मुंबई महापालिकेनं केले तबलिगी जमातच्या १५० जणांवर गुन्हे दाखल

मुंबई । दिल्लीच्या निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमाहून परतलेल्यांनाइशारा देऊनही स्वत:हून पालिकेसमोर न येणाऱ्या तबलिगी जमातच्या १५० जणांविरोधात मुंबई महापालिकेने आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. तर मुंबईत आढळलेल्या रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण हे तबलिगींच्या संपर्कातील असून इतर रुग्ण हे केवळ १० टक्केच असल्याची माहिती महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिली आहे. दरम्यान, मुंबईतील … Read more

आंबेडकर जयंती साजरी करण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी केलं ‘हे’ आवाहन

मुंबई । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. सरकारकडून लोकांना घरातच बसण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकर जयंती आणि फुले जयंती साजरी करण्याबाबत एक महत्वाचं आवाहन राज्यातील जनतेला केला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी यंदा आंबेडकर आणि फुले … Read more

राज्यात आज २३ नवे करोनाग्रस्त, राज्यातील आकडा पोहोचला ८९१ वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात आज नवीन २३ करोनाचे रुग्ण मिळाले आहेत. यामध्ये सांगली १, पिंपरी-चिंचवड ४, अहमदनगर ३, बुलढाणा२, मुंबई १०, ठाणे १ आणि नागपूर २ नवे रुग्ण आढळले आहेत. या नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्यानंतर राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा आता ८९१ वर पोहोचला आहे. 23 new #Coronavirus positive cases reported … Read more

हनुमान जयंतीला घरातच थांबा, नाहीतर जालं पर्वत आणायला!- अजित पवार

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन लागू आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने वारंवार सांगूनही काही लोक घराबाहेर पडून गर्दी करताना दिसत आहेत. ताज उदाहरण म्हणजे पंतप्रधानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारीच्या दिवे लावा कार्यक्रमाचा काही जणांनी रस्त्यावर येऊन मिरवणूक काढून फज्जा उडवला. त्यामुळं येत्या हनुमान जयंतीला तसंच शब्ब-ए-बारातला … Read more

१४ एप्रिलनंतर लॉकडाउन हटणार, असं कुणीही गृहित धरू नये- राजेश टोपे

मुंबई । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात २१ दिवसांचा लॉकडाउन लागू आहे. अजून सात दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे गेल्या १४ दिवसांपासून घरात असलेले नागरिक लॉकडाउन संपण्याची वाट बघत आहेत. मात्र, देशातील लॉकडाउन शिथिल करण्यात येणार असला, तरी महाराष्ट्रातील लॉकडाउन आणखी लांबणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच तसं स्पष्ट केलं आहे. “१५ एप्रिलपासून लॉकडाउन संपूर्णपणे … Read more

डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी; म्हणाले, औषध द्या नाहीतर..

वृत्तसंस्था । कोरोना व्हायरसने बलाढ्य अशा अमेरिकेला बेजार केलं आहे. कोरोनाने अमेरिकेला गुडघे टेकायला लावले आहे. कोरोनाने अमेरिकेची कोंडी केली असून यातून सुटका करण्यासाठी अमेरिकेला हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या औषधाची गरज आहे. भारतातील औषध कंपन्या मोठ्या प्रमाणात हाइड्रॉक्सिक्लोरोक्वीनचं उत्पादन करतात. म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी औषध साठा पुरवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव … Read more

कोरोना मुख्यमंत्री ठाकरेंच्या दारात; मातोश्री बाहेरील चहावाला कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरातील एका चहावाला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजताच एकच खळबळ उडाली आहे. या चहावाल्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अंगरक्षक, मातोश्रीवर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस कर्मचारी, इतर कार्यालयीन कर्मचारी चहा पिण्यासाठी जात असल्यानं प्रशासनाची झोप उडाली आहे. मातोश्रीच्या काही मीटर अंतरावर असणाऱ्या एका चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याची … Read more

विद्यापीठ, महाविद्यालय अन् सीईटी परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर होणार

मुंबई । राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षेचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये परीक्षेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च … Read more

लाॅकडाउनमध्ये मुंबईतील रस्ते कसे दिसतात? पहा ‘हे’ फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुंबई शहरातील लोक आपल्या पूर्ण ताकदीने शहर लॉकडाउन ठेवत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या २०१८ च्या आकडेवारीनुसार, लोकसंख्येच्या बाबतीत मुंबई हे देशातील दुसर्‍या क्रमांकाचे शहर आहे आणि लोकसंख्या सुमारे २ दशलक्षांपर्यंत पोहोचली आहे. तथापि, भारत सरकारच्या २०११ च्या जनगणनेनुसार मुंबई हे देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे.तर हे शहर लॉकडाउनमध्ये … Read more

मुंबईतील वॉकहार्ट रुग्णालयातील २६ नर्स, ३ डॉक्टरांना कोरोना

मुंबई । राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातही चिंताजनक बाब म्हणजे एकट्या मुंबईत राज्यातील निम्मे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील प्रसिद्ध वॉकहार्ट रुग्णालयातील २६ नर्स, ३ डॉक्टरांना कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यानंतर वॉकहार्ट रुग्णालयाला कंटेनमेंट झोन घोषित केलं आहे. वॉकहार्ट रुग्णालयातील ओपीडी आणि आपत्कालीन सेवा तात्काळ … Read more