युतीची घोषणा होण्याआधीच चंद्रकांत पाटलांनी केली चार उमेदवारांच्या नावाची घोषणा

सातारा प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना भाजपने चार उमेदवारांच्या नावांची घोषणा करून टाकली आहे. युती होवो अथवा न होवो वाईतून मदन भोसले, कोरेगावातून महेश शिंदे, दक्षिण कराड मतदार संघातून अतुल भोसले आणि कराड उत्तरमधून मनोज घोरपडे हे भाजपचे उमेदवार असतील, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. … Read more

उदयनराजेंचा भाजप प्रवेश निश्चित, पुढील आठवड्यात करणार प्रवेश : चंद्रकांत पाटील

सातारा प्रतिनिधी | उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाला माझा कसलाही विरोध नाही. अथवा मी कसलाही खोडा घालत नाही. उदयनराजे पुढील आठवड्यात दिल्लीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये भाजप प्रवेश करतील असे चंद्रकांत पाटील यांनी म्हणले आहे. ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते. उदयनराजेंच्या प्रवेशाबाबत मी त्यांच्याशी काल बोललो असून ते येत्या आठवड्यात दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करतील असे … Read more

महापुरात हरवलेले कोल्हापूरचे वैभव सर्व मिळून पुन्हा उभा करू : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी | महापूराने हरवलेलं कोल्हापूरचं वैभव पुन्हा निर्माण करण्यासाठी सगळयांनी मिळून प्रयत्न करुया, शासन, समाज आणि गणेशोत्सव मंडळानीही याकामी पुढाकार घेऊन पूरग्रस्तांसाठी भरीव कार्य करुया, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना केले. कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने येथील केशवराव भोसले नाटयगृहात आयोजित केलेल्या गणराया ॲवॉर्ड वितरण सोहळयाप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. समारंभास … Read more

बाबसाहेब आणि संघ प्रमुखांचे विचार सारखेच : चंद्रकांत पाटील

मुंबई प्रतिनिधी | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी ‘आरक्षण दिले जावे, मात्र त्याचा आढावा ठराविक कालावधीनंतर घेतला जावा, असे मत मांडले होते. सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील अशीच भूमिका मांडली आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलल्यावर दरवेळी अनेकांच्या टोकाच्या प्रतिक्रिया उमटतात. मात्र या विषयावर समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांचे काय … Read more

राजू शेट्टींनी मोर्चे काढण्या ऐवजी सूचना कराव्यात : चंद्रकांतदादा पाटील

सांगली प्रतिनिधी| प्रथमेश गोंधळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी सरकारविरोधात मोर्चे, आंदोलने करण्यापेक्षा पूरग्रस्तांसाठी सूचना कराव्यात, असा टोला चंद्रकांतदादा पाटील यांनी राजू शेट्टी यांना लावला. जिल्हा अधिकारी कार्यालयात पूर परिस्थिती आणि मदतीबाबतचा आयोजित केलेल्या बैठकीनंत पाटील बोलत होते. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला पुराचा तडाखा बसल्याने घरांसह, शेती आणि जनावरांचे अतोनात नुकसान झाले. नदीकाठच्या गावांना … Read more

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारची तिजोरी रिकामी झाली तर कर्जही काढू : चंद्रकांत पाटील

पुणे प्रतिनिधी  : सांगली आणि कोल्हापुरात आलेल्या भीषण महापुरामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे. अनेक नागरिकांचे घर पडले आहे. याच पार्श्वभूमीवर आता शहरी आणि ग्रामीण भागाला पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. प्रत्येक पूरग्रस्ताचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. त्यासाठी गरज भासल्यास कर्जही काढू अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. पुण्यात शासकीय … Read more

महाराष्ट्र भाजपच्या लोकप्रतिनिधींनी १ महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना द्यावे : चंद्रकांत पाटील

मुंबई प्रतिनिधी |  भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या खासदार, आमदार, नगरसेवक , जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी आपले एका महिन्याचे वेतन सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना देण्याचे निर्देश दिले आहे. या आदेशानुसार प्रत्येक लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पार्टीच्या नावे आफत निधी असा आपल्या एक महिन्याच्या वेतनाच्या मूल्याचा चेक लिहून जमा करायचा आहे. … Read more

पूरग्रस्तांना धमकी द्यायला चंद्रकांत पाटील हे जनरल डायर आहेत का : राष्ट्रवादी

मुंबई प्रतिनिधी : राज्यात पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथील जनजीवन पावसामुळे विस्कळीत झालं आहे. सर्व स्तरावरून या पूरग्रस्तांना मदत करण्यात येत आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या पूरग्रस्त भागाचा दौरा करीत आहेत . यावेळी त्यांनी तक्रार करणाऱ्या एका पूरग्रस्ताला झापलं असल्याचं समोर आलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

ए गप्प बसायचं ! चंद्रकांत पाटलांची पूरग्रस्त शेतकऱ्याला अरेरावी

कोल्हापूर प्रतिनिधी |  चंद्रकांत पाटील आपल्या विधानाने नेहमी चर्चेत राहतात. असेच एक विधान त्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना केले आहे. पूरग्रस्त शेतकऱ्याने चंद्रकांत पाटील यांच्या भाषणा दरम्यान सरसकट कर्जमाफीच्या केलेल्या मागणी नंतर चंद्रकांत पाटील यांचा माथा भडकला आणि त्यांनी ए गप्प बसायचं अशी धमकीच दिली. त्यांच्या कृत्यानंतर भाजपला सत्तेची मस्ती चढली आहे का असा सवाल … Read more

पूरग्रस्तांना आम्ही घरच्या पेक्षा चांगली व्यवस्था देत आहोत : चंद्रकांत पाटील

मुंबई प्रतिनिधी | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून केंद्र शासनाकडूनही मदत घेण्यात येत आहे. उत्तम व्यवस्था उभा करणं हे सर्वात मोठं चॅलेंज प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांसमोर आहे. मात्र, प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी हे चॅलेंज स्विकारले आहे. आपण घरी होणार नाही, इतकी चांगली व्यवस्था उपलब्ध करुन देत आहोत’, असे विधान महसूल मंत्री चंद्रकांत … Read more