कोरोनाव्हायरसग्रस्त ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन रुग्णालयात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन आता कोरोना संसर्गाच्या लक्षणांमुळे रुग्णालयात दाखल झाले आहेत. पंतप्रधान जॉन्सन यांच्या कार्यालयाने ही माहिती दिली आहे.पंतप्रधान जॉन्सनचा याचा तपासणी अहवाल गेल्या महिन्यात सकारात्मक आला होता.त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी स्वत: ला १० डाऊनिंग स्ट्रीटवर आयसोलेट केले होते. United Kingdom Prime Minister Boris Johnson’s … Read more

कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांना विम्याचा लाभ मिळेल,जीवन विमा परिषदेचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ ने झालेल्या मृत्यूच्या संदर्भात सर्व विमा कंपन्या दाव्यांचा निपटारा करण्यास बांधील असल्याचे लाइफ इन्शुरन्स कौन्सिलने सोमवारी सांगितले. कौन्सिलने निवेदनात म्हटले आहे की कोविड -१९ संबंधित कोणत्याही मृत्यूचा दावा निकाली काढण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी आयुष्य दोन्ही विमा कंपन्या वचनबद्ध आहेत. कौन्सिडने म्हटले आहे की कोविड -१९मुळे झालेल्या मृत्यूच्या दाव्याच्या बाबतीत … Read more

पंतप्रधानांनी घरात दिवे लावायला सांगितलं होत झुंडीनं रस्त्यावर कसले येता- अजित पवार

मुंबई। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल रात्री ९ वाजता लोकांना घरात दिवे लावून कोरोनाविद्धच्या लढ्यात एकजूट असल्याचं दाखवण्यास सांगितलं होत. पंतप्रधानांच्या आवाहनाला काल देशभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र, काही अतिउत्साही नागरिकांनी रस्त्यावर झुंडीने येऊन फटाके वाजवून कालच्या उपक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयन्त केला. अशा महाभागांवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. ”राज्यात कोरोनारुग्णांची संख्या … Read more

करोनाविरुद्धची लढाई लवकर संपवायची असेल तर लपू नका, स्वत:हून पुढं या!- अजित पवार

मुंबई । देशात दिवसेंदिवस करोना व्हायरसचा फैलाव वाढत असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा वाढत जाणारा आकडा चिंतेत भर घालत आहे. करोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा, निर्णायक टप्पा सुरु झाला असून ज्या नागरिकांमध्ये करोनाची लक्षणे आहेत किंवा इतिहास करोनाच्यादृष्टीने संशयित आहे त्यांनी आता तरी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी तात्काळ संपर्क साधावा. करोनाविरुद्धचा … Read more

फ्रेंच फुटबॉल क्लब रीम्सचे डॉक्टर बर्नार्ड गोंजालेझ यांची कोरोनाची लागण झाल्यानंतर आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाल्यानंतर फ्रेंच फुटबॉल क्लब रीम्सचे डॉक्टर बर्नाड गोन्जालेझने आत्महत्या केली. रीम्स क्लबने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “बर्नाड गोन्झालेझच्या मृत्यूमुळे रीम्सला मोठा धक्का बसला आहे. केवळ क्लबच नाही तर शेकडो रीम्स फॅन्ससुद्धा यामुळे दुखावले आहेत. “ रीम्सचे नगराध्यक्ष, आर्नार्ड रॉबिनेट म्हणाले की, गेल्या २० वर्षांपासून क्लबमध्ये … Read more

कोरोना इफेक्ट: कोल्हापूरकरांच ठरलंय…आता चिनी मालावर बहिष्कार

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूरकरांच ठरलंय… आता चिनी मालावर बहिष्कार… होय हे खरं आहे.. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता..कोल्हापूरकरांनी आता चिनी मालावर बहिष्कार टाकलाय. कोल्हापूरात सध्या कोरोना बाधित रुग्णाची संख्या दोन वर आहे आणि त्याचा फैलावही खूप गतीने होतोय. या कोरोना विषाणूच्या निर्मितीला चीन जबाबदार असल्याने कोल्हापुरातील गजानन महाराज नगर परिसरातील ड्रायव्हर कॉलनीतील … Read more

करोनाशी लढताना पंतप्रधान मोदींनी भाजपा कार्यकर्त्यांना केले ‘हे’ ५ आग्रह

नवी दिल्ली । करोना विरुद्धची लढाई ही दीर्घकालीन लढाई असून, देशातील १३० कोटी जनता या युद्धामध्ये जिंकण्याच्या इच्छाशक्तीने एक झाली आहे’, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांपुढे ५ आग्रह धरले आहेत. हे ५ आग्रह महत्त्वाचे संकल्प असून त्यांद्वारे करोनाचा पराभव करण्यात मोठी मदत मिळेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ते भारतीय जनता … Read more

पुढील २ महिन्यांत भारताला २ करोड ७० लाख मास्क आणि ५० हजार वेंटीलेटरची गरज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात, कोरोनाव्हायरस संक्रमणासह रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. दरम्यान, सीओव्हीआयडी १९ सर्व देशभर साथीच्या विरूद्ध सुरू असलेल्या युद्धामध्ये केंद्र सरकारने वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) आणि निदान किटच्या मागणीत वाढ होण्याचा अंदाज वर्तविला आहे. इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार एनआयटीआय आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांचा असा विश्वास आहे की येत्या … Read more

करोना फोफावतोय; पिंपरी-चिंचवडमध्ये १९, तर मुंबईत ११ जणांना संसर्ग

पुणे । राज्यातील करोनाग्रस्तांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. सोमवारी राज्यात ३३ नवीन करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार पिंपरी-चिंचवडमध्ये १९, मुंबईत ११, तर अहमदनगर, सातारा आणि वसईमध्ये प्रत्येकी एकाला करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ७८१ वर पोहोचला आहे. 33 new #Coronavirus positive … Read more

लाॅकडाउनमुळेच युरोपात वाचले ५९ हजार जणांचे प्राण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउन हे कोरोनाव्हायरसच्या संक्रमणास सामोरे जाण्यासाठी प्रभावी सिद्ध झाले आहे. एका संशोधन अहवालानुसार लॉकडाउनमुळे युरोपमध्ये सुमारे ५९ हजार लोकांचे प्राण वाचले आहे. लंडनमधील इम्पीरियल कॉलेजमध्ये हे संशोधन करण्यात आले आहे. त्यानुसार, लॉकडाउन आणि सोशल डिस्टेंसिंग हे कोरोनाशी लढाई करण्यात प्रभावी सिद्ध झाले आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या म्हणण्यानुसार इम्पीरियल कॉलेजच्या एका … Read more