लष्करी जवानाचे अनोखं आवाहन, लग्नाला आहेर न देता कोरोनाच्या लढाईला निधी द्या

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरोनामुळे लग्नाला येऊ नका पण लग्नाचा आहेर मात्र पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला न चुकता जमा करण्याचे आवाहन करत अनोखा लग्नसोहळा आज कोल्हापूरात पार पडला. कोरोनामुळं केवळ सासू-सासरे आणि आई-वडिलांच्या उपस्थितीत सैन्य दलात कर्तव्य बजावणाऱ्या जवानाने आपले लग्न उरकले. गमतीचा भाग म्हणजे गडहिंग्लज तालुक्यातील अर्जुनवाड इथला हा लग्न सोहळा पाहुणे … Read more

कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलचे २० कर्मचारी क्वारंटाईन

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील उचत आणखी एकाला कोरोना झाल्याचे बुधवारी स्पष्ट झालं होतं मात्र यामुळं संबंधित रुग्णावर उपचार करणारा सीपीआरमधील स्टाफही कोरोना संशयितांच्या यादीत आला आहे. 18 ब्रदर आणि नर्सेस सह दोन कर्मचाऱ्यांवर पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत. या 20 जणांचे स्वॅब आज सकाळी घेण्यात आले असून ते तपासणीसाठी … Read more

पुण्यात आणखी दोघांचा कोरोनामुळं बळी; मृतांची संख्या झाली इतकी..

पुणे। राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शिवाय, करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा देखील रोज वाढत आहे. मुंबई व पुणे ही दोन्ही शहर याबाबतीत सध्या आघाडीवर आहेत. पुण्यात देखील दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग अधिकच वाढत असल्यानं चिंतेत आणखी भर पडत आहे. आज पुण्यातील ससून रुग्णालयात करोनामुळे आणखी २ जणांचा मृत्यू झाला. आज मृत्यू झालेल्यांमध्ये गंजपेठ परिसरातील 54 … Read more

फडणवीस साहेब, ही वेळ राजकारणाची नाही एकत्र येऊन लढण्याची आहे – अशोक चव्हाण

मुंबई । ”मला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सांगायचं आहे की, ही ब्लेमगेमची वेळ नाही. आपल्याला राजकारण करायला खूप वेळ आहे. करोनाचं संकट संपल्यावर ते करू. विधानसभा निवडणुका लागल्यावर ते करू. त्यावेळी आम्ही तुम्हाला उत्तरं देऊ.” असं आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य … Read more

लॉकडाऊनचा हाॅटेल व्यवसायावर गंभीर परिणाम; ७० लाख नोकर्‍या व्हेंटिलेटरवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस लॉकडाऊनमुळे रेस्टॉरंट इंडस्ट्रीला जोरदार फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे या क्षेत्रात ७० लाख,३० हजार रोजगार धोक्यात आले आहेत. दुसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊन पूर्ण झाल्यानंतर देशात एकूण ४० दिवसांचा लॉकआउट झालेला असेल.तोपर्यंत रेस्टॉरंट उद्योगावर वाईटपणे परिणाम झालेला असेल. इंडियन एक्स्प्रेस ऑनलाईनच्या अहवालानुसार लॉकडाऊन सुरु असल्याने रेस्टॉरंट इंडस्ट्रीवरील ताण दर तासाने वाढतो आहे. स्किल्ड … Read more

राज ठाकरेंनी केली मुख्यमंत्र्यांना ‘ही’ महत्त्वाची सूचना; म्हणाले..

मुंबई । कोरोनाच्या आजारातून ठणठणीत बरे होणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. त्या संदर्भातील माहिती योग्य प्रकारे प्रसिद्ध केल्यास लोकांना दिलासा मिळेला. डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवरचा विश्वास वाढेल. त्यामुळं आठवड्यातून एकदा सर्व राज्य सरकारांनी व केंद्र सरकारनं त्याबाबतचं एक न्यूज बुलेटिन काढावं, अशी महत्त्वपूर्ण सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. काल बुधवारी पुन्हा … Read more

कोरोना हाॅटस्पाॅट जिल्ह्यांतून गावी आलेल्यांची नावे सांगणार्‍याला इनाम! ‘या’ जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भिंडचे जिल्हाधिकारी छोटे सिंह यांनी कोरोना संक्रमित जिल्ह्यातील इंदूर, भोपाळ , उज्जैन आणि देशातील इतर राज्यांतल्या हॉट स्पॉट जिल्ह्यांमधून आलेल्यांच्या माहिती देण्यासाठी ५०० रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. जिल्ह्यातील लोकांना कोरोना संसर्गापासून वाचवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ही घोषणा केली आहे. त्याचबरोबर जिल्ह्याच्या हद्दीवर दक्षता वाढविण्यात आलाली असून बाहेरून येणाऱ्यांची तपासणी सीमेवरच केली जात … Read more

राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ३ हजार पार..

मुंबई । महाराष्ट्रातील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत गुरुवारी आणखी वाढ झाली. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येनं ३ हजारचा टप्पा ओलांडला आहे. सध्या राज्यातील करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची ३ हजार ८१ इतकी झाली आहे. मागील 24 तासांत राज्यभरात तब्बल १६५ नव्या रुग्णांची नोंद झाली यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. तर राज्यात आतापर्यंत १८७ रुग्णांचा मृत्यू … Read more

खरंच..! कोरोना चीनच्या प्रयोगशाळेत तयार झाला होता?अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी सुरू केला तपास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील बहुतेक शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोनाव्हायरस हे वटवाघूळ आणि पॅंगोलिनच्या माध्यमातून मानवांमध्ये पसरला आहे.मात्र, अमेरिकन गुप्तचर यंत्रणांना अजूनही याबद्दल शंका असून या विषाणूचा नेमका जन्म कोठून झाला याचा शोध त्यांनी सुरू केला आहे. वस्तुतः सीआयए आणि इतर अमेरिकन गुप्तचर यंत्रणांना असे काही पुरावे सापडले आहेत की ते कोरोना विषाणू हा वुहानमधील लॅबमध्ये … Read more

पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची बाधा; ७२ जण क्वारंटाइन

वृत्तसंस्था । दिल्लीतील एका कंपनीत पिझ्झा डिलिव्हरीचं काम करणाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या पिझ्झा डिलिव्हरी बॉयचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनानं त्याच्या संपर्कात आलेल्या दक्षिण दिल्लीतील ७२ जणांना क्वारंटाइनमध्ये हलवलं आहे. यात हाऊज खास आणि मालवीय नगरमधील पिझ्झा मागवणाऱ्या नागरिकांचा समावेश असून, त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असल्याचं दक्षिण दिल्लीचे जिल्हान्याय दंडाधिकारी बी. … Read more