औरंगाबादेत एका दिवसात तब्बल 202 नवीन कोरोनाग्रस्तांची वाढ; 2436 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 202 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये 123 पुरूष, 79 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 5239 कोरोनाबाधित आढळले असून 2556 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 247 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 2436 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. … Read more

खेळणी विक्रेत्याला दुकानातील नोकरानेच ४६ लाखांला  गंडवले…

औरंगाबाद प्रतिनिधी | घाऊक व्यापा-याशी हातमिळवणी करुन नोकराने मालकालाच ४५ लाख ६८ हजारांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार दोनवर्षा पासून सुरू होता. फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यावर दुकानदाराने पोलिसात धाव घेतली. त्यावरुन नोकर दत्तप्रसाद सुभाषचंद्र लोया, घाऊक विक्रेता पंकज कैलाशचंद खंडेलवाल आणि त्याचा नोकर रवि शिवाजी पानखेडे यांच्याविरुध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल … Read more

औरंगाबादेत आज सापडले रेकॉर्डब्रेक 230 नवे कोरोनाग्रस्त; जिल्ह्यात 1831 रुग्णांवर उपचार सुरु

औरंगाबाद प्रतिनिधी ।  जिल्ह्यात आज 230 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण रुग्ण संख्या 4266 झाली आहे. यापैकी 2217  रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 218जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1831 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. आज सकाळी आढळुन आलेल्या 230 रुग्णामध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत आढळलेले रुग्ण 124 आणि ग्रामीण भागात आढळलेले रुग्ण 106 … Read more

राज्यात दिवसभरात सापडले सर्वाधिक ३ हजार ८९० कोरोनाग्रस्त; २०८ जणांचा मृत्यू

मुंबई | महाराष्ट्रामध्ये मागच्या २४ तासात सर्वाधिक म्हणजेच ३,८९० कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर २०८ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यातले ७२ मृत्यू हे मागच्या ४८ तासातील आहेत, तर उरलेले १३६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातला सध्याचा मृत्यूदर हा ४.७२ टक्के एवढा आहे. मागच्या २४ तासांमध्ये ४,१६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७३,७९२ … Read more

औरंगाबादेतील करीना वाघिणीचा कोरोनामुळे मृत्यू?

औरंगाबाद प्रतिनिधी । सिद्धार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालयातील करिना नावाची सहा वर्षीय वाघीण काही दिवसांपासून आजारी होती. तिचा आज बुधवारी   सकाळी साडेपाच ते सहा वाजे दरम्यान मृत्यू झाला. दोन दिवसांपासून तिने अन्नपाणी सोडले होते. मनापा आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी या वाघिणीची मंगळवारी पाहणी केली होती. या वाघिणीची कोरोना चाचणीही करण्यात आली होती, मात्र त्याचा … Read more

औरंगाबाद मध्ये 24 ते 26 जून दरम्यान रोजगार मेळाव्याचे आयोजन; मुलाखतींद्वारे मिळणार थेट नोकरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , औरंगाबाद यांच्यामार्फत ऑनलाइन पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन दिनांक 24 ते 26 जून 2020 दरम्यान करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे … Read more

कृषिमंत्र्यांचे स्टिंग ऑपेरेशन; शेतकरी बनून दुकानात खत मागतात मात्र…

औरंगाबाद प्रतिनिधी । शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळताहेत की नाही हे पाहण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे आज स्वत: शेतकरी बनून औरंगाबाद येथील एका दुकानात गेले. खते शिल्लक असतानाही दुकानदाराने देण्यास नकार दिल्यानंतर कृषिमंत्र्यांनी जिल्हा कृषि अधीक्षकांमार्फत त्या दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा केला. औरंगाबाद येथील कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे निर्देशही कृषीमंत्र्यांनी दिले. खतांचा … Read more

धक्कादायक! १३ वर्षीय बालिकेचा १८ वर्षाच्या तरुणासोबत ठरला होता विवाह; पण आदल्या दिवशी…

औरंगाबाद प्रतिनिधी | शहरातील मुकुंदवाडी परिसरातील 13 वर्षीय बालिकेचा चिंचोली गावातील 18 वर्षीय तरुणासोबत 19 जून रोजी विवाह निश्चित करण्यात आला होता. 18 जूनला हळदीचा कार्यक्रम देखील पार पडला. खबऱ्याने चिकलठाणा पोलिसांना या विवाहाची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने पाऊल उचलत ही कारवाई केली. सर्वत्र कोरोनाचा लॉकडाऊन सुरू असल्याने अनेक ठिकाणी कमी नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह … Read more

अनैतिक संबंधातून जन्मलेल्या नवजात शिशूचा खून; आरोपींना दीड महिन्यानंतर अटक

औरंगाबाद प्रतिनिधी | अनैतिक संबंधातून जन्मलेल्या नवजात शिशूचा चौघांनी खून केल्याचा धक्कादायक उलगडा सिटीचौक पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. रतनलाल भोलाराम चौधरी , हरिषकुमार सुभाषलाल पालीवाल , गीता अजय नंद आणि गंगाबाई रतनलाल चौधरी अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने या आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. … Read more

लॉकडाऊनमध्ये पुण्याहून औरंगाबादेत घरी आलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या

औरंगाबाद प्रतिनिधी | लॉकडाऊनमुळे पुणे येथून औरंगाबादेत घरी आलेल्या प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थाने घरातील हॉल मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुंडलीकनगर मधील गजानन कॉलोनी भागात घडली. आत्महत्येचे कारण मात्र समोर आलेले नाही पोलीस पुढील तपास करीत आहेत. विवेक भाऊलाल पांणकडे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली अधिक … Read more