औरंगाबाद मनपा उपमहापौर विजय औताडे यांनी दिला तडकाफडकी राजीनामा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदन ठरावावरून औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना-भाजप नगरसेवकांमध्ये आज जोरदार खडाजंगी झाली. राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिलेला असताना शिवसेनेने मात्र अभद्र आघाडी करून मुख्यमंत्री बनविला, असा चिमटा भाजप नगरसेवकांनी काढताच आम्हाला संस्कार शिकवू नका, असे सांगत शिवसेनेने भाजपवर प्रतिहल्ला केला. मात्र जनता आम्हाला जाब विचारते अस सांगत उपमहापौर विजय औताडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.