भारत-चीन युद्ध झाल्यास रशिया तटस्थ राहिल ? पण का; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गॅलवान व्हॅली स्टँड-ऑफपासून भारत आणि चीन यांच्या सीमेवर तीव्र तणाव निर्माण झाल्यानंतर देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशियाच्या दौर्‍यावर गेलेले आहेत. चीनशी वाढत्या ताणतणावाच्या दरम्यान हा दौरा म्हणजे जुना मित्र असलेल्या रशियाची मदत घेण्याचे धोरण म्हणूनही पाहिले जाते हे उघड आहे. मात्र , रशियाने नुकतेच स्पष्ट केले आहे की भारत आणि चीन … Read more

चीनमध्ये सुरु झाला ‘डॉग मीट फेस्टिवल’;आता खाल्ली जाणार लाखो कुत्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिसेंबर 2019 मध्ये, चीनच्या वुहान शहरातून बाहेर पडलेल्या कोरोना विषाणूमुळे अद्यापही जगभरात त्रास होतो आहे. चीनच्या युलिन शहरातील गुआंग्सी प्रांतात पुढील 10 दिवसांसाठी चालणारा ‘डॉग मीट फेस्टिव्हल’ मंगळवार पासून सुरू झाला आहे. मात्र आयोजकांचे असे म्हणणे आहे की, कोरोनाला डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमामुळे लोकांची संख्या कमी केली गेली आहे आणि अपेक्षा … Read more

चिनी कंपन्यांबरोबर झालेल्या करारांबाबत केंद्रानं आम्हाला थांबू नका म्हटलं- सुभाष देसाई

मुंबई । चिनी कंपन्यायांबरोबरचे करार रद्द केलेले नव्हते, ते जैसे थे ठेवले होते, असे सांगत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले की, चीनबरोबर जे संबंध आहेत ते सुधारत असल्याची माहिती आजच आम्हाला मिळाली. त्यामुळे चीन कंपन्यांबरोबर झालेल्या करारांना अडथळा येणार नाही. चीनच्या कंपन्यांबरोबर झालेल्या करारांबाबत केंद्र सरकारने आम्हाला थांबू नका, असे सांगितले नाही. आता परिस्थिती सुधारत … Read more

रशिया भारताला देणार हे ‘ब्रह्मास्त्र’; चीननं केला होता विरोध

मॉस्को । लडाख सीमेवर भारत आणि चीन या दोन देशामध्ये सीमावादावरून तणावाचं वातावरण आहे. अशा वेळी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. रशियाकडून अत्याधुनिक S-400 एअर डिफेन्स मिसाइल सिस्टम भारताला मिळवण्याच्या दृष्टीनं राजनाथ सिंह यांचा हा दौरा महत्वाचा आहे. दरम्यान, रशियाने S-400 एअर डिफेन्स मिसाइल सिस्टम भारताला देण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

भारतीय जवानांवर हल्ला करण्याचे चीन सैन्याला होते पूर्वादेश – अमेरिकी गुप्तचर यंत्रणा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय बिहार १६ रेजिमेंटचे सैनिक आणि चीनी सैनिक यांच्यात एका चौकीवरून चकमक झाली होती. यामध्ये भारताचे २० जवान शहिद झाले. ज्यात कमांडर ऑफिसर संतोष बाबू यांचा समावेश होता. आता अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने चीनला भारतीय जवानांवर हल्ला करण्याचे पूर्वादेश होते अशी माहिती दिली आहे. भारत चीन सीमेवर झालेल्या … Read more

सिताराम येचुरी चीनचे पंतप्रधान झी जिनपिंग यांना खरंच बाॅस म्हणाले होते का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) चे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी चिनी अध्यक्षांना आपला बॉस म्हणून संबोधलेला दावा केलेल्या एका ट्वीटचा स्क्रीनशॉट फिरतो आहे. हा खोटा असल्याचा दावा करण्यात आला आहे. स्क्रीनशॉटमध्ये वास्तविक ट्वीटपासून अनेक विसंगती दिसून आल्याचे आढळून आले आहे. ट्विटमध्ये नमूद केलेली तारीख २० ऑक्टोबर, २०१५ ही येचुरी ट्विटरवर सामील … Read more

काश्मीर खोऱ्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा मात्र महाराष्ट्र पुत्राला वीरमरण

वृत्तसंस्था | काश्मीर खोऱ्यातील पुलवामाच्या बंडजू भागात सुरु असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मात्र त्यात एक भारतीय जवान शाहिद झाला आहे. सुनिल काळे अस या शहीद झालेल्या जवानाचं नाव आहे. दरम्यान आज पहाटे साडेचार वाजता पुलवामामध्ये अतिरेक्यांच्या चकमकीत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पानगांवचे सीआरपीएफ जवान सुनिल काळे हे शहीद झाले आहेत. … Read more

ड्रग्ज खरेदी करण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्यांनी स्वत:च्या मुलाला विकले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणत्याही पालकांसाठी त्यांचे मूल हे त्यांच्या स्वतःहून जास्त प्रिय असते. जरी आपल्याला खाण्यापिण्यास काहीही मिळत नसले तरी आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक पालक हा झटत असतो. मात्र चीनमध्ये असेही एक जोडपे आहे ज्यांनी आपली ड्रग्जची गरज भागवण्यासाठी आपल्या स्वतःच्या मुलाचा सौदा केला. त्याने आपल्या मुलाला फक्त 6,800 पौंड मध्ये विकले. … Read more

२० सैनिक मारले जाणं ही संख्या कमी नाही – जितेंद्र आव्हाड 

ठाणे प्रतिनिधी | “पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनने आक्रमण केलं हे मान्य करायला तयार नाहीत. मग २० सैनिक कसे मारले गेले. २० सैनिक मारले जाणं ही संख्या कमी नाही, याची जबाबदारी कोणाला तरी स्वीकारावी लागेल,” असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.  आपल्या ट्विटर अकॉउंटवरून त्यांनी हे जाहीर केले आहे. गेल्या काही … Read more

भारत चीन युद्धजन्य परिस्थितीवर रामदेव बाबांचे मोठे विधान; म्हणाले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीनमध्ये सीमेवरून सध्या बराच तणाव निर्माण झालेला आहे. गेल्या सोमवारी लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात झालेल्या चकमकीत भारताच्या 20 सैनिक शहीद झाले त्यामुळे देशभरातील लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे तसेच देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी मोठी मोहीम सुरू झाली आहे. मुख्य म्हणजे,बाबा रामदेव यांनी सरकारकडे आता आपण … Read more