पुण्याचे टेन्शन वाढलं! करोना रुग्णांची संख्या १०० पार

पुणे प्रतिनिधी । मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये २१ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहे. यात पुणे शहरात १७ तर पिंपरी-चिंचवडमध्ये ४ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. या रुग्णामुळं पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पुणे पिंपरी -चिंचवडमध्ये करोनाग्रस्तांचा आकडा आता १०३ वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत पुण्यात … Read more

पुण्यात करोनाने घेतला दोघांचा बळी; राज्यातील मृतांचा आकडा वाढला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात करोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. पुण्यात करोनामुळे बळींची संख्या ४ वर पोहोचली आहे. करोनासदृश्य लक्षणं आढळून आल्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच ससूनमध्येच एका ४८ वर्षीय करोनाबाधित पुरुषाचा देखील मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हॉस्पिटल प्रशासनानं ही माहिती दिली. कोरोना … Read more

हुश्श.. सुटली बया एकदाची! कनिका कपूरचा सहावा करोना रिपोर्ट निगेटिव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। करोनाची लागण झालेली गायिका कनिका कपूरचा सहावा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने याबाबत वृत्त दिलं. दर ४८ तासांनी करोनाबाधित रुग्णाची चाचणी करण्यात येते. याआधी 5 वेळा तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, आज तिचा सहावा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र कनिकाला अजूनही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला नाही. कनिकाची … Read more

फक्त घरातीलच दिवे बंद करा! केंद्रीय ऊर्जा मंत्रालय

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या ५ एप्रिलला संध्याकाळी ९ वाजता देशातील सर्व नागरिकांना घरातील लाईट बंद करून ९ मिनिटे दिवे, मेणबत्ती किंवा टॉर्च लावून कोरोना विरोधात लढा देण्यास सांगितले आहे. मात्र, यामुळे ९ मिनिटे एकाच वेळी लाईट बंद केल्यास तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण राज्य व देश अंधारात जाण्याचा धोका असल्याची शक्यता जाणकारांनी व्यक्ती … Read more

१४ तारखेनंतर काही ठिकाणांहून लॉकडाउन हटू शकतो, पण..- राजेश टोपे

मुंबई । सध्या राज्यात किंवा देशात सर्वांना एकच प्रश्न पडला आहे. तो म्हणजे येत्या १४ एप्रिलनंतर लॉकडाउन उठणार का? या प्रश्नाचे उत्तर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे. १४ तारखेनंतर काही ठिकाणांहून लॉकडाउन हटवण्यासंदर्भात सरकार विचार करत आहे अशी माहिती टोपे यांनी दिली. मात्र, सरसकट सर्व ठिकाणावरून लॉकडाउन हटविणे केंद्र आणि राज्य सरकारला शक्य … Read more

उद्धव ठाकरेंनी जिचं कौतुक केलं ‘ती’ आराध्या आहे तरी कोण..

मुंबई । आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा फेसबुकच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधला. नेहमी लोकांना घरात राहा म्हणून विनंती करणारे, जनतेला वेळ पडली तर त्यांच्या चुकांसाठी खडसावणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नेहमीपेक्षा आपल्या संवादाची वेगळी सुरुवात केली. यावेळी करोनाच्या लढाईत सर्वात मोठी मदत केलेल्या सोलापूरच्या चिमुकल्या आराध्याचे आभार आणि कौतुक करत मुख्यमंत्र्यांनी आपल्या संवादाची सुरुवात केली. … Read more

धारावीत करोनाचा चौथा रुग्ण, मुंबईसाठी धोक्याचा इशारा

मुंबई । धारावीत करोनाचा चौथा रुग्ण आढळल्याने मुंबईसाठी धोक्याचा इशारा मानला जातो हे. धारवी येथील बलिगा नगरमध्ये आणखी एक रुग्ण आढळला आहे. एका ३० वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याचं कळतं आहे. आतापर्यंत धारावीत ४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दिल्लीच्या मरकजसाठी गेलेले ५ जण धारावीत गेले होते. ते पाचही जण धारावीत राहिले होते. ज्याच्या फ्लॅटमध्ये हे … Read more

कोल्हापूरात लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांचा दणका! जप्त केली २ हजार वाहन

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन करण्यात आला आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मात्र कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विनाकारण, हुल्लडबाज पणे रस्‍त्‍यांवरून फिरणारेही आहेत. अशा वाहन धारकांवर कोल्हापूर पोलिसांनी कारवाई करत आज अखेर सुमारे २ हजार वाहने जप्त करण्यात आली आहेत. कोल्हापूरातल्या शहर … Read more

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ‘उबर’ सुरु करणार फ्री राईड

नवी दिल्ली । करोना रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह्य ट्रान्सपोर्ट उपलब्ध करण्यासाठी आता उबरने पुढाकार घेतला आहे. नॅशनल हेल्थ सर्विस प्रोवायडरने उबरसोबत करार केल्याचं सांगितलं आहे. या करारांतर्गत उबर सुरुवातीच्या टप्यात दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, कानपूर, लखनऊ, प्रयागराज आणि पटना येथील डॉक्टरांसाठी १५० गाड्यांची फ्री सर्विस उपलब्ध करून देणार आहे. सर्व … Read more

करोनापासून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी मी कुठल्याही थराला जाईल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । करोनाशी दोन हात करताना आणखी एक व्हायरस समोर येतो आहे. तो म्हणजे समाजात दुही माजवण्याचा. काही लोक दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशांना मी सोडणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. करोनापासून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी मी कुठल्याही थराला जाईल. तेव्हा दुहीचा आणि अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही. त्यांच्यावर कारवाई होणारच असा … Read more