करोनामुळं राज्यसभेची निवडणूक स्थगित; येत्या २६ मार्चला होणार होती निवडणूक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या निवडणुका निवडणूक आयोगाने स्थगित केल्या आहेत. येत्या २६ मार्चला राज्यसभेच्या ५५ जागांवर निवडणुक होणार होती. करोनाच्या वाढत्या संसर्ग टाळण्यासाठी ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून अद्याप या निवडणुकांची नवीन तारीख जाहीर करण्यात आली नाही. पुढील परिस्थिती पाहूनच तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात … Read more

आकडेवारी: राज्यात कोणत्या भागात किती करोनाबाधित रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात करोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१ पर्यंत पोहोचली आहे. यात मुंबई आणि उपनगरात सर्वाधिक ३८ कोरोनाबाधित आहेत. तर, त्याखालोखाल पुणे आणि पिपरी चिंचवडमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. दरम्यान, मुंबईतील आजच्या करोनाबाधित रुग्णाच्या मृत्युनंतर राज्यात बळींची संख्या ४ झाली आहे. देशभरातील करोना बाधितांचा आकडा आता ५०० पार झाला आहे. तर १० जणांचा … Read more

चिंताजनक! राज्यात करोनाचा चौथा बळी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाचा चौथा बळी गेला आहे. कस्तुरबा रूग्णालयात दाखल असलेल्या एका ६५ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांना काल संध्याकाळपासून मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होत होता. दरम्यान आज या रुग्णाचा उपचार करत असताना मृत्यू झाला आहे. Maharashtra: A 65-year-old Coronavirus patient from UAE passed away in Mumbai yesterday. He … Read more

खुशखबर! पुण्याच्या ‘या’ लॅबने बनवले स्वदेशी कोरोना टेस्टिंग किट, आठवड्यात तयार करणार १ लाख किट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) कोरोना व्हायरस चाचणीसाठी भारत निर्मित पहिल्या किटच्या चाचणीला मान्यता दिली आहे. पुणेस्थित मायलॅबला ही जबाबदारी देण्यात आली आहे. मायलॅबने एका आठवड्यात १ लाख किट निर्मिती करण्याचे आश्वासन दिले आहे. एका किटमध्ये १०० रूग्णांची तपासणी करता येते, असा कंपनीचा दावा आहे. पुणेस्थित कंपनी मायलॅबने ६ आठवड्यात … Read more

कृपया झुंबड करू नका! राज्यात ६ महिने पुरेल इतका अन्नधान्य पुरवठा- छगन भुजबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशातील महाराष्ट्रात ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी बाजारात नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. त्यामुळं करोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन भाजी बाजार, किराणा दुकानात झुंबड करू नका असं आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जनतेला केलं … Read more

करोना अपडेट्स: महाराष्ट्रात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१ पार, तर देशात ५००

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात करोना व्हायरसचा संसर्ग जलद गतीने वाढत असून करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५०० पर्यंत पोहोचली आहे. महाराष्ट्रात करोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१ पर्यंत पोहोचली आहे. या आजाराने देशभरात ९ जणांचा बळी घेतला आहे. जगभरात तर या व्हायरसचामुळे आतापर्यंत १६ हजारपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. जगभरात साडेतीन लाखापेक्षा जास्त … Read more

काय बोलतील पंतप्रधान मोदी; आज रात्री ८ वाजता देशाला करणार संबोधित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते देशवासियांना मार्गदर्शन करणार आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी देशातील नागरिकांना जनता कर्फ्यूच आवाहन केलं होतं. देशभरात पंप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. तसेच करोनाच्या संकटात आपले कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टर, नर्स, … Read more

करोनापासून स्वतःला वाचवायचंय, तर ‘या’ गोष्टी नक्कीच करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाविरुद्धची लढाई आता एका निर्णयक टप्प्यावर आली आहे. आणि या टप्प्यावर आपल्याला पूर्ण क्षमतेने या कोरोनाचा अधिक जोमाने मुकाबला करायचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरातच राहण्याची गरज आहे. मात्र, घरी राहून सुद्धा तुम्हाला काही गोष्टींमध्ये अतिदक्षता पाळायची गरज आहे. जेणेकरून करोनापासून तुम्हाला तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा बचाव करता येईल. अशाच काही … Read more

काळजी नका करू! संचारबंदीत ‘या’ गोष्टी राहणार सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी कठोर पाऊल उचललं आहे. राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्याचसोबत जिल्ह्याच्या सीमा सुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. संचारबंदीदरम्यान रस्त्यावर ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केल्यानंतर … Read more

पुण्यातील PMPML बस सेवा बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनामुळे जमावबंदी जाहीर करण्यात आली असताना पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पीएमपीएल सेवा केली बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज संध्याकाळी ५ वाजल्यानंतर पुण्यातील सार्वजनिक वाहतूक करणारी PMPML बस सेवा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. राज्यात जमावबंदी लागू झाल्यानंतर पीएमपीएल बस सेवा सुरु होती. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पाठपुरावा करूनही … Read more