महाविकास आघाडी लोकाभिमुख योजना राबवित आहे, त्यांचा सर्वांनी लाभ घ्या!-पालकमंत्री अमित देशमुख

लातूर प्रतिनिधी । राज्यात महाविकास आघाडीचे सरकार तळागाळातील सर्व नागरीकांसाठी लोकाभिमुख योजना राबवित आहे या योजनेचा लाभ सर्व सामान्यांनी घ्यावा असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागातंर्गत गंजगोलाई लातूर येथील शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास महापौर … Read more

मराठवाड्याच्या वाट्याला आली ६ मंत्रिपद, मंत्रीपदी यांची लागली वर्णी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात मराठवाड्याच्या वाट्याला सहा मंत्रिपद आली आहेत. महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन जणांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. यातील काँग्रेसकडून मोठं नाव म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच असून, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांनी पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीकडून मराठवाड्यातून अपेक्षेप्रमाणे धनंजय मुंडे याना संधी देत त्यांना कॅबिनेट मंत्रिपद बहाल केलं. तसेच राष्ट्रवाडीकडून राजेश टोपे हे मंत्रिपदाची शपथ घेतलेले मराठवाड्यातील दुसरे मंत्री ठरले.

‘त्या’ कागदपत्रांवर रितेश देशमुखने केला ट्विटर द्वारे खुलासा

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि आमदार अमित देशमुख यांचे काही कागदपत्रे सोशल मिडीया वर चांगलेच व्हायरल झाले होते. यावर सामाजिक कार्यकर्त्या मधूपूर्णिमा किश्वर यांनी कागदपत्रांचे फोटो शेअर करत ”चुकीच्या पद्धतीने ४ कोटी ७० लाख रुपयांचं कर्ज माफ करून घेतले असल्या”चे त्यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे सगळीकडे हा मोठा चर्चेचा विषय बनला होता. मात्र आता स्वतः अभिनेता रितेश देशमुख यांना याबाबत खुलासा करण्यासाठी समोर यावे लागले आहे. त्यांनी ट्विट करत या सर्व आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

फसणवीस सरकारला हद्दपार करा – बाळासाहेब थोरात

सध्याची निवडणूक ही राज्यातील उमेदवारांची असून मोदींच्या नावावर मतं मागण्याचं काय कारण असा सवाल खर्गे यांनी विचारला. राज्यातील सिंचन व्यवस्था, शेतकऱ्यांचा पीक विमा, तरुणाईचा रोजगार प्रश्न याबाबत सरकार बोलणं टाळत असून घोषणांच्या जाहिरातबाजीत वास्तवाकडे दुर्लक्ष करण्याचं काम सरकार करत असल्याची टीकाही खर्गे यांनी केली.

मोदींची भक्ती करणाऱ्या माध्यमांतून महाराष्ट्राचं वास्तव कधी दाखवलं जाणार? – राहुल गांधी

जीएसटी,नोटबंदीचे भयानक परिणाम आजही देश भोगत असून सध्या देश आर्थिक संकटातून जात असताना ज्यांना खरचं मदतीची आवश्यकता आहे, त्यांना मदत करण्याऐवजी धनदांडग्यांना मदत करण्याचं काम सरकार करत असल्याचं राहुल पुढे म्हणाले.

लातूरमधील देशमुखी कायम राहणार का? अमित आणि धीरज देशमुखांच्या प्रचारसभांना कुटुंबीयांचीही उपस्थिती

दोन्ही भावांच्या प्रचारासाठी लातूरमध्ये दाखल झालेला अभिनेता रितेश देशमुख सध्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.