ठरलं! मुख्यमंत्री शिवसेनेचा, उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचा? पण..

विशेष प्रतिनिधी | सत्तास्थापनेवरुन महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही असताना भाजप मात्र मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नाही. मुख्यमंत्रीपदावरुन महायुती बिघाड झाल्याने आता शिवसेना आघाडीसोबत जाऊन सरकार स्थापन करणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून समोर येत आहे. महायुतीला मतदारांनी स्पष्ट कौल दिलेला असूनही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. महायुतीमधील कलह दिवसागणिक वाढत … Read more

‘पवार फॅक्टर’मुळे ‘सेना’ चिंताग्रस्त; शिवसेनेची ५७ जागांवर राष्ट्रवादीशी लढत

विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकहाती प्रचाराचा धडका लावल्यामुळे महायुती सत्तेवर येण्याची खात्री असूनही शिवसेना चिंतित आहे.

प्रदीप शर्मांवर गुन्हा दाखल; निवडणूक अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप

माजी पोलीस अधिकारी आणि शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी निवडणूक अधिकाऱ्याला (प्रोसिडिंग ऑफिसर) मतदान केंद्रावरच धमकी दिल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी निवडणूक अधिकारी बाळासाहेब मालोंडे यांनी तक्रार दाखल केली आहे. शर्मा यांच्यावर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विरार पूर्व चंदनसार जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला.

नितेश राणेंच्या प्रचारात ‘तडीपार’ आरोपी सहभागी; शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा आरोप

राज्यातील विविध भागांतील हद्दपार झालेले आरोपी नितेश राणे यांच्या प्रचारात सहभागी आहेत. आणि ते राजरोसपणे पैसे वाटण्याचे काम करत आहेत असा आरोप सतीश सावंत यांनी केला. सावंत यांच्या आरोपानंतर मतदारसंघातील वातावरण चांगलेच तापले आहे.

धुळ्यात युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफुसच, सेनेच्या बॅनर वरून भाजप कार्यकर्त्यांचे फोटो गायब  

धुळ्यात शिवसेनेचे उमेदवार हिलाल माळी यांच्या प्रचारासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली आहे. परंतु या सभे दरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे वावडे असल्याच उघड झालं आहे. आदित्य ठाकरे ज्या मंचावरून मतदारांशी संवाद साधणार आहेत. त्या मंचावर लावलेल्या बॅनरवर भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांचा फोटो शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लावण्याच टाळलं.

कोल्हापूर उत्तरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षिरसागर कोल्हापूरच्या नेटकाऱ्यांकडून ट्रोल

प्रचाराच्या वेगात शिवसेनेचे कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षिरसागर यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात झालेल्या चुकांमुळे कोल्हापूरच्या नेटकाऱ्यांमधून चांगलेच ट्रोल होत आहेत. आज दिवसभर या जहिरनाम्यातील चुकीमुळे सोशल मिडिया मध्ये चांगलीच चर्चा रंगत आहे.

पालघर जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार, ५० कार्यकर्त्यांनी ठोकला पक्षाला रामराम

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजप सेना युती होणार की नाही या संदर्भात अनेक दिवस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता, पण अखेर युती झाली. पुढे तिकीट वाटपातही आयारामांना झुकत माप देत निष्ठावंताना डावलण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या त्यामुळे शिवसैनिक चांगलेच नाराज झाले आहेत. याच नाराजीतून मतदानाला अवघे काही दिवस बाकी असताना डहाणू तालुक्यात ५० प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला आहे. तेव्हा ऐन मतदानापूर्वी कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देणे शिवेनेसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जातं आहे.

राणे पिता पुत्रांसाठी मुख्यमंत्री कणकवलीत; शिवसेनेचा विरोध

कणकवलीत भाजप सेनेची युती नसतानाही नितेश राणेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १५ ऑक्टोबरला कणकवलीत सभा घेणार असल्याचे नारायण राणे आणि भाजपच्या नेत्यांकडून जाहीर करण्यात आले आहे.

दगडाला पाझर फुटेल पण अजित पवारांचं रडणं ही काय भानगड? उद्धव ठाकरेंची शेलक्या शब्दांत टीका

अहमदनगर प्रतिनिधी । ‘दगडाला पाझर फुटतो हे ऐकलं होतं पण अजित पवारांच्या डोळ्यांत अश्रू येतात हे पहिल्यांदाच समजलं’ अशी शेलकी टीका उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर केली. शिवसेना उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे अहमदनगर येथे आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केली. १५ वर्ष सत्तेत असताना … Read more

दिपाली सय्यदसाठी जितेंन्द्र आव्हाडांचं खास गाणं

मुंबई प्रतिनिधी | मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद यांना शिवसेने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मैदानात उतरवलं आहे. यावर बोलताना आव्हाड यांनी सय्यद यांना हटके स्टाईलमध्ये शुभेच्छा दिलेत. सय्यद यांच्यासाठी चक्क आव्हाड यांनी गाणं म्हणलंय. पहा व्हिडिओ –