नितीश कुमार बिहारचे फक्त नामधारी मुख्यमंत्री, रिमोट तर भाजपच्या हाती

पाटणा । नितीश कुमार यांनी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीआहे. सोमवारी संध्याकाळी राजभवनात पार पडलेल्या 14 सदस्यीय मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात दोन उपमुख्यमंत्र्यांचा समावेश होता. याच दरम्यान माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे फक्त नामधारी मुख्यमंत्री असतील अशी टीका सिन्हा यांनी केली आहे. … Read more

निवडणुकीचा निकाल NDAच्या बाजूने तर जनतेचा निर्णय आमच्या बाजूनं; तेजस्वी यादव ‘धन्यवाद यात्रा’ काढणार

पाटणा । बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “निवडणुकीचे निकाल एनडीच्या बाजूने तर जनतेचा निर्णय आमच्या बाजूनं आहे,” असं तेजस्वी यादव म्हणाले. निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच तेजस्वी यादव यांनी महाआघाडीतील पक्षांसोबत बैठक घेतली. बिहारच्या मतदारांचे आभार मानन्यासाठी तेजस्वी यादव लवकरच ‘धन्यवाद यात्रा’ काढणार आहेत. तेजस्वी यादव यांनी … Read more

बिहार विजयानंतर भाजपचे हौसले बुलंद! राज्यात पुन्हा ‘ऑपरेशन लोट्स’ची चर्चा

मुंबई । बिहार विधानसभा निवडणुक जिंकल्यावर महाराष्ट्रातील भाजपचा आत्मविश्वास वाढल्याचे भासत आहे. बिहारमधील निवडणूक यशानंतर महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोट्स’ होणार का, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र भाजप सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावत राहील, असे सांगितले. बिहार व पोटनिवडणुकीतील निकालाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे, असे प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते … Read more

बिहारचं यश हा तर मोदींच्या नेतृत्वाचा विजय, पंकजा मुंडेंनी फडणवीसांचं टाळलं नाव

मुंबई । बिहार विधानसभा निवडणुकांच्या विजयानंतर राज्यातील बहुतांश नेत्यांकडून विरोधी पक्षनेते आणि बिहारचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीचा हा विजय असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करताना, नक्कीच त्यांनी सुत्र हलवली असतील, त्यांचे अभिनंदन असे म्हटले. मात्र, भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडेंनी बिहार निवडणुकांचे यश … Read more

‘आम्ही जेव्हा टांग वर करतो तेव्हा भूमंडळ हलते’; संजय राऊतांचा भाजपवर जबरदस्त पलटवार

मुंबई । बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. बिहार निवडणुकीत नोटापेक्षाही कमी मते शिवसेनेला मिळाले. शिवसेनेची अवस्था गिरे तो भी टांग उपर अशी आहे, या भाजपच्या टीकेचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. आमची टांग नेहमी जागेवरच असते. जेव्हा आम्ही टांग वर करतो तेव्हा भूमंडळ हलते, … Read more

‘नितीश कुमारांसोबत घात झालाय तेव्हा…’ बिहार निकालानंतर रोहित पवारांचे सूतोवाच

मुंबई । बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर  राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. बिहारच्या निवडणुकीत बलाढ्य शक्तींना एकाकी झुंज देणाऱ्या तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाचं अनेकजण कौतुक करत आहेत. बिहारच्या निकालावर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनीही भाष्य केलं आहे. यात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी तेजस्वी यादव यांचं कौतुक करत भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

बिहारमध्ये नोटापेक्षाही कमी मतं मिळालेल्या शिवसेनेला राणे बंधूंचा टोला, म्हणाले..

मुंबई । सुशांतसिंह राजपूत प्रकरणानंतर शिवसेना मोठ्या हिरीरीने बिहार विधानसभा निवडणूक रिंगणात उतरली होती. पण शिवसेनेच्या उमेदवारांना मोठ्या पराजयाचा सामना करावा लागला आहे. बिहारमध्ये शिवसेनेनं लढवलेल्या 23 पैकी 21 जागांवर ‘नोटा’पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. त्यावरुन भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला जोरदार टोला हाणलाय. निलेश राणे यांनी काही मतदारसंघात शिवसेनेला मिळालेल्या … Read more

‘नितीशजी भाजप आणि संघाला सोडून तेजस्वी यादवांना आशीर्वाद द्या!’; काँग्रेस नेत्याची सत्तास्थापनेची ऑफर

भोपाळ । बिहार विधानसभा निवडणुकीच्या अटीतटीच्या लढाईत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) विजय झाल्यानंतर आता काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी एक नवा फासा टाकला आहे. त्यांनी बिहारचे नियोजित मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भाजप सोडून आमच्यासोबत चला, अशी ऑफर देऊ केलेय. नितीशजी बिहार तुमच्यासाठी आता लहान पडू लागलाय. तुम्ही राष्ट्रीय राजकारणात आले पाहिजे. ‘फूट पाडा आणि … Read more

बिहार निवडणुक निकालांवरून फडणवीसांना शरद पवारांचा टोला, म्हणाले…

पुणे । बिहार विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रभारी म्हणून काम पाहिलं. बिहारमधील भाजपच्या यशात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याची प्रतिक्रिया विदर्भातील भाजप नेते चंद्रशेखर बानवकुळे यांनी दिली आहे. त्याबाबत शरद पवार यांना पत्रकारांनी विचारलं असता, “हो का? हा चमत्कार आपल्याला माहिती नव्हता. फार चांगली गोष्ट सांगितली तुम्ही” अशा शब्दात पवारांनी … Read more

फडणवीसांच्या अनुभवाचा आम्हाला मोठा फायदा झाला, बिहार भाजपने मानले आभार

पाटणा । बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार नितीश कुमार यांची JDU आणि भाजप यांची NDA आघाडीवर आहे. तर काँग्रेस आणि RJD याची महागठबंधन पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या नियोजनाचा आणि अनुभवाचा आम्हाला मोठ्या प्रमाणावर … Read more