राणे पिता पुत्रांसाठी मुख्यमंत्री कणकवलीत; शिवसेनेचा विरोध

सिंधुदुर्ग प्रतिनिधी । कणकवलीत भाजप सेनेची युती नसतानाही नितेश राणेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १५ ऑक्टोबरला कणकवलीत सभा घेणार असल्याचे नारायण राणे आणि भाजपच्या नेत्यांकडून जाहीर करण्यात आले आहे.

मात्र, जिथे सेना-भाजप उमेदवार आमने-सामने आहेत.त्या मतदार संघात फडणवीस आणि उद्धव ठाकरे जाणार नाहीत, असा करार असल्याचे सांगत सुभाष देसाई यांनी ही शक्यता फेटाळून लावलीये. नारायण राणेंचे पूत्र नितेश राणेंसाठी मुख्यमंत्री कणकवलीत येतील का, अशी चर्चा आता सिंधुदुर्गात सुरु झाली आहे. “येत्या १५ ऑक्टोबरला माननीय मुख्यनंत्र्यांची दुपारी दोन वाजता कणकवलीत सभा आहे. त्यानंतर ते मला जिथे पाठवतील तिथे मी जाईन”, असे नारायण राणे यांनी सांगितले आहे.

सिंधुदुर्गात मुख्यमंत्री कधी येतात आणि नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात कधी विलीन होतोय याची वाट स्वतः राणे पाहत असल्याची परिस्थिती आहे.

इतर काही बातम्या-