शाहरुख खानने क्वारंटाइन सेंटर बनवण्यासाठी दिली स्वत:ची इमारत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला (बीएमसी) त्याच्या चार मजली खासगी कार्यालयाची जागा देण्याची ऑफर दिली, जेणेकरून या जागेचा उपयोग महिला, मुले आणि वृद्धांना क्वारंटाइन ठेवण्यासाठी होईल.सध्या, संपूर्ण जग कोरोनाव्हायरस साथीच्या विरूद्ध लढा जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे, अशा परिस्थितीत शाहरुखने पुन्हा मदतीचा हात देऊन लोकांची मने … Read more

उद्धव ठाकरेंनी जिचं कौतुक केलं ‘ती’ आराध्या आहे तरी कोण..

मुंबई । आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा फेसबुकच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधला. नेहमी लोकांना घरात राहा म्हणून विनंती करणारे, जनतेला वेळ पडली तर त्यांच्या चुकांसाठी खडसावणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नेहमीपेक्षा आपल्या संवादाची वेगळी सुरुवात केली. यावेळी करोनाच्या लढाईत सर्वात मोठी मदत केलेल्या सोलापूरच्या चिमुकल्या आराध्याचे आभार आणि कौतुक करत मुख्यमंत्र्यांनी आपल्या संवादाची सुरुवात केली. … Read more

देशात कोरोनाचे ‘हे’ पाच हाॅटस्पाॅट, यात तुमचे राज्य, शहर तर नाही ना? घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता कोरोना विषाणू देशातील प्रत्येक राज्यात पसरला आहे. आतापर्यंत २५०० हून अधिक लोक या विषाणूला बळी पडले आहेत आणि ६० हून अधिक लोक मरण पावले आहेत. अशातच काही शहरे आहेत जी कोरोना विषाणूची ‘हॉटस्पॉट्स’ बनली आहेत. म्हणजेच या शहरांमध्ये इतर शहरांपेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार महाराष्ट्र, तामिळनाडू, … Read more

करोनापासून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी मी कुठल्याही थराला जाईल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । करोनाशी दोन हात करताना आणखी एक व्हायरस समोर येतो आहे. तो म्हणजे समाजात दुही माजवण्याचा. काही लोक दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशांना मी सोडणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. करोनापासून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी मी कुठल्याही थराला जाईल. तेव्हा दुहीचा आणि अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही. त्यांच्यावर कारवाई होणारच असा … Read more

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार, २४ तासात १४८० जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूने जगातील सर्वात सामर्थ्यवान देश असलेल्या अमेरिकेचे कंबरडे मोडले आहे. तेथे कोरोना सतत लोकांना आपला शिकार बनवित आहे. गेल्या २४ तासांत अमेरिकेत १४०० हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते, अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूमुळे १,४८० लोक मरण पावले, ही आकडेवारी जगभरातील विक्रम आहे. अमेरिकेत … Read more

भारत कोरोना व्हायरसच्या तिसर्‍या स्टेजमध्ये गेला आहे काय? जाणुन घ्या आपण नक्की कुठे आहोत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा लोकसंख्या असलेला देश आहे, जिथे कोरोनाव्हायरसच्या संसर्गाची संख्या २९०० ओलांडली आहे.या साथीचा धोका कमी करण्यासाठी, देशभरात २१ दिवस लॉकडाउन केले गेले आहे. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत २९०२ रुग्णांची नोंद झाली असून या संसर्गामुळे ६८ लोकांचा मृत्यू झाला आहे.कोविड -१९चा वाढत असलेला … Read more

दिल्लीतील या हाॅस्पिटलमधील १०८ कर्मचारी क्वारंटाईन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या १०८ सदस्यांना क्वारंटाईन ठेवण्यात आले असून त्यामध्ये डॉक्टर आणि परिचारिकादेखील आहेत. या सदस्यांचा दुसऱ्या चाचणी अहवालात कोरोना विषाणूची लागण झालेल्या २ अशा रूग्णांशी संपर्क साधल्यानंतर हे पाऊल उचलले गेले आहे. या रुग्णालयातील १०८ सदस्यांपैकी ८५ जणांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे, तर २३ जणांना रुग्णालयात ठेवले … Read more

सिंगापूरातही वाढतायत कोरोनाची प्रकरणे, पंतप्रधानांकडून १ महिन्याच्या बंदची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिंगापूरमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रसार थांबविण्यासाठी तेथील सरकारने एक महिन्यासाठी देशात संपूर्ण बंदची घोषणा केली आहे. सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांनी कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी महिनाभर बंदी घालण्याची घोषणा केली. सिंगापूरमध्ये कोरोना-संक्रमित रुग्णांची संख्या १,११४ वर पोहोचली आहे, तर पाच जण मृत्यूमुखी पडले आहेत. यापूर्वी सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले … Read more

जर्मनीचे सर्वात मोठे फुटबॉल स्टेडियम डार्टमंड आता बनणार मेडिकल सेंटर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ या साथीच्या काळात रूग्णांवर उपचाराला मदत करण्यासाठी जर्मनीतील सर्वात मोठे फुटबॉल स्टेडियम बोरसिया डार्टमंड येथील सिग्नल इदुना पार्कचे अंशतः रूपांतर मेडिकल सेंटरमध्ये होणार आहे. जर्मनीच्या बुंडेस्लिगा क्लबने शुक्रवारी ही माहिती दिली. क्लबचे संचालक हंस जोकिम वत्झके आणि कार्लस्टन क्रेमर यांनी निवेदनात म्हटले आहे की, “आपले स्टेडियम हे आपल्या शहराचे … Read more

गेल्या २४ तासात ८ हजार करोना टेस्ट; महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या झाली इतकी..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या जशी दिवसेंदिवस वाढत आहे तसाच चाचण्यांचा वेग देखील वाढवण्यात आला आहे. मागच्या २४ तासात देशभरात करोना व्हायरसची लागण झाल्याची शक्यता असलेल्यांच्या एकूण ८ हजार चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एका दिवसात केलेल्या या सर्वाधिक चाचण्या आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली. भारतात २३०१ जणांचा … Read more