आंतरजातीय विवाहाची नोंदणी करायला गेलेल्या प्रेमीयुगूलाला जिल्हाधिकारी कार्यालयात मारहाण

औरंगाबाद प्रतिनिधी | प्रेम बंधनात अडकलेले जोडपे घरच्यांचा विरोध झुगारून नोंदणी पद्धतीने लग्न करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर काही जणांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात काही काळ तणाव निर्माण झाला होता. सिटी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जोडप्याला ताब्यात घेत एमायडीसीवाळूज पोलिसांच्या हवाली केले. वाळूज … Read more

पराभवाच्या भीतीने छगन भुजबळ त्यांचा मतदारसंघ बदलणार?

नाशिक प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा झालेला दारुण पराभव आणि स्वतःच्या मतदारसंघात शिवसेनेचा वाढलेला दबदबा बघून छगन भुजबळ आपला मतदासंघ बदलण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघाऐवजी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघातून छगन भुजबळ विधानसभेची निवडणूक लढतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बेहुशोबी मालमत्तेच्या कारणाने छगन भुजबळ हे तुरुंगात होते. ते सध्या आरोग्याच्या … Read more

विधानसभा निवडणूक २०१९ : बीडनंतर महाराष्ट्रातील या मतदारसंघात चुलत्या पुतण्याची युद्धाची तयारी

औरंगाबाद प्रतिनिधी | दिवंगत माजी आमदार कैलास पाटील यांना वर्ग वैजापूर तालुक्यात आजही अस्तित्वात आहे असे म्हणत भाऊराव पाटील यांचे पुतणे अभय पाटील यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. भाऊसाहेब पाटील यांनी देखील पक्षाकडे उमेदवारी मागितल्याने पक्षाला वैजापूर मतदारसंघातून उमेदवारी देताना गृहकलहाचा सामना करावा लागणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या स्थापना दिवसाच्या सभेत सांगितले … Read more

विमानसेवा सुरू करण्यासाठी खासदार इम्तियाज जलील यांचे निवेदन

औरंगाबाद प्रतिनिधी । जगप्रसिद्ध अजंठा-वेरूळ लेण्या असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय विमानसेवे अभावी ठप्प झाला आहे .जगभरातील पर्यटकांना या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची इच्छा असली तरी विमान वाहतूक सेवा विस्कळीत झाल्यामुळे येऊ शकत नाही केवळ पर्यटनच नाही तर औद्योगिक विकासावर देखील याचा विपरीत परिणाम होत असल्याचा मुद्दा खासदार इम्तियाज जलील यांनी संसदेत उपस्थित करून हवाई वाहतूक … Read more

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सरकारच्या विरोधात अर्धनग्न मोर्चा

औरंगाबाद प्रतिनिधी | राज्य शासनाचे महापोर्टल बंद करण्यात यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या मान्य करण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या विद्यर्थ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढला होता. औरंगाबाद मधील पैठण गेट पासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती. तर विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देऊन या मोर्चाची सांगता करण्यात आली. या मोर्चात स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. … Read more

Breking |जमिनीच्या वादातून ३ साडूमध्ये हाणामारी ; एकाच मृत्यू

औरंगाबाद प्रतिनिधी | जमिनीचा वाद टोकाला गेल्याने भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि यात एकाच मृत्यू झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील डागपिंपळगाव सेटवस्तीवर घडली आहे. अशोक बापूराव डांगे ( वय ५६ ) असे मृताचे नाव आहे. मृतांचा मृतदेह शव विच्छेदन क्रियेसाठी पाठवला असून पोलीस या प्रकरणा बाबत अधिक तपास करत आहेत. या भांडणात दोन साडूनी मिळून तिसऱ्या साडूचा … Read more

बोलेरो- ट्रक अपघातात एकाच कुटुंबातील चौघे ठार

औरंगाबाद प्रतिनिधी | बोलेरो आणि सिमेंट घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा भीषण अपघात झाल्याने एकाच कुटुंबातील तिघेजण ठार झाले आहेत. तर बोलेरो चालकाचाही मृत्यू झाला आहे. हा अपघात नागपूर-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक फाट्यावर झाला. हा अपघात मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास झाला. मृत प्रवासी हे औरंगाबादचे रहिवासी आहे. अपघात हा एवढा भीषण होता, की कंटेनरने … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्याला नडाल तर तुमची दुकाने बंद करू

औरंगाबाद  प्रतिनिधी | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे.  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत तर आमच्यात आणि कॉंग्रेसच्या लोकांमध्ये फरक काय राहिला. लोकांनी आपल्याला लोकांची कामे करण्यासाठी निवडून दिले आहे याचे भान आपण ठेवले पाहीजे असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. यावेळी उद्धव … Read more

‘या’ जिल्ह्याचे पालकमंत्री पद शिवसेनेकडून जाणार!

मुंबई प्रतिनिधी |सत्ता भोगत  शिवसेनेने भाजपला नको त्या शिव्या दिल्या. आता लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपशी युती केली खरी पण हळूवारपणे भाजपकडू शिवसेनेच्या सगळ्या आशा निराशेतच परिवर्तीत केल्या जात आहेत. केंद्रिय मंत्रीमंडळ विस्तारानंतर शिवसेनेच्या वाट्य़ाला आलेलं मंत्रीपद, ते आता मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये आतल्या आत होणारी रस्सीखेच ही राज्यातील जनतेला उघड डोऴ्यांनी दिसत आहेच शिवाय आता शिवसेनेच्या … Read more

आश्चर्य ! सात जन्मात हि बायको नको म्हणत पिडीत नवऱ्यांनी साजरी केली वड पौर्णिमा

औरंगाबाद प्रतिनिधी |पुढील सात जन्म हाच पती मिळावा यासाठी वड सावित्री पौर्णिमेला महिला पूजा करतात परंतु काही पत्नी पीडित पुरुषांनी ही पत्नी नको रे बाबा असे म्हणत वटसावित्रीच्या एक दिवस आगोदर पिंपळाची पूजा करून साकडे घातले औरंगाबाद शहरातील पत्नीपीडित पुरुष संघटनेच्या आश्रमात करण्यात आली दिवसदिवस पुरुषांवर अत्याचार वाढत चालले आहे त्यामुळे अनेक पुरुषावर आत्महत्या करण्याची … Read more