चंद्रकांतदादांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं! रोहित पवारांनी काढला चिमटा

पुणे । विधानसभा निवडणुकीत स्वबळावर १०५ आमदार निवडून आल्यानंतरही राज्यातील सत्तेने हुलकावणी दिल्याने भाजप नेत्यांमधील अस्वस्थता पावलोपावली दिसत असते. त्यातूनच एखाद्या नेत्याचं विधान येतं आणि मग त्यानंतर महाविकास विरूद्ध भाजपा यांच्यात कलगीतुरा बघायला मिळतो. काल मंगळवारी अचानक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यास तयार असल्याचं विधान केलं होतं. या विधानावरून कर्जत जामखेड मतदारसंघाचे … Read more

शिवसेनेसोबत एकत्र येण्याच्या चंद्रकांतदादांच्या विधानाची फाडणवीसांनी काढली हवा, म्हणाले..

मुंबई । विधानसभा निवडणुकीत स्वबळावर १०५ आमदार निवडून आल्यानंतरही राज्यातील सत्तेने हुलकावणी दिल्याने भाजप नेत्यांमधील अस्वस्थता पावलोपावली दिसत असते. त्यातूनच एखाद्या नेत्याचं विधान येतं आणि मग त्यावरून चर्चांना ऊत येतो. असाच काहीसा भाजपमधील विसंवादाचे दर्शन घडवणारा प्रकार आज घडला. ‘राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत येण्यास तयार आहोत’, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. … Read more

शिवसेनेसोबत पुन्हा एकत्र यायला तयार, मात्र..; चंद्रकांतदादांनी दिली युतीच्या चर्चांना हवा

मुंबई । राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत. पण एकत्र आल्यावर निवडणुका मात्र एकत्र लढवणार नाही, तर स्वतंत्रपणे निवडणुका लढवू, असं सांगून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil)यांनी शिवसेना-भाजप(shivsena-bjp) युतीच्या चर्चांना हवा दिली आहे. पाटील यांचं हे वक्तव्य आल्यानंतर तर्कवितर्क वर्तविले जात असून भाजपने आता नमती भूमिका घेतल्याचं जात आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना … Read more

चंद्रकांतदादा मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट कसा होतो, हे राणेंना विचारा; शिवसेना नेत्याची टीका

कोल्हापूर । मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा कसा शेवट होतो, हे नारायण राणे यांनी अनुभवले आहे. चंद्रकांत पाटील यांनी ही गोष्ट ध्यानात ठेवावी, असा इशारा शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी दिला. ते सोमवारी कोल्हापूरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राजेश क्षीरसागर यांनी ठाकरे सरकारवर सातत्याने टीका करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. क्षीरसागर म्हणाले कि, … Read more

चंद्रकांत पाटील यांचा पीए असल्याचे सांगून २५ लाख उकळणारी टोळी गजाआड

पुणे । पिंपरी-चिंचवडसह पुण्यात आमदारांचा आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पी. ए. बोलत असल्याचे सांगून अनेकांकडून पैसे उकळल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली असल्याचे वृत्त दैनिक ‘लोकसत्ता’ने दिलं आहे. दैनिक ‘लोकसत्ता’ने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य सूत्रधार विशाल अरुण शेंडगे यांच्यासह साथीदार सौरभ संतोष अस्टूळ, किरण धन्यकुमार शिंदे यांना … Read more

तर नंतर कुठलेही सरकार आलं तर २०-२५ वर्ष मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही – चंद्रकांत पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी कराडच्या कृष्णा हॉस्पीटल कोरोना उपचारांची पाहणी करुन 15 कोरोनामुक्त रुग्णाचा सत्कार करून डिस्चार्ज दिला. यावेळी माध्यमांशी बोलताना विनायक मेठेंनी मराठ्यांना दुजाभाव का असं पत्र लिहीलय…प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे सुनावणी सुरू आहे…तरी मराठा आंदोलन करण्याचा प्रयत्न होतोय…यामागचं राजकारण काय…??? या प्रश्नावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील … Read more

मतलबी कोण आहे हे शेतकरी जाणतात; राजू शेट्टींच्या टीकेला चंद्रकांतदादांचे उत्तर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी   दूर दरवाढ आंदोलनावरून सध्या भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. दुधाचे दर वाढवून प्रति लिटर पाच ते दहा रुपये अनुदान द्या. दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी रद्द करण्यात या मागणीसाठी स्वाभिमानी आणि भाजप सध्या आक्रमक असून दोघांमध्ये सध्या शाब्दिक युद्ध सुरु आहे. दरम्यान, भाजपाचे दुध आंदोलन मतलबी असल्याची … Read more

शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आमदारकी मिळणार असल्याचं कळताच शांत; चंद्रकांतदादांचा राजू शेट्टींना टोला

मुंबई । शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आज आमदारकी मिळणार असे समजताच शांत बसले आहेत, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर तोफ डागली आहे. राज्यातील दूध दराचा मुद्दा अधोरेखित करत त्याच धर्तीवर राजू शेट्टी यांच्याकडून मात्र कोणतीही भूमिका घेतली जात नसल्याच्या मुद्द्यावरुन त्यांच्यावर तोफ डागली. राज्यात सध्या दुधाला … Read more

मोतोश्रीवर जाण्यात मला कमीपणा वाटत नाही; पवारांनी चंद्रकांतदादांच्या ‘त्या’ सल्ल्याला दिला खो

पुणे । महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू असताना आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुण्यात महत्त्वाची पत्रकार परिषद झाली. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर जाणं बरोबर नाही. या वयात खरंतर मुख्यमंत्र्यांनी पवारांना भेटायला जायला हवं असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्यावर शरद पवार यांनी मोतोश्रीवर … Read more

कोरोना काळात फडणवीस दौरे करतायत तर उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडत नाही- चंद्रकांत पाटील

पुणे । कोरोना संकटात राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दररोज राज्याच्या वेगवेगळ्या भागांचे दौरे करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र मातोश्रीवरून बाहेर पडायला तयार नाहीत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते मंगळवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले. … Read more