मलकापूर नगरपरिषद निवडणूक; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला

Untitled design

कराड प्रतिनिधी | राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपा नेते अतुल भोसले यांची मलकापूर नगरपंचायत निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज सकाळी मतमोजणीला सुरवात झाली असून कॉंग्रेस आणि भाजप मध्ये जोरदार घुमासान होण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक मनोहर शिंदे यांच्या पॅनेल विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे समजले … Read more

‘युतीच सोडा? वरून ठोका म्हणून आदेश आला तर ठोकणार, दिवाकर रावतेंचा भाजप ला इशारा

Shivsena sabha in Pandharpur

औरंगाबाद प्रतिनिधी | निवडणुकीसाठी जागावाटपाच्या मागणीबाबत शिवसेनेचा एकही प्रस्ताव अद्याप आमच्या समोर आलेला नाही. त्यांनी तो मांडला नाही. जागा वाटपाची एकही बैठक अजून झालेली नाही. युती झाली नाही, तरी गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा एक जास्तीची जागा आम्ही जिंकू, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जोरदार प्रतिउत्तर … Read more

धनगरांमुळे भाजपाचे तर मुस्लिमांमुळे काँग्रेसचे गणित बिघडले – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

नांदेड | महाराष्ट्रात तिसरी आघाडी म्हणून उदयास  येत असलेली बहुजन वंचित आघाडी आणि त्यांच्या होणाऱ्या रेकॉर्ड ब्रेक सभा पाहून मुख्य पक्ष म्हणून ओळखले जाणारे काँग्रेस आणि भाजपा जोमाने हलायला लागल्याचे दिसत आहे. त्यातच आज ‘धनगर समाजामुळे भाजपाचे तर मुस्लिम समाजामुळे काँग्रेसचे गणित बिघडले आहे.’ असा टोला बहुजन वंचित आघाडीचे नेते व भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष … Read more

सहमतीचे राजकारण करताना अटलजींना गांधीवादी समाजवाद वास्तवात आणता आला नाही – विनय हर्डीकर

vinay hardikar

पुणे प्रतिनिधी | सागर रौंदळ ‘अटलजींमध्ये राष्ट्रीय जाणीव प्रचंड होती. राजकीय कार्यकर्ता आणि नेता या दोन्ही भूमिका सांभाळणे अवघड असते. मात्र त्यांनी त्या दोन्ही भूमिका सांभाळल्या. प्रशासक आणि संयोजक म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र सहमतीचे राजकारण करताना अटलजींना गांधीवादी समाजवाद वास्तवात आणता आला नाही’ असे मत जेष्ठ पत्रकार व लेखक विनय हर्डीकर यांनी व्यक्त … Read more

पंढरपुरात शिवसैनिकांची मुख्यमंत्री फडणवीस, दानवेंविरोधात घोषणाबाजी

Shivsena sabha in Pandharpur

पंढरपूर | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या पंढरपूर दौऱ्यावर आहेत. ‘२४ डिसेंबर रोजी पंढरपूरमधे शिवसेनेची एतिहासिक सभा होईल आणि अनेक जण यावेळी शिवसेनेत प्रवेश करतील’ असा दावा शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत केला होता. या पार्श्वभुमीवर राज्यभरातील शिवसैनिक आज सकाळ पासूनच पंढरपूरात गर्दी करु लागले आहेत. यावेळी सभेसाठी आलेल्या शिवसैनिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र … Read more

मोदींनी देशात आणीबाणी घोषित करावी – शिवसेना

Narendra modi and Shivsena

नवी दिल्ली | ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औपचारिक आणीबाणी लागू करावी’ असे म्हणत शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी भाजप सरकारला धारेवर धरले. दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ‘केंद्रीय गृहमंत्रालयाने देशाच्या सुरक्षेचा मुद्दा समोर करत कोणत्याही व्यक्तीचा मोबाईल, कॉम्प्युटर आणि लॅपटॉपमधील डेटा तपासण्याचे अधिकार काही तपास यंत्रणांना दिले आहेत’ या पार्श्वभुमिवर कायंदे यांनी … Read more

भाजप – काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफाण हाणामारी

Panaji INC BJP Fight

पणजी | राफेल विमान खरेदी घोटाळ्यावरून देशभरातील वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपा आणि काँग्रेस पक्ष राफेल प्रकरणावरुन एकमेकांवर ताशेरे ओढताना दिसत आहेत. यापार्श्वभुमीवर माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या गोव्यात देखील त्याचे पडसाद उमटले. राजधानी पणजी येथे आज भाजपा कार्यकर्ते निषेध मोर्चा घेऊन आलेले असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भिडले आणि दोन्ही पक्षांच्य़ा कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. … Read more

शिवसेनेशी युती झाली तरच आगामी निवडणुकीत फायदा, भाजपाचा सर्व्हे

शिवसेना युती

मुंबई | आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाली नाही तर दोन्ही पक्षांना मोठे नुकसान होणार असल्याची माहिती भाजपच्या पक्षाअंतर्गत सर्व्हेतून समोर आली आहे. त्यामुळे भाजपा – शिवसेना युती होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्व्हेतून मिळविलेल्या माहितीनुसार येत्या निवडणुकींमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यास दोन्ही पक्षातून निवडून आलेले खासदार मोठ्या प्रमाणातून … Read more

शीख दंगलीतील आरोपीला काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपद, अरुण जेटलींचा आरोप

Arun Jaitly

नवी दिल्ली | देशात १९८४ मध्ये झलेल्या शीखविरोधी दंगलप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस या प्रकरणातील दुसऱ्या एका आरोपीला मुख्मंत्रीपदाची शपथ देत आहे. ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर केली आहे. काँग्रेस नेते सज्जन कुमार यांच्यासह मध्य … Read more

भाजपाची हार हे तर भारतात लोकशाही मजबुत असल्याचं उदाहरण – सुमित्रा महाजन

Sumitra Mahajan

नवी दिल्ली | मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या तीन मोठ्या राज्यांतील विधानसभा निवडणुकांमधे भाजपा ला मोठा धक्का बसला आहे. तीनही राज्यात काँग्रेस आघाडीवर असून लोकांनी भाजप ला नाकारलं असल्याचं स्पष्ट होत आहे. यापार्श्वभूमीवर ‘भाजपाची हार हे तर भारतात लोकशाही मजबुत असल्याचं उदाहरण आहे’ असं मत लोकसभा स्पिकर सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केलं आहे. लोकसभेच्या आवारात … Read more