षात अडचण येऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीसांनी मलाच खोटं ठरवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो पण मला त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती असंही ठाकरे पुढे म्हणाले. पद आणि जबाबदऱ्यांचं सम-समान वाटप हे ठरलं होतं, आणि आता हेच ते नाकारत असतील तर मी काय बोलणार असं म्हणत गोड बोलून आम्हाला नेहमी फरफटायला लावणाऱ्या भाजपचा खरा चेहरा आज उघडकीस आला असल्याची खंत उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली.

शिवसेनेला आमच्याशी चर्चा नकोच होती; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ४ वाजण्याच्या सुमारास राज्यपाल भगतसिंह कोषयारी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारला. महाराष्ट्राच्या जनतेने सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. सोबत काम केलेल्या मंत्रिमंडळाचेही त्यांनी आभार मानले. शिवसेना सोबत होती असं तुम्हाला वाटलं तर त्यांचंही आभार अशी कोपरखळी फडणवीसांनी यावेळी लगावली. यावेळी उद्धव ठाकरेंचा उल्लेख करणंही फडणवीसांनी टाळलं.