अमित शहांच्या व्हर्च्य्युअल रॅलीवर ममता दीदी म्हणाल्या, ‘हे’ फक्त भाजपलाच परवडू शकत!

कोलकाता । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या व्हर्च्य्युअल रॅलीसाठी ७० हजार एलईडी स्क्रीन वापरण्यात आल्याचे आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून समजल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. हे फक्त भारतीय जनता पक्षालाच परवडू शकते असा टोला ममता दीदींनी अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाला लगावला आहे. त्या पुढे म्हणाल्या, ३० जूनपर्यंत लॉकडाउनची अंमलबजावणी केली जाईल. यासह, … Read more

राहुल गांधींचा शायराना अंदाज, हा ‘शेर’ म्हणत अमित शहांना हाणला टोला

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शायरीच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला आहे. सध्या पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये सीमावाद सुरु आहे. तिथे काही भागांमध्ये दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी भारताच्या संरक्षण धोरणाचे समर्थन करताना एक विधान केले होते. त्यावरुन राहुल गांधींनी अमित शाह … Read more

Lockdown 5.0 | पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी उद्योगांना मिळणार सूट? 

वृत्तसंस्था । देशातील चौथ्या टप्प्यातील संचारबंदी ३१ मे  रोजी संपत आहे. यापुढे संचारबंदी उठवली जाणार नसली तरी काही नियम शिथिल करण्यात येणार आहेत. केंद्र सरकार मुख्यत्वे देशातील १३ शहरांवर जिथे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून आहे. केंद्र सरकारला संचारबंदीमुळे घसरलेल्या अर्थव्यववस्थेला पुन्हा उभी करण्यासाठी काही राज्यांनी पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसाय सुरु करण्याचा … Read more

.. म्हणून अमित शहांनी केला ममता बॅनर्जींना तातडीनं फोन

नवी दिल्ली । अम्फान या वादळाचा सामना करण्यासाठी केंद्र आणि संबंधित राज्य सरकारने पूर्ण तयारी केली आहे. एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून नौदल आणि भारतीय सैन्यही अलर्टवर आहे. नागरिकांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यावर भर दिला जात आहे याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. यावेळी … Read more

CAPF कॅन्टीनमध्ये आता फक्त मिळणार स्वदेशी वस्तू- गृहमंत्री अमित शहा

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीकडे एक संधी म्हणून पाहण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान म्हणाले आहेत की, सध्याची जगाची परिस्थिती ही भारतासाठी एक संधी बनू शकते, अशा परिस्थितीत आपल्याला स्वावलंबी बनले पाहिजे. पीएम मोदींनी लोकलसाठी वोकल बनण्याची घोषणा दिली. पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने या … Read more

आपल्या मृत्यूच्या बातमीवर अमित शहा म्हणतात…

नवी दिल्ली । काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहयांच्या तब्बेतीसंदर्भात सोशल मिडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. अशावेळी अमित शाह यांनी या अफवांचे खंडन करत आपण ठीक असल्याचे सांगितलं. अमित शहा यांनी शनिवारी ट्विटवरुन आपली प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगत कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन केलं आहे. ट्विटवरुन त्यांनी एक निवेदन पोस्ट केलं … Read more

..अन्यथा गृहमंत्री शहांनी ममता दीदींची माफी मागावी- तृणमूल काँग्रेस

कोलकाता । गृहमंत्री अमित शहांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून, स्थलांतरीत मुजरांना आपल्या घरी पोहचण्यासाठी राज्य सरकारकडून सहकार्य प्राप्त होत नसल्याची तक्रार केली होती, यावर तृणमूल काँग्रेसकडून जोरदार प्रत्यूत्तर देण्यात आलं. अमित शहांनी केलेले खोटे आरोप सिद्ध करावेत अन्यथा माफी मागावी, असा तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा पलटवार केला आहे. तृणमूलचे … Read more

इरफान खानच्या निधनाने राजकीय नेते मंडळी शोकाकुल; ‘यांनी’ वाहिली श्रद्धांजली

मुंबई । अष्टपैलू अभिनेता इरफान खान याचे आज मुंबईतील कोकिलाबेन रुग्णासयात कॅन्सरच्या आजाराने निधन झाले. तो ५४ वर्षांचा होता. इरफान खानच्या निधनाने संपूर्ण अभिनय क्षेत्र दु:खी झाले असून देशातील राजकीय वर्तुळात देखील या वृत्ताने दु:खी वातावरण आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी काँग्रेस अध्यक्ष … Read more

लाॅकडाउननंतरही संचारबंदी कायम राहणार, १४ एप्रिलनंतर सरकारचा ‘हा’ प्लान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनपासून पसरलेल्या कोरोनाव्हायरसने भारतासह जगभरातील देशांना वेढले आहे. भारतातही या विषाणूचा संसर्ग होण्याचे प्रमाण ४००० च्या वर गेले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या देशातील २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा आज १३ वा दिवस आहे. बाजारपेठा बंद आहेत. गाड्या, बस, विमान, टॅक्सी, काहीही चालू नाहीये. अशा परिस्थितीत सरकार १५ एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने लॉकडाउन उघडण्याचा … Read more

देशात आत्तापर्यंत २९०२ कोरोनाग्रस्त, ६८ जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोना विषाणूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोव्हीड-१९ चे २६५० सक्रिय रुग्ण आढळले आहेत, तर आतापर्यंत २९०२ पुष्टी झाल्याची नोंद झाली आहे.भारतामध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ६८ लोकांचा मृत्यू झाला आहे.१८३ बरे झाले अथवा सोडण्यात आले. एकूण पुष्टी झालेल्या प्रकरणात माइग्रेटेड पेशंटचा देखील समावेश आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री … Read more